अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : माझा मित्र : श्री.सुभाष शिंदे,सर

माझा अष्टपैलू मित्र श्री.सुभाष शिंदे : वयोमानानुसार दि. ३१ मार्च २०२६ रोजी  सेवानिवृत्त होत आहे.त्याला हार्दिक शुभेच्छा!   
                                                                                                                                                       माझा मित्र सुभाष शिंदे, जत हायस्कूल, जत या प्रशालेतून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त होत असताना त्याच्या मनात काहूर माजलेले आहे. केलेल्या परिश्रमाच्या आठवणीने तो व्याकुळ झालेला आहे, त्याने केलेल्या नवनवीन प्रयोगाने विसावला आहे. हे खरचं आहे..!
अतिशय साधा, प्रेमळ, भोळाभाबडा, प्रसंगी ताडाफाड बोलणारा पण मनात काहीही न ठेवणारा, मुळचा बुधगावचा, गरीब कुटुं‌बात जन्माला आलेला, वडील कॉटन मिलमध्ये नोकरीला होते, त्याला चार बहिणी हा एकटाचं. वडीलानतंर घरीच जबाबदारी, आईचे आजारपण या सर्व गोष्टी पार पाडताना खचून न जाता खंबीर पणे उभारणारा.
शालेय जीवन प्राथमिक शाळा गावभाग बुधगाव, माध्यमिक शिक्षण बुधगाव हायस्कूल बुधगाव, आणि कलेच्या प्रेमापोटी शांतिनिकेतन कलाविश्व महाविध्यालय सांगली, साखर कारखाना येथे, ए.टी.डी.ए.एम. बी.ए. कलाशिक्षक म्हणून जत येथे निवासी मूक बधिर विद्यालय,जत मध्ये सेवा रुजू झाला .तेथील वातावरणात रमला व जत हायस्कूलच्या प्रागंणात मात्र तो कायमचा स्थिरावला.
आदरणीय गुरुवर्य जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र प्रामाणिक, कष्टाळू, सेवेप्रती जागरूक राहून कलेची सेवा व अंगभूत असलेल्या अनेक कला विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचवून एक कलाप्रेमी, विद्यार्थीप्रिय शिक्षक बनला.
(आम्ही दोघेही मुळचे बुधगावचे, दोघेही एकाच गावात सेवा करताना मी ३० मार्च २०२२ ला मराठा मंदिराच्या श्री रामराव विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज जत मधून सेवानिवृत्त झालो. आम्ही दोघेही कलेच्या बाबतीत मुलांच्या मनात गोडी निर्माण केली.
शाळेच्या प्रागंणांत अनेक प्रयोग करून सतत मुलांच्या नाट्य अभिनय, चित्र, शिल्प, अक्षरलेखन, विविध स्पर्धा यामध्ये मुलांना सहभागी करून सतत प्रयोगशील शिक्षक म्हणून नावलौकिकास प्राप्त झालो. त्यामुळेच माझ्यामित्राला अनेक राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, लायन्स क्लब ऑफ जत, असे राज्य, राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांच्याकडे नेतृत्व गुण असल्यामुळेच महाराष्ट्र कलाध्यापक संघ, लायन्स क्लबचे,स्कॉऊट, गाईडचे  विविध जिल्हा ,राज्य स्तरावर पदे त्याला प्राप्त झाली. त्यातूनच अनेक गोष्टींना वाचा फोडून आपल्या कर्तृत्वाची भरारी दाखवून दिली.
लेखन, काव्य या प्रकारात त्याने उत्तम काम करून आपण कोणत्याच गोष्टीत कमी नाही. हे ही दाखवून दिले. कॉलेज जीवनात दैनिक केसरी' सांगली तसेच मुंबई येथील "दै. सामना" वृत्तपत्रांमध्ये उत्तम काम करण्याची संधी त्याला मिळाली .त्यातूनच ब्लॉक लेखन, विविध लेख प्रसिद्ध आहेत. फेसबुक, यासारख्या माध्यमाचा कलेच्या प्रचार, प्रसार यासाठी सोनं केलं. कोरोना काळात शिक्षकांच्या मध्ये ऑललाईन शिक्षण पध्दतीने शिक्षकांना विविध विषयांना स्पर्श करुन आपल्या उत्तम कार्य कौशल्याची छाप पडून विविध संस्था, जिल्हा परिषद यांना त्यांच्या  कार्याची नोंद घेण्यास भाग पाडले.
प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी अंक, संस्था इतिहास फोटो  चित्र प्रदर्शन परिश्रमामुळे   समृध्द झाले, त्यातील , चित्रे, फोटो ,माहिती या सगळ्या गोष्टी बरोबर त्याचे छपाईचे कामकाज या सर्व गोष्टी त्यांच्या नसतात पण त्यांने त्यामध्ये पदरमोड करून ओके पूर्ण करण्यास मोलाचे सहकार्य करून संस्थापर्यंत आदराचे स्थान निर्माण केले.
शासकीय ग्रेड परीक्षा, विविध चित्र स्पर्धा, यामध्ये मुलांना जास्तीत लाभ कसा होईल मुलांचे  कल्याण कसे होईल हेच उद्देश ऊराशी ठेवून प्रसंगी मुलांना आर्थिक  मदत करून त्यांना पुढे नेण्यास मदत केली.
शासकीय रेखाकला परीक्षा मध्ये डी.सी.एम.अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. स्काऊट,गाईडच्या गोडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित करून नवी दिल्ली, पुणे स्काऊट कॅम्प पर्यंत नेऊन प्राविण्य मिळवून दिले. त्यासाठी लागणारी साधन साहित सामुग्री स्वतः च्या खर्चाने होऊन ती शाळेला अर्पण केली .  असा माझा गुणी मित्र आज सेवानिवृत्त होत आहे. त्याने केलेल्या कला कार्याची नोंद संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक निश्चितच घेतील, असे मनापासून वाटते धन्यवाद , आर्शीवाद! देतील अशी आशा बाळगतो.
आशा या माझ्या मित्राला सेवानिवृत्तीच्या त्यांच्या कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा! देतो अनं भावी  आयुष्यासाठी    शुभचिंतन !
श्री. संजीव आनंदराव नलवडे, -चित्रकार, कलाशिक्षक, पर्यवेक्षक, प्रभारी माजी मुख्याध्यापक, मराठा मंदिराचे श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, जत.ता.जत जि.सांगली.

Comments