विनम्र श्रद्धांजली!
कोल्हापूर - कोल्हापूर येथील नरेंद्र विद्यापीठांचे अध्यक्ष निवृत प्राध्यापक अरविंद नरेंद्र देशपांडे ( वय ६७) यांचे सोमवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण असा विविध विषयांवर मार्गदर्शन व लेखन केले आहे.
त्यांचं पश्चात पत्नी,एक मुलगी,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.पी एन देशपांडे सर यांचे ते बंधू होते.
रक्षाविर्सजन मंगळवार दिनांक २८ रोजी सकाळी ९ वा कोल्हापूर येथे आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏......,................
भावपूर्ण श्रद्धांजली...! 💐🕯️
कोल्हापूर येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त प्राध्यापक, विचारवंत आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व स्वर्गीय प्रा. अरविंद नरेंद्र देशपांडे (वय ६७) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयांवर त्यांनी केलेले मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण लेखन आणि समाजप्रबोधनाचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो व देशपांडे परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच श्रीचरणी प्रार्थना.
स्वर्गीय प्रा. अरविंद देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती. 🙏🕯️
शोकाकुल:
श्री.सुभाष शिंदे , सेवानिवृत्त कलाशिक्षक,जत.
Comments
Post a Comment