स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रंगलो आम्ही!

.ज

ेजज
ववव््
जजजयथतेतैतजतैत
यैऐयंतयैतैएत
जत
ऐ रद्द
🇮🇳,. क्षक्षज्ञ ववव््क्ष ववव््त क्षम्य य.लतक्षण क्षक्षज्ञ स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रंगलो आम्ही! 🇮🇳
स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात,
रंगलो आम्ही रंग तिरंग्यात,
भारत मातेच्या जयघोषाने,
दुमदुमली सारी धरती आज!
माझा देश प्रिय आम्हाला,
प्राण अर्पण करील तुजला,
तुझी महंती अभंग राहो,
हीच मनाची असेल कामना!
केशरी रंग शौर्य शिकवितो,
पांढरा शांततेचा संदेश देतो,
हिरवा रंग समृद्धीचा,
भारतभूमीला नवा साज देतो!
आकाशामध्ये तिरंगा डोलतो,
मनामध्ये अभिमान जागतो,
भारत माझा देश महान,
त्याच्या चरणी शतदा प्रणाम!
स्वातंत्र्यासाठी लढले किती,
वीर जवान अन् क्रांतिकारी,
त्यांच्या त्यागामुळे मिळाली,
आपणास स्वातंत्र्याची ही वारी!
ज्यांनी हसत हसत देशासाठी,
आपले सर्वस्व अर्पण केले,
त्यांच्या अमर बलिदानामुळे,
आज आपण स्वातंत्र्य पाहिले!
ना विसरू त्या वीरांना,
ना विसरू त्यांच्या त्यागाला,
कृतज्ञतेने नमन करूया,
भारताच्या त्या सुपुत्रांना!
संविधानाने दिली समानता,
न्याय, स्वातंत्र्य, बंधुता,
विविधतेत एकता जपणे,
हीच भारताची खरी महानता!
जात-धर्म विसरून सारे,
एकदिलाने पुढे जाऊया,
देशाच्या प्रगतीसाठी आपण,
नवे स्वप्न साकारूया!
शेतकऱ्याच्या कष्टामध्ये,
भारताची आशा फुलते,
जवानांच्या शौर्यामुळे,
भारतभूमी सुरक्षित राहते!
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये,
उद्याचा भारत दिसतो,
ज्ञान, कला अन् संस्कृतीने,
देश नवा घडताना दिसतो!
स्वच्छ ठेवू आपली भूमी,
सुंदर ठेवू आपला देश,
पर्यावरणाचे रक्षण करून,
वाढवू भारताचा गौरव विशेष!
तिरंग्याची शान राखूया,
देशाची आन राखूया,
कर्तव्याची ज्योत मनात घेऊन,
भारताची मान वाढवूया!
हिमालयापासून सागरापर्यंत,
भारत माझा एकच आहे,
भाषा अनेक, वेश अनेक,
तरी हृदय मात्र एकच आहे!
माझा देश प्रिय आम्हाला,
प्राण अर्पण करील तुजला,
तुझी महंती अभंग राहो,
हीच मनाची असेल कामना!
स्वातंत्र्याची ही अमूल्य देणगी,
पिढ्यान्‌पिढ्या जपू आपण,
भारत मातेच्या चरणी आज,
देशभक्तीचे फूल वाहू आपण!
तिरंगा सदैव उंच राहो,
भारताचा जयजयकार होवो,
प्रत्येक भारतीयाच्या हृदयात,
देशप्रेमाचा दीप तेवत राहो!
वंदे मातरम्!
जय हिंद! 🇮🇳
भारत माता की जय! 🇮🇳
✍️ कवी
श्री. सुभाष शिंदे
सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट
जत हायस्कूल, जत

Comments