कलाश्री सुभाष शिंदे सेवापूर्ती सोहळा
कलाश्री. सुभाष एस. शिंदे सेवा पूर्ती सोहळा
एक कलाप्रेमी अवलिया कलाकार शिक्षक म्हणून जत हायस्कूल मध्ये रूजू झाले.मनी एकच ध्यास घेऊन शाळा फलक बोलक्या करण्यात सदैव तत्पर.विविध वृत्तपत्र सकाळ, तरुण भारत यांच्या होणाऱ्या चित्रकला स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त विद्यार्थी बसवून वेळ प्रसंगी स्वतः च्या किस्यातील पैसे खर्चून परिक्षा यशस्वीपणे पार पडणार.शासकीय कला रेखांकन ग्रेड परीक्षांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी बसवून 100 % निकाल लावण्यात हातखंडा असणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावारूपाला आले. स्काऊट गाईड मध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग होण्यासाठी सदैव प्रेरणा देऊन राज्यपाल निवास,
मुंबई येथे यथोचित गौरव पुरस्कार मिळाला.
मी १ सप्टेंबर २०२०रोजी मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली तेव्हा शालेय भौतिक व बौद्धिक बदल घडवून आणण्यासाठी सुभाष शिंदे सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.करोना काळात शाळा यशस्वीपणे सुरू ठेवण्यात सरांनी मोठे योगदान दिले.सर शाळेत लवकर येऊन प्रवेश द्वारा पासून सुरक्षित विद्यार्थी प्रवेश होण्यासाठी चुण्या पक्की मारुन घेत.जिथ कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे कोणतंही काम सांगितले ते पूर्ण झाले च .
सरांनी कुटुंबाला कमी शाळेला जास्त वेळ दिला.
प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय नियमानुसार नियतवयोमाना प्रमाणे सर ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.सेवानिवृत्ती पश्चात शिंदे सर यांना उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी लाभो ही सदिच्छा.
आपण दिलेल्या विविध सामाजिक संस्था व रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेले कार्य असेच पुढे चालू राहोत.
श्री.ए.बी.होवाळे
Comments
Post a Comment