६५वे महाराष्ट्र शासन कला प्रदर्शन -२०२५/२६
📌
बुधवार, दिनांक : ११/०२/२०२६
| नि | मं | त्र | ण |
नमस्कार.....
विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन सोमवार, दिनांक १६ ते रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन, सांगली येथे होत आहे. या प्रदर्शनाचा उद् घाटन समारंभ सोमवार, दिनांक १६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता लोकरंगभूमी, शांतिनिकेतन, सांगली येथे होणार आहे. प्रदर्शनाचे उद् घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उद् घाटन समारंभास आपण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
राज्यात कला संचालनालयाच्या आस्थापनेखाली शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला महाविद्यालये कार्यरत आहेत. या कला संस्थांमध्ये दृश्य कलेतील विविध पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवले जातात. या सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने विविध जिल्ह्यात या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे प्रदर्शन सांगलीत होत आहे. प्रदर्शनात आठ विभाग आहेत. यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम, रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कलाशिक्षक प्रशिक्षण, कला व हस्तव्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, वस्त्रकाम, मातकाम), आणि दिव्यांग विभाग यांचा समावेश आहे. यावर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३४९० विद्यार्थ्यांच्या सुमारे ५६८० कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त कलाकृतींपैकी १२७५ कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत. या प्रदर्शनाच्या उद् घाटन समारंभात ज्येष्ठ चित्रकार आणि कलाविश्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी.एस. माजगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सुमारे २० वर्षानंतर हे प्रदर्शन सांगलीत होत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि उद् घाटन समारंभासाठी आपण आवर्जून यावे, याकरिता हे आग्रहाचे निमंत्रण!
*प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.*
आपला
प्राचार्य बाळासाहेब पाटील
कलाविश्व महाविद्यालय,
शांतिनिकेतन, सांगली
*सहाय्यक प्रदर्शन अधिकारी,*
६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन
(विद्यार्थी विभाग)
▪️▪️▪️
स्थळ: शांतिनिकेतन लोक विद्यापीठ
५६वे महाराष्ट्र शासन कला प्रदर्शन-२०२५ -२०२६ वैशिष्ट्ये:
राज्यभरातील साकारलेल्या एकूण १२७५ कलाकृती.
२२ वर्षानंतर सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन भरते आहे.
ही प्रदूषण दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भरणार आहे.
एकूण आठ विभागात कलाकृती मांडली आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आग्रहाने हे प्रदर्शन सांगलीत आणलै आहे.
प्रथमच शालेय विद्यार्थी विभाग यामध्ये शासकीय रेखाला परिषदेच्या गुणोत्तर यादीतील प्रथम प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण दहा आणि बाल चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील एकूण १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रथमच राज्यकला प्रदूषणाच्या व्यासपीठावर गौरव केला जात आहे .
कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहिले पाहिजे .शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली येथे येतील ,पालकांनी यावे. कला समजून घ्यावी .तिचा आनंद घ्यावा २२ वर्षानंतर हा योग सांगलीत आला आहे .आम्ही खूप उत्सुक आहोत .तयारी पूर्ण झाली आहे. सांगलीकरांनी या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा श्री .बाळासाहेब पाटील प्राचार्य कला विश्व महाविद्यालय सांगली.
एस.आर्टस् न्यूज
artshinde123 @gamil .com
Comments
Post a Comment