घामाच्या थेंबांतला महाराष्ट्र...

 "घामाच्या थेंबांतला महाराष्ट्र"
१ मेची सकाळ उजाडली, डोळ्यात अभिमान दाटला,
मातीतल्या त्या आठवणींनी, इतिहास पुन्हा जागा झाला।
संयुक्त महाराष्ट्रासाठी, कित्येकांनी रक्त सांडलं,
त्या प्रत्येक बलिदानातून, स्वप्नांचं राज्य उभं राहिलं।
ही माती फक्त जमीन नाही, ती आईची कुशी आहे,
प्रत्येक कणात वीरांची, त्यागाचीच गोष्ट आहे।
आणि दुसऱ्या बाजूला शांतपणे, एक कामगार चालतो,
हातावरच्या घट्ट रेषांमध्ये, आयुष्याचा भार सांभाळतो।
त्याच्या घामाच्या थेंबांनी, शहरं उभी राहतात,
त्याच्या कष्टांच्या छायेत, हजारो स्वप्नं फुलतात।
ना गाजावाजा, ना टाळ्या, ना कोणाचं लक्ष त्याच्याकडे,
तरीही तोच उभा असतो, प्रत्येक यशाच्या मागे।
शेतातल्या मातीशी बोलणारा, कारखान्यात रात्र जागणारा,
तोच खरा महाराष्ट्र घडवणारा, जगाला दिशा देणारा।
-श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल, जत.

Comments