शाळा माझ्या संगे बोलू लागली....!

शाळेला सुट्टी होती तरी पण मी शाळेला भेट देत असतो .आज काय मजा झाली . शाळेने मला हाक मारली....! अहो ! शिंदे सर तुम्ही आता सेवानिवृत्त होणार आहात.  मग पुढे कसं करणार .मी खरं आजूबाजूला पाहू लागलो .कोण बोलतोय ! शाळाच माझ्याकडे बघून बोलत होती.असा मला भास झाला .मी एकटाच उभा होतो .गेले ३५ वर्ष या शाळेमध्ये नियमितपणे येणारा आणि घरी जाणारा आणि सुट्टीच्या वेळेस मध्ये सुद्धा शाळा भेट देणारा मी एक शिक्षक ! खरं तर शाळा माझी माता च आहे ! मी माझ्या जन्मदेत्या मातेजवळ २३ वर्षे राहिलो .पण ह्या शाळामाते  जवळ मध्ये मला ३५ वर्ष स्वतःमध्ये सामावून घेतलं, .आधार दिला ,लढण्याचे बळ दिलं ,शाळा ही निर्जीव मी मानत नाही. ती सजीवच आहे .मी सर्व इमारतीकडे बघत होतो .प्रत्येक वर्ग इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत .प्रत्येक वर्गामध्ये अध्ययन करताना मला जावं लागत असे .प्रत्येक वर्गाची आठवणी माझ्या मनामध्ये आहेत . आज इयत्ता -५वी तु.ब ची एक आठवण सांगणार आहे. सुरुवातीला मी    .नवीन होतो.तेव्हा इयत्ता :पाचवी  तुकडी-ब च्या वर्गामध्ये अशा असंख्य घटना घडल्या त्या आजही माझ्या मनात आहेत .मी ज्या वेळेला लागलो. त्यावेळी माझी परिस्थिती गरिबीची होती. जेवण  आणण्यासाठी  डबा सुद्धा माझ्याकडे नव्हता .मी कापडामध्ये बांधून जेवण आणत होतो .तेव्हा शाळेतील मुला ,मुलींनी  ते पाहिलं की सरांच्या कडे डबा नाही. १२ मार्च हा माझा वाढदिवस असतो .पण मी साजरा करीत नाही .फक्त त्या दिवशी एक नवीन संकल्प करतो. प्रत्येक वर्षी मला नवीन काही करता आलं पाहिजेल .ही संकल्पना  माझ्या मनाअसायची ! नेहमीप्रमाणे मी पहिल्या तासाला इयत्ता -पाचवी तुकडी ब च्या वर्गात गेलो .तर सर्व मुलं उभारून हॅप्पी  बर्थ डे..., वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! म्हणत होती .मला कसं  तरी जाणवलं कारण मी कधीही वाढदिवस साजरा केला नव्हता. ज्या विद्यार्थी , विद्यार्थिनींनीला मी शिकवतोय त्यानीच माझा हॅपी बर्थ डे ,वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे मला कस तरी  वाटलं .मी कसातरी टेबलावर हजेरी पत्रक  ठेवले. सर्वांना धन्यवाद देऊन बसा म्हणून सांगितले. थांबा !तुम्ही बसायचं नाही. अरे हे काय थांबा, आम्ही तुमचा वाढदिवस करणार आहे. असं म्हणल्यावर माझ्या मनात खूप वाईट वाटलं आणि डोळ्यातून आनंदअश्रू येऊ लागले .कारण माझ्या जीवनातला पहिला वाढदिवस माझ्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थीनीं विद्यालयात  वाढदिवस करत आहेत .असं मला वाटलं अरे करू नका .मुख्याध्यापक येथील रागावतील असं काय करू नका... 
एक विद्यार्थिनी म्हणाली सर काळजी करू नका. ते पण या कार्यक्रमाला येणार आहेत .मला  जास्त भीती वाटली कारण शाळेमध्ये वाढदिवस साजरे करण्याचा प्रथा नव्हती.  त्यामध्ये मा. मुख्याध्यापकांना या कार्यक्रमासाठी बोलावलंय असं म्हटल्यानंतर मला खूप भीती वाटू लागली . तेवढ्यात मुख्याध्यापक आले. कार्यक्रमास सुरुवात झाली. कुणी केक आणला ,कुणी फुगे आणले, कोणी .चॉकलेट आणले .अशा तऱ्हेने प्रथमच मी केक कापला .मुख्याध्यापकांनी सुद्धा माझे अभिनंदन केले .वाढदिवसाला शुभेच्छा! दिल्या. तुमच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येवो! अशी  प्रार्थना केली .मी साहेबांना सांगत होतो .साहेब! मी त्यांना वाढदिवस साजरा करू नका असे सांगितले होते.. ते मुलं उत्स्फूर्तपणे साहित्य घेऊन आले आहेत. मला माफ करा साहेब,  शांत बसा सर ...मला सर्व माहिती आहे. हा वाढदिवस साजरा करण्याची  विद्यार्थी ,विद्यार्थिनी परवानगी घेतली आहे .काळजी करू नका तुम्हांला काही ही होत नाही .तेवढ्या मध्ये एका खुर्ची मध्ये मी आणि  दुसऱ्या खुर्चीमध्ये मा. मुख्याध्यापक यांना बसण्यात आलं. मुलांनी मनोगते व्यक्त केली. एक विद्यार्थिनीने एक बॉक्स घेऊन माझ्यासमोर आला. मा. मुख्याध्यापक म्हणाले , शिंदे सरांना ही भेट असु द्या. मला कसं तरी झालं. या मुलांना देण्यासाठी माझ्याजवळ काही नव्हतं .त्यांनी भेट वस्तू  दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी ती वस्तू दाखविण्यासाठी  सांगितलं.सर  तीन  कप्पाचा जेवणाचा डबा  दिला आहे .माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ आले .ज्या मुलांना मी शिकवतोय ,तीच मुले मायेच्या मदतीने वागतात .  माझ्याकडे जेवणाचा डबा नाही म्हणल्यावर वर्गणी काढून सरांना डबा देतात .ही संकल्पनाच मला खूप वेगळीच..  मनाला आधार देणारी वाटली! आज खरं म्हणजे वर्गामध्ये शिकवण्यासाठी मन लागेना कारण आपण ह्या मुलांना काहीतरी दिलं पाहिजेल .असं मला वाटलं.   त्यावेळी माझा पगार  सुरू झाला नव्हता .काय  करायचं लहान सुट्टी मध्ये मा.मुख्याध्यापक कडे जाऊन शंभर रुपये  उसने मागितले , मुख्याध्यापक म्हणाले ,सर कशाला पैसे  पाहिजेल.  सर ,मुलांनी वाढदिवस साजरा केला. त्याला काहीतरी खाऊ त्या  मुलांना देण्याची इच्छा आहे .पण माझ्याजवळ पैसे नाहीत .मुख्याध्यापकांनी लगेच १००/-रू. नाही तर २००/- रू. रुपये दिले .जावा सर, तुमच्या विद्यार्थी, विद्यार्थ्यांना खाऊ द्या..!  म्हणाले .हा प्रसंग माझ्या मनात सदैव विद्यार्थी प्रेमाची आठवण करून येणारा हा प्रसंग ! 
सेवानिवृत्तीच्या वाटेवर असताना असे प्रसंग हे आठवून मन भरून येते.
      - श्री.सुभाष शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत जि.सांगली.

Comments