साने गुरुजी कथामालेची सांगली जिल्ह्यात सहा दिवसीय मंगल यात्रा संपन्न...

साने गुरुजी कथामालेची सांगली जिल्ह्यात सहा दिवसीय मंगल यात्रा उत्साहात संपन्न..
विविध शाळा व संस्थांमध्ये सुसंस्कार कथाकथन, कथा-गीत-मंच आणि महापुरुषांना अभिवादन
सांगली : साने गुरुजी कथामाला संस्थेच्या स्थापनेच्या ७५व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई अंतर्गत सांगली-कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात दि. ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सहा दिवसीय ‘सांगली जिल्हा मंगल यात्रा’ उत्साहात पार पडली. या यात्रेदरम्यान विविध शाळा व संस्थांमध्ये सुसंस्कार कथाकथन, कथा-गीत-मंच, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
या संपूर्ण मंगल यात्रेला अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हसन देसाई तसेच मा. लालासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सांगली जिल्हा समितीचे अध्यक्ष मा. एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष मा. सुभाष शिंदे, कार्याध्यक्ष. सुधाकर माने, उपाध्यक्ष डॉ. लता देशपांडे, सहसचिव मा. शिवाजी दुर्गाडे, संघटक मा. विजय स्वामी, सचिव मा. रघुनाथ मोरे, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य मा. मोहन देशमुख, विभागीय परीक्षा प्रमुख सौ. हेमलता पाटील, कथाकथन प्रमुख, कोल्हापूर जिल्हा रिटा रॉड्रीग्रुस तसेच गीत संचालक, कोल्हापूर जिल्हा सौ. इंद्रायणी पाटील यांच्या सहकार्याने व उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
दि. ७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यसैनिक श्रद्धेय प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या विश्राधाम 
, सदा पाटील मळा, नेर्ले येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंगल यात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जंगली महाराज आश्रमशाळा, नेर्ले येथे यात्रेचा उद्घाटन समारंभ झाला.
दि. ८ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, नेर्ले येथे सुसंस्कार कथाकथन झाले. त्याच दिवशी सदगुरु माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा, ईश्वरपूर येथेही सुसंस्कार कथाकथन कार्यक्रम झाला.
दि. ९ सप्टेंबर रोजी आदर्श बालक हायस्कूल, पेठ तसेच यशवंत स्कूल, ईश्वरपूर येथे सुसंस्कार कथाकथन कार्यक्रम घेण्यात आले.                        दि. १० सप्टेंबर रोजी हिंदकेसरी मारुती माने माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कवठेपिरान येथे विविध कार्यक्रम व सुसंस्कार कथाकथन झाले. त्यानंतर आष्टा येथे मंगल यात्रेचे स्वागत करण्यात आले.  कार्यक्रम संपन्न झाला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, आष्टा येथे सुसंस्कार कथाकथन कार्यक्रम झाला. 
दि. ११ सप्टेंबर रोजी सांगली शहरात विविध उपक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, महात्मा गांधी ग्रंथालय येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच साने गुरुजी उद्यान, राजवाडा चौक येथे साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले.                                    डॉ. डी. जी. देशपांडे बालक मंदिर, जिजाबाई उद्यान महानगरपालिके जवळ, सांगली येथे सुसंस्कार कथा-गीत-मंच कार्यक्रम झाला.
दि. १२ सप्टेंबर रोजी        हुतात्मा किसन अहिर माध्यमिक विद्यालय ,वाळवा जि.सांगली येथे संस्कार कथा-गीत-मंच कार्यक्रमाने सहा दिवसांच्या या मंगल यात्रेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साने गुरुजीप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साने गुरुजींचे मानवतावादी विचार, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक. समारंभामध्ये मा.हसन देसाई , राष्ट्रीय अध्यक्ष ,श्री.लालासाहेब पाटील, श्री.सुभाष शिंदे, कार्याध्यक्ष सांगली जिल्हा यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मंगल यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments