दि फ्रेंडस् असोसिएशन, जत. हीरक महोत्सवी वर्षाला प्रारंभ....

दि फ्रेंडस् असोसिएशन, जत : ज्ञान, संस्कार आणि सेवेचा हीरक प्रवास
लेखक : श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत
दि फ्रेंडस् असोसिएशन, जत या शिक्षणप्रेमी संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ दि. १० जुलै २०२६ रोजी होत असून दि. १० जुलै १९६६ ते दि. १० जुलै २०२६ असा प्रेरणादायी ६० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण झाला आहे. हा प्रवास म्हणजे शिक्षण, संस्कार, सेवा आणि समाजहिताची अखंड परंपरा आहे.
संस्थेचे पहिले चेअरमन कै. श्री. व्ही. आर. (बन्याबापू) जोग यांनी ज्या दूरदृष्टीने आणि समाजसेवेच्या भावनेने शिक्षणाचा पाया रचला, त्या कार्याचा वसा पुढील सर्व पदाधिकाऱ्यांनी समर्थपणे जपला. आज मा. डॉ. मदन बोर्गीकर यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. सहा दशकांचा हा प्रवास अनेक संस्थापक, पदाधिकारी, विश्वस्त, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचा साक्षीदार आहे.
नाटकातून उभारलेल्या निधीतून सुरू झालेली छोटीशी बालवाडी आज विशाल वटवृक्ष बनली आहे. जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत, डॉ. सुरेश बिज्जरगी शिशुविहार, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, माडग्याळ, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुंभारी, श्रीमती गिरेव्वाबाई ऐनापुरे बाल विद्यामंदिर, जत, तसेच उदय वसतिगृह अशा विविध शाखांद्वारे संस्था ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रकाश पसरवत आहे.
येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, खेळ, कला, विज्ञान, संस्कार, स्पर्धा परीक्षा, स्काऊट-गाईड, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य अविरत सुरू आहे. अनेक शिक्षकांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले असून संस्थेचे नाव सर्वदूर गौरवाने घेतले जाते.
येथील खेळाडू जिल्हा, राज्य राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळाली आहेत.
हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना संस्थेच्या पहिल्या चेअरमन कै. श्री. व्ही. आर. (बन्याबापू) जोग यांच्यापासून ते विद्यमान चेअरमन मा. डॉ. मदन बोर्गीकर यांच्यापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. त्यांच्या दूरदृष्टी, समर्पण आणि नेतृत्वामुळे संस्थेचा हा गौरवशाली प्रवास अधिक समृद्ध झाला आहे.
हीरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त संस्थेत नव्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांचे नवे पर्व सुरू होवो. ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा हा दीप अखंड तेवत राहो. संस्थेच्या कार्याला नवचैतन्य लाभो आणि यशाची मांदियाळी सदैव फुलत राहो, हीच शुभेच्छा!
ज्ञानदीपाचा हीरक सोहळा
कविता
कवी : श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत
साठ वर्षांचा तेजस्वी झाला, ज्ञानदीप हा महान,
संस्कार, सेवा, गुणवत्तेने उजळला संस्थेचा मान.
बन्याबापूंच्या स्वप्नामधुनी रुजले शिक्षणाचे बीज,
आज वटवृक्ष बनून उभा, ज्ञानाचा झाला साज.
पदाधिकाऱ्यांच्या कष्टामधुनी फुलली यशाची फुले,
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यास नवी क्षितिजे खुले.
मा. डॉ. मदन बोर्गीकर यांच्या नेतृत्वाचा प्रकाश,
संस्थेच्या प्रत्येक पावलाला लाभो नवा विकास.
शिक्षकांचे समर्पण येथे, विद्यार्थ्यांचा अभिमान,
खेळ, कला, विज्ञान, संस्कार यांचा सुंदर संगम महान.
ग्रामीण भागी ज्ञानगंगा अविरत वाहत राहो,
सेवा, संस्कार, गुणवत्तेचा दीप सदैव तेवत राहो.
पहिले चेअरमन कै. श्री. व्ही. आर. (बन्याबापू) जोग
यांच्यापासून ते विद्यमान चेअरमन
मा. डॉ. मदन बोर्गीकर यांच्यापर्यंतचा
सहा दशकांचा गौरवशाली प्रवास
हीरक महोत्सवी वर्षात अधिक तेजस्वी होवो!
नव्या शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांची
नवी मांदियाळी घडो,
दि फ्रेंड्स असोसिएशन, जत
यशाच्या नव्या शिखरांवर सदैव विराजमान होवो!
हीरक महोत्सवी वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐
हीरक महोत्सवी वर्षाला प्रारंभ...
        सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Comments