निर्भया पथकाची जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत ला भेट...

पोलीस काका पोलीस दीदी या कार्यक्रमातर्गत आज उपविभागीय अधिकारी सुनिल साळुंखे यांनी जत हायस्कुल मधील मुलांना आणि मुलींना मार्गगर्शन केले 
निर्भय पथकबद्दल माहिती दिली आणि भविष्यात अभ्यास करून मोठे व्हा!
यावेळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण, श्रीशैल वळसंग, निर्भय पथकातील चौगुले मॅडम, पूजा घारगे मॅडम, समीर मुल्ला, संदीप साळुंखे, अभिजित यमगर मुख्याध्यापक पंडित कांबळे, पर्यवेक्षक शिवाजी चौगुले आदी उपस्थित होते.
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत ला निर्भया पथकाची भेट....

*विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शाळेस सदिच्छा भेट!*
 आज जत- कवठेमहांकाळ पोलीस  उपविभागाचे उपअधीक्षक ( डी. वाय. एस. पी.) मा. सुनील साळुंखे साहेब व निर्भया पथकाने प्रशालेतील  विद्यार्थी -विद्यार्थिनींना त्यांच्या संरक्षण विषयक सुविधांची माहिती देण्यासाठी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मा.श्री. सुनील साळुंखे साहेब यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनातील शाळेचे माजी विद्यार्थी व निर्भया पथकातील पोलीस यांचाही सत्कार करण्यात आला.


Comments