अष्टपैलू व्यक्तिमत्त्व: श्री.सुभाष शिंदे,सर

 अष्टपैलू व्यक्तिमत्व- श्री.सुभाष शिंदे सर.
एक आदर्श शिक्षक, लेखक, कलाकार , चित्रकार  म्हणजे जत हायस्कूल ,जत मध्ये कार्यरत असणारे श्री. सुभाष शिंदे सर. सर्वांचे प्रिय व कितीतरी पिढ्या घडवणारे सुभाष शिंदे सर.
आम्हां विद्यार्थी-विद्यार्थीनीचे प्रिय कला शिक्षक शिंदे सर. आज खूप काळ सर्व कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन सजावट करणार, विकासाला काळ सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत, विविध प्रकारची चित्रे काढायला शिकवणारे, विविध कथा रंगवून सांगणारे अत्यंत सुंदर अध्यापन करून विद्यार्थ्यांचे मन जिंकणारे विद्यार्थ्यांच्या मनात सुंदर असे घर करणारे आमचे सर्वस्व म्हणजे शिंदे सर आज आमच्या शाळेला कायमचा निरोप देत आहेत. ही गोष्ट जत हायस्कूल जत साठी खूप दु:खद आहे. पण आम्हांला माहीत आहे की शिंदे सर आम्हांला कधीच विसरणार नाही. दर वेळी कोणत्याही कार्यक्रमात उपक्रमात ते दिसतील ,सह‌भागी असतील. कोणत्याही कार्यक्र‌मात त्यांचा फोल्डीग चा फोन कायम कार्यक्रमाच्या, उपक्रमांच्या व्हीडीओं साठी तत्पर असतो. नक्कीच मीच त्यांच्या फोन मध्ये शाळेचेच जास्त फोटो असातात. दर वेळी न‌वनवीन दिनविशेषांनी सजव‌ले केलेलं सुंदर नक्षीकामामध्ये फलक लेखनाने शाळेची शोभा वाढतात.
त्यांचे अक्षर म्हणजे जणू मोती, हिरे. त्यांच्या स्काउट-गाईड च्या             न्युनिफॉर्म मध्ये एखादया फ्लाइंग ऑफिसर सारखे शोभून दिसतात.
आषाढी वारी मध्ये वारकऱ्यांच्या रूपात जय हरी विठ्ठल म्हणून नाचण्यात दंग असत. शाळेत दिंडी मध्ये त्यांच्याच पुढाकार असतो.
आमच्या शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमांत अशाच विविध उपक्र‌मात पुढाकार घेऊन आमचे मनोरंजन करी. विविध स्पर्धा घेत जसे - रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा 
अशा विविध स्पर्धा घेऊन विदयार्थ्याची कला वाढवण्याचा प्रयत्न नेहमीच करत. मला सांगायला आनंद होतोय की दि फ्रेंडस् असोसिएस‌न जत चे जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत ही शाळा अत्यंत नशीबवान आहे.की आतापर्यंत एक आदर्श व्यक्तीमत्व श्री. सुभाष शिंदे सरांचे सहकार्य त्याभले.
या सेवानिवृत्ती नंतर त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे जीवन सुखांत, आंनदात जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.....!
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा..
-कु.संस्कृती कुलकर्णी.               ( विद्यार्थिनी)
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत.ता.जत जि.सांगली.

Comments