कथामालेतून संस्कार करणारे: श्री. सुभाष शिंदे
चारित्र्य, सदाचार, प्रेम, भक्ती मनाची निर्मलता अशी शाश्वत जीवनमूल्ये रुजविण्यांसाठी मातेच्या हृदयाने, संवेदनशील मानाने सतत धडपडणारे कला शिक्षक सुभाष सदाशिव शिंदे जत तालुक्यातील पण पूर्ण सांगली जिल्ह्याला सुपरिचित असणारे उपक्रमशील शिक्षक आहेत. सुभाष शिंदे चित्रकला विषयाचे शिक्षक आहेत. ए.टी.ए.एम् (मुंबई) अशी त्यांची शैक्षणिक पात्रता ! त्यांची एकूण सेवा २६ वर्षाची! जत हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अॅण्ड सायन्स जत ही सरांची शाळा महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण तज्ज्ञ डॉ. श्रीपाद जोशी यांनी उभी केलेली, आकार दिलेली नामवंत शाळा. या नामवंत उपक्रमशील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी सुभाष शिंदे यांना लाभली आहे. सुभाष शिंदे यांनी पण या संधीचे आपल्या उपक्रमशीलतेने सोने केले आहे. सुभाष शिंदे यांचा मुलांसाठीचा सर्वांत महत्वाचा उपक्रम म्हणजे 'साने गुरुजी कथामाला' हा होय. शिंदे यांनी कथामालेच्या माध्यमातून आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजविण्यासाठी कांचा प्रभावी वापर शिंदे यांनी केला. ते स्वतः उत्कृष्ट कथाकथन करतात. मुलांना देशभक्तीपर संस्कार गीते शिकवतात. साने गुरुजींचे वाड्मय, कथा मुलांच्या मनाचे अन्न आहे हे सूत्र मानून शिंदे यांनी कथामालेचे कार्य आपल्या शाळेत कित्येक वर्षापासून उत्साहाने करीत आहेत.
शिंदे यांनी राष्ट्रसेवा दलाची शाखा जत येथे स्थापन केली आहे. या शाखेद्वारे ही राष्ट्रनिष्ठा व विज्ञाननिष्ठा मानवतावादी नागरिक घडविण्याची
तयांची धडपड त्यासाठी विकास शिबिर, सुरु व्यक्तिमत्त्व आहे.
विविध खेळ चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जातात. दीपावली सुट्टीमध्ये शिंदे सर प्रतिवर्षी एक उपक्रम राबवितात. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून भेटकार्ड तयार करुन घेतात व विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मामा-मामी व अन्य नातेवाईकांना पाठविली जातात. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. प्रत्येक वर्षी कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, शिल्प प्रदर्शन भरविले जाते.
शिंदे हे चित्रकला शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची रुची वाढावी यासाठी प्रयत्नशील असतात. मुलांकडून विविध विषयांवर चित्र काढून घेऊन ती विविध दैनिकांना पाठवितात. आतापर्यंत ३०० मुलांची चित्रे प्रकाशित झाली आहेत. शिंदे सर स्काऊट शिक्षक पण आहेत. शाळेस लागणारे स्काऊटचे सर्व साहित्य विकत घेतले आहे. जिल्हा, राज्य स्तरावरील गाईड शिबिरात सहभाग घेतला आहे. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळविली आहेत. कार्यालयाचे शिंदे सर उपआयुक्त आहेत. विविध शाळा व शिबिरांमध्ये त्यांचे मार्गदर्शन असते. मा. राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला आहे. बारावी 'कलाशिक्षण' हस्तपुस्तिकेचे लेखक मंडळाचे ते सदस्य आहेत. या हस्तपुस्तिकेसाठी त्यांनी रेखाटने केली आहेत. शिंदे सर वाचक आहेत. त्यांच्या संग्रही सुमारे ५०० पुस्तकांचे स्वतः चे ग्रंथालय आहे. श्यामची आई, व्यक्तिमत्व संजीवनी, कृष्णाकाठ, भारतीय कलेचा इतिहास, पत्री, ग. दि. माडगूळकर, मी वक्ता कसा झालो यासारख्या पुस्तकांचे वाचन शिंदे यांनी केले आहे. सुंदर चित्रांबरोबर साने गुरुजींचे सुंदर संस्कार मुलांच्या बाल मनावर करणारे जत हायस्कूलचे कला शिक्षक सुभाष शिंदे समाज ही सुंदर करण्यासाठी झटत आहेत.
सुभाष कवडे, लेखक ,भिलवडी
Comments
Post a Comment