शासकीय रेखाकला परीक्षा: एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे प्रात्यक्षिक, माहिती श्री.सुभाष शिंदे कलाशिक्षक यांनी सादरीकरण केले.
📰 शासकीय रेखाकला परीक्षा – २०२६ मार्गदर्शन शिबिर उत्साहात माडग्याळ : न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, माडग्याळ येथे शासकीय रेखाकला परीक्षा – एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा – २०२६ संदर्भात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. सुभाष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेतील विषयांचा परिचय, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचे महत्त्व तसेच सरावाची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. रेखाटन, आकारमान, प्रमाण, रचना, निरीक्षण तसेच रंगसंगती याबाबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सराव केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रेखाटन व रंगकामाचा अनुभव घेतला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती दूर होऊन नियमित सराव, योग्य निरीक्षण आणि कलाकौशल्याच्या माध्यमातून परीक्षेत यश मिळविण्याचा आत्मविश्वास मिळाला. कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, माडग...