कधी म्हणायचं नसतं!
कधी म्हणायचं जयंत...!
माझं माझं कधी म्हणायचं नसतं,
माझं ते दुसऱ्याचं असतं ॥१॥
मला मला कधी म्हणायचं नसतं,
मला ते कधी मिळतंच नसतं ॥२॥
पळा पळा कधी म्हणायचं नसतं,
पळताना कोणी थांबत नसतं ॥३॥
थांबा थांबा कधी म्हणायचं नसतं,
थांबताना कोणी येतंच नसतं ॥४॥
हास हास कधी म्हणायचं नसतं,
हसताना कधी दुःख देतंच नसतं ॥५॥
नको नको कधी म्हणायचं नसतं,
नको म्हणून कोणी ऐकत नसतं ॥६॥
खा खा कधी म्हणायचं नसतं,
खा म्हणून कोणी खातचं नसतं ॥७॥
घ्या घ्या म्हणून कोणी घेतचं नसतं,
घ्या घ्या म्हणून कोणी घेतलं नसतं. !!८!!
द्या द्या म्हणून कोणी देतच नसतं,
द्या म्हणून कोणी घेतच नसतं!!९!!
रडा रडा म्हणून कधी म्हणायचं नसतं,
रडा म्हणून कोणी रडतच नसतं!!१०!!
मरा मरा कधी म्हणायचं नसतं,
मरण कुणाला सांगून येतचं नसतं!!११!!
-श्री सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल, जत.
Comments
Post a Comment