कलेच्या अंगणात सामाजिक, शैक्षणिक तुळशी वृंदावन व सांगली जिल्हा तील कलाविश्व १९८५ चार सच्चा मित्र श्री.प्रविणकुमार जगताप....

कलेच्या अंगणात सामाजिक, शैक्षणिक तुळशी वृंदावन व सांगली जिल्ह्यातील कलाविश्वचा १९८५ चा सच्चा मित्र म्हणजे श्री. प्रवीणकुमार जगताप सर.....‌ 
श्री पांडुरंग विद्यामंदिर,श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीचे आदर्श आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कलाशिक्षक माझे मित्र श्री. प्रवीणकुमार जगताप सर
सेवापूर्ती समारंभ होत आहे. त्यानिमित्त माझे दोन शब्द मनोगत....      आम्ही कलाशिक्षण घेत नकळत प्रवीणशी कधी मैत्री झाली हे कळालेच नाही.त्याचे रूपांतर अगदी घट्ट मैत्रीत होऊन गेले. माझ्या मित्राची अनेक गुणवैशिष्ट्ये मला जाणवली.ती प्रवीणकुमारची ही माझी मैत्री संबंध १९८६ पासून ते आज  २०२५ अखेर जसेच्या  तसेच आहेत !
कलाविश्व महाविद्यालय, सांगली येथे कलाशिक्षण घेत असताना माझी परिस्थिती व त्याचीही परिस्थिती खूपच हालाख्याची  होती. त्यामुळे आमची प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर असायची.प्रवीणकुमार जगताप हा मित्र बुधगाव येथील वसतीगृहात राहत असे. त्यामुळे त्याचे माझ्या बुधगावच्या गावी घरी येणे जाणे असायचे.आमच्या घरातील आई बरोबर प्रेमाने बोलत असे. प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष, मोजकेच बोलणे,  कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घेत होता.तसेच चित्रकला महाविद्यालयामध्ये 
सर्वांशी प्रेमाने वागत असे. प्राचार्य,प्राध्यापक  यांच्याशी त्याचे संबंध चांगले होते. सर्व मित्रांशी आनंदाने गप्पा मारत असे.खरंतर त्यांची वेशभूषा आज अशी आहे तशीच होती. आजही या सर्व गोष्टी आठवत आहेत.कलाशिक्षक पदविका कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आपापल्या क्षेत्रांमध्ये आपल्या जिल्ह्यातच नोकरी मिळाली.पण त्यावेळी असणारी मैत्री आज पर्यंत टिकवली.खरंतर आज श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर या शाळेचा कायापालट करणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा एक कलाकार,एक पत्रकार,एक सामाज सेवक,एक सामाजिक जाणीव असणारा विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक,याचे दर्शन आज पाहिला मिळते. विठ्ठलवाडीच्या या शाळेमध्ये असताना प्रवीण सरांनी विविध उपक्रम राबवले हे राज्य,राष्ट्रीय स्तरावर ज्या समस्या आहेत. त्यावर कशी मदत करायची.ही भावना त्यांच्या विविध उपक्रमांमधून मला  दिसून येते. विशेषता विद्यालयात गेल्या दहा वर्षापासून २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिमण्यांसाठी घरटी शाळेत तयार करून शाळेच्या परांड्यात व विद्यार्थ्यांच्या घरासमोर लावली गेल्याने विद्यार्थ्यांमध्येही पक्षी प्रेम आजही पाहावयास मिळत आहे. प्रवीण सरांचे अनेक उपक्रम खूप खूप छान आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून प्रभावीपणे राबवला जाणारा पर्यावरण पूरक उपक्रम तो म्हणजे गणपती उत्सव वेळी निर्माल्य  संकलन करण्याचा उपक्रम! या माध्यमातून नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.सामाजिक हित संभाळताना त्यांनी विद्यार्थ्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष दिलं  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यालयातही पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आहेत. विशेषता पालापाचोळ्यापासून गांडूळ खत, कंपोस्ट खत, प्लास्टिक कचरा निर्मूलन, रेन हार्वेस्टिंग प्रकल्प अशा प्रकारचे पर्यावरण पूरक अनेक उपक्रम विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले. संस्था,संस्थाचालक ,पालक -बंधू भगिनी आणि मुख्याध्यापक व सर्व सहकारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी यांची एक सुंदर माळ करून सुंदर काम श्री.प्रवीणकुमार जगताप सरांनी केल्याचे त्यांच्या उपक्रमांच्या माध्यमातून दिसून येते.खरंतर शाळेमध्ये हे सर्व उपक्रम व समाजकार्य शाळा पाहूनच शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी केलेलं काम हे त्यांच्या कार्याची वैशिष्ट्य! 
सौ. रोहिणीताई जगताप वहिनी यांना पण धन्यवाद दिले पाहिजेत.कारण माझा मित्र प्रवीणकुमार जगताप सर हे  शाळेमध्ये काम करीत असताना सौ.जगताप वहिनी यांनी समर्थ साथ दिली. कुटुंब सांभाळून सरांच्या या शैक्षणिक, सामाजिक शालेय रथाला दुसऱ्या चाकाची साथ  दिली! त्याबद्दल सौ. जगताप वहिनींचे मनापासून हार्दिक अभिनंदन!   तुझा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मन भरून आलं मित्रा ! तुझ्या कार्याची जाणीव वेळोवेळी झाली .आता एक तुझ्याकडे मागणं आहे.आता सौ. वहिनी मुलांच्या संसारामध्ये यांना खास वेळ दे.जीवनामध्ये ज्या संकल्पना राहिलेत.त्या पूर्ण कर! वेळ मिळाला तर सर्व मित्रांशी संवाद साधायला विसरू नकोस ! सेवापूर्ती नंतरचे हे जीवन आनंददायी,सुखदायी,आरोग्यदायी आणि कुटुंबासोबत जावो ही सदिच्छा !
मित्रा मी पण मार्च महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहे बघ प्रवीण! बुधगावला येऊन जा तुझी वाट मी वाट पाहतोय....! सरांच्या पुढील कार्यास माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!  
तुझा मित्र  -सुभाष शिंदे

Comments