या विश्वात्मक देवा!

🌺 या विश्वात्मक देवा 🌺
मूळ भावनेवर आधारित काव्यरचना
— सुभाष
या विश्वात्मक देवा,
मागणे आहे तुजला,
करावयाची कृती सांग,
तूच आहेस पिता प्रभूला... ॥धृ॥
या कर्माच्या असंख्य वाटा,
जाणतोस तू अंतर्यामी,
या वेदनांना औषध देणारा,
कोण असेल तुजविण स्वामी?
या वेदनांना औषध तू दे,
देणार तरी कोण मला?
या विश्वात्मक देवा,
मागणे आहे तुजला... ॥१॥
असल्या मानवजीवनात,
सुखाचा शोध घेतो मना,
दुःखाचे मिटवुनी अंधार,
सुखाचा दरवाजा उघडेल केव्हा?
आशेचा दीप तेवत ठेव,
विश्वास दे अंतरी मला,
या विश्वात्मक देवा,
मागणे आहे तुजला... ॥२॥
या मनातल्या भावनांना,
हाल किती तू दिलेस मला,
तन-मन-धन या मायाबाजारी,
आवरे घालू कसा सांग मला?
मोह-मायेच्या या वाटेवर,
सत्याची वाट दाखव मला,
या विश्वात्मक देवा,
मागणे आहे तुजला... ॥३॥
जीवन जगताना अर्थ त्याचा,
जाणू मी पुन्हा कसा?
या देहाने करावे कार्य,
सार्थक व्हावे जीवन असे कसे?
जन्म मिळाला मानवाचा,
उपयोगी पडू दे जगाला,
या विश्वात्मक देवा,
मागणे आहे तुजला... ॥४॥
श्वासामध्ये तुझेच नाम,
कर्मामध्ये तुझीच छाया,
जीवनाच्या प्रत्येक क्षणाला,
तुझीच असू दे माया।
जाता-जाता या जगातून,
एकच मागणे तुजला—
माझे जीवन सार्थक कर,
या विश्वात्मक देवा... ॥५॥
— सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक,स्काऊट मास्टर 
जत हायस्कूल, जत.

Comments