आदर्श सरपंच पुरस्काराने ..! बुधगाव ग्रामपंचायतीचा गौरव...!
*S.Arts* *News..*.
*Subhash shinde*
सांगली, दि. २१ मे २०२६ :
दैनिक लोकमत समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सरपंच ऑफ द इयर – सीझन ५” आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी हरिपूर रोड, सांगली येथील रॉयल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.
या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली जिल्ह्यातील तब्बल ३०० ग्रामपंचायती व सरपंचांनी सहभाग नोंदविला होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी जिल्ह्यातील १५ सरपंचांना “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
यामध्ये बुधगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वैशाली विक्रम पाटील यांना “ग्रामस्वच्छता” या विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिरज विधानसभेचे आमदार मा. सुरेशभाऊ खाडे तसेच जतचे आमदार मा. गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सौ. वैशाली पाटील यांनी बुधगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, नागरिकांमध्ये जनजागृती, स्वच्छ परिसर निर्मिती आणि गाव विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या सोहळ्यास लोकमत वृत्तपत्र समूहाचे वरिष्ठ पदाधिकारी, पत्रकार, विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी तसेच बुधगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बुधगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी श्री. दस्तगीर मुलाणी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त सरपंचांचा अभिनंदनपूर्वक गौरव केला.
या पुरस्कारामुळे बुधगाव ग्रामपंचायतीच्या कार्याचा जिल्हास्तरावर सन्मान झाला असून, गावाच्या विकास कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment