श्यामची आई (संक्षिप्त २०२५) साने गुरुजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न....
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला, सांगली जिल्हा साने गुरुजी कथामाला, आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातून 'श्यामची आई' (संक्षिप्त आवृत्ती २०२५)
पुस्तक प्रकाशन सोहळा
कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
डॉ. प्रा. टी. एस. पाटील कोल्हापूर. (रयत शिक्षण संस्था सातारा, लाईफ मेंबर एक्झीक्युटिव्ह कमिटी सदस्य कार्याध्यक्ष माधवराव बागल विद्यापीठ, कोल्हापूर)
सौ. नीलम रमेश माणगावे (साहित्यिका, जयसिंगपूर)
मा. सिद्धेश्वर झाडबुके संक्षेपक - श्यामची आई पुस्तक.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. हसन देसाई (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई)
स्वागताध्यक्ष
मा. लालासाहेब पाटील (मार्गदर्शक व विश्वस्त, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई)
कार्यक्रमाचे स्थळ:
श्री वसंतराव चौगुले नागरी सह .पतसंस्था मर्या .कोल्हापूर येथील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आंतरभारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर वि .स. खांडेकर प्रशाळेच्या शेजारी व्यापारी पेठ, शहापुरी, कोल्हापूर.
दिनांक:१६ नोव्हेंबर २०२५.
रोजी सकाळी ११.०० वाजता
सप्रेम नमस्कार
श्यामची आई पुस्तकाचे लेखक मातृहृदयी पूज्य साने गुरुजी व साने गुरुजी कथामालेचे संस्थापक आदरणीय प्रकाश भाई मोहाडीकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
आपणा सर्वांना माहित आहे की, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला घरोघरी वाड्या वस्तीवर जाण्याकरता श्यामची आई या पुस्तकाच्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत या पुस्तकाचे विविध २६ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक जागतिक कीर्तीचे झाले आहे. या पुस्तकावर कथामालेच्या वतीने कित्येक वर्षे महाराष्ट्रभर व गोवा राज्यात संस्कार परीक्षा घेतली जाते याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाखो मुला-मुलींच्या हातात तसेच घरोघरी हे पुस्तक पोहोचले आहे. संस्कार परीक्षेचे काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या असे निदर्शनास आले आहे की, २ री ते ७वी या बालगटासाठी सध्याचे २१२ पानी श्यामची आई हे पुस्तक व त्यावरील प्रश्न मुलांच्या वयोगटानुसार जड व अडचणीचे वाटत आहेत. त्यामुळे दिनांक ११ जून २०२५ रोजी झालेल्या साने गुरुजी कथामाला कार्यकारणीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होऊन सध्याचा २१२ पानांच्या पुस्तकातून संक्षिप्त असे छोटे पुस्तक केवळ ६४ पानांचे तयार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याची आता पूर्तता होऊन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूरचे वि. स. खांडेकर प्रशाला शाहूपुरी, कोल्हापूर या ठिकाणी थोर शिक्षण तज्ञ माननीय श्रीमती सरोज पाटील (माई) यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. याचा आम्हास रास्त अभिमान आहे सदरचे पुस्तक अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी कार्यकर्ते साने गुरुजी प्रेमी सर्व स्तरावर प्रयत्न करणार आहेत. या पुस्तकाच्या रूपाने आईचे सुसंस्कार मुलांच्या मनामनात रुजणार आहेत श्यामची आई हे पुस्तक सुसंस्काराचे स्तोत्र असून बालमने सुसंस्कृत व्हावीत त्यांनी मोठेपणी आई-वडिलांची सेवा करावी, मानवतेच्या भावनेने देश सेवा करावी, राष्ट्रीय एकात्मता जोपासावी ही तळमख या पाठीमागे आहे. याकरिता साने गुरुजींचा अनमोल संदशे या पुस्तकाच्या रूपाने घरोघरी पोहोचविण्यासाठी हा खटाटोप व धडपड करीत आहोत. २१२ पानी मोठ्या पुस्तकातून हे ६४ पानांचे संक्षिप्त छोटे पुस्तक तयार करण्याचा हा योगायोग मा. श्री. सिद्धेश्वर झाडबुके यांच्या सहकार्याने कथामालेने यशस्वीपणे साकार केला आहे. बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विश्वात्मक संदेश देणाऱ्या गीतांचा आशय आपण सर्वजण अंगीकारुया. असे या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो आणि पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
धन्यवाद !
आपलाच
हसनभाई देसाई
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई
साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातून श्यामची आई ( संक्षिप्त आवृत्ती :२०२५)
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात श्री. सुभाष शिंदे सदस्य ,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई यांना नवीन आवृत्ती पुस्तक भेट देताना मा. हसन देसाई राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय कथामाला मुंबई यांनी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लेखक सिद्धेश्वर झाडबुके ,मुंबई कथामालेचे
व कोल्हापूर जिल्हा , मुंबई कथामालाचे सदस्य उपस्थित होते.
लेखक: सिद्धेश्वर झाडबुके,श्री.सुभाष शिंदे, सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई
आयोजक समिती सदस्य:
मा. डी.आर. माने इंजिनिअर शिरोळ
मा. भिमराव भेडिगिरे उजळाईवाडी, कोल्हापूर
मा. जगनाथ कांदळकर
निगवे खा।।
मा. बाजीराव गोंगाणे
निगवे खा।।
मा. पंडित कांबळे
जत, जि. सांगली,
मा. सुभाष शिंदे
जत, जि. सांगली
मा. रघुनाथ मोरे
भिलवडी, जि. सांगली
मा. शिवाजी दुर्गाड
मिरज, जि. सांगली
मा. सुधाकर माने
पिरानकवठे, जि. सांगली
मा. एस. एस. सावंत
समता विद्यालय, कोल्हापूर.
सौ. रुबिना अन्सारी
माझी शाळा, कोल्हापूर
मा. यशवंत माने
उदगाव, जि. कोल्हापूर.
मा. बिलास पाटणकर
कारदगा, कर्नाटक
सौ. रेणुका पाटणकर
कारदगा, कर्नाटक
मा. श्याम पाटील
मा. मोहन कांबळे
मा. संजय वाघ
मा. महेश कांबळे
जांभळी
मा. सात्ताप्पा पाटील
कंथेवाडी, जि. कोल्हापूर
मा. सुरज मणेर
कंथेवाडी, जि. कोल्हापूर.
मा. मधुकर शिर्के
मिलिंद हायस्कूल कोल्हापूर
मा. शरद पडळकर
कासारवाडा, जि. कोल्हापूर
मा. संजय रेंदाळकर
इचलकरंजी
मा. अशोक पाटील
इचलकरंजी
मा. इंद्रायणी पाटील
इचलकरंजी
मा. अनिल होगाडे
मा. अशोक चौगुले
इचलकरंजी
मा. अनिल ई. चव्हाण
कोल्हापूर
मा. डी. के. रायकर
कोल्हापूर
मा. रिटा रॉड्रीग्ज्स
इचलकरंजी
मा. संजय सौंदलगे
कोल्हापूर
मा. वृषाली कुलकर्णी
कोल्हापूर
मा. रंगराव कांदळकर
कोल्हापूर
मा. राजाराम संकपाळ
कोल्हापूर
मा. राजेश मोरे
उदगांव
मा. मारुती शिणगारे
कोल्हापूर
मा. गोपाळ पाटील
कोल्हापूर
प्रमुख उपस्थिती:
मा. बाबुराव पाटील
कार्याध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई
मा. मोहन सावंत
सल्लागार मंडळ सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई
मा. सुनील पुजारी
प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई
मा. गुलाबराव पाटील
कोषाध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई
मा. रमेश काळे
परीक्षा प्रमुख अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई
मा. पांडुरंग नाडकर्णी
ज्येष्ठ कथामाला मार्गदर्शक, गोवा
मा. रवि (दादा) बाबुराव मुळीक
संचालक आंतरभारतीय शिक्षण मंडळ, कोल्हापूर
मा. पांडुरंग शिंदे
कार्यालयीन व्यवस्थापक अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई
मा. जे. बी. बारदेसकर
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला
मा. मोहन देशमुख
(अध्यक्ष, सांगली जिल्हा साने गुरुजी कथामाला)
मा. भरत अलगौडर (शास्त्री)
(सहसचिव, आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर)
मा. सौ. संध्या वाणी
(सचिव प्राथमिक विभाग, आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर),
मा. सौ हेमलता पाटील
(सचिव, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला)
मा. रावसाहेब पाटील, कुरूंदवाड
(उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला)
मा. वसंतराव पाटील बापू कंथेवाडी,
(उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला),
नम्र आयोजक:
मा. अशोक चौगले कोल्हापूर
मा. विठ्ठलराव पाटील कळे
मा. रियाज मगदुम कोल्हापूर
मा. सुजित देसाई कोल्हापूर
मा. महेश कळेकर शिरोळ
मा. विजय भोगम कोल्हापूर
मा. शामराव कांबळे रांगोळीकर कोल्हापूर
अॅड. आर. एम. जाधव सांगली
Comments
Post a Comment