श्री .सुभाष शिंदे कलाशिक्षक यांचा सत्कार...!


श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक यांचा सत्कार ..!                                                                                         ‌.             जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत.जि. सांगली यांचा सत्कार!*
जत (S.Art News) प्रतिनिधी :शासकीय रेखाकला परीक्षा, एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा 
केंद्र क्रमांक-111007 या केंद्रामध्ये श्री. सुभाष शिंदे गेली ३५ वर्ष  परीक्षेसाठी कामकाज करीत आहेत .कोणतेही काम सांगा ते नेहमी करतात .शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये जत मध्ये अनेक विद्यार्थी ,विद्यार्थिनी या परीक्षेत बसण्यास प्रवृत्त करून त्यांना मार्गदर्शन करतात.या परीक्षेमुळे श्री. शिंदे सरांचे अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक म्हणून आज महाराष्ट्र मध्ये कार्यरत आहेत .३०
मार्च 2026 रोजी श्री.सुभाष शिंदे सर सेवानिवृत्त होत आहेत आज जत परीक्षा केंद्रा तर्फे श्री .सुभाष शिंदे यांचा सत्कार श्री. पी.एम .कांबळे मुख्याध्यापक सर व तालुक्यातील कलाशिक्षकाच्या वतीने श्री. शिंदे सरांचा सत्कार शाल ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .सुरुवातीस श्री .पी .एम .  कांबळे सर यांनी या समारंभाची व श्री. सुभाष शिंदे यांची कार्यपद्धती सांगितली .त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर सत्कारमूर्ती श्री .सुभाष शिंदे , कलाशिक्षक यांनी ३५ वर्ष जत तालुक्यामध्ये
विविध कार्याची माहिती दिली .त्यानंतर कलाशिक्षक बंधू-भगिनीची मनोगते व्यक्त केली.
जत केंद्राचे प्रमुख श्री .जी .एस .शिंदे , कलाशिक्षक सर यांनी सुद्धा सरांच्या विषयी माहिती सांगितली .त्यानंतर डफळापूरचे कलाशिक्षक श्री .शरद कांबळे यांनी श्री .शिंदे सर स्काऊट गाईड ,लायन्स क्लब ,विविध सामाजिक संघटनेमध्ये सहभागी असतात .त्याची माहिती सांगितली. त्यानंतर सरांचे माजी विद्यार्थी ,कलाशिक्षक श्री .सुधीर उबाळे , कलाशिक्षक यांनी आभार मानले. या  समारंभास श्री .जितेंद्र शिंदे , कलाशिक्षक श्री .शरद कांबळे कलाशिक्षक ,श्री .किरण चव्हाण, कलाशिक्षक, थळपती मॅडम, प्राध्यापक नाईक ,सर प्राध्यापक सकटे सर व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.
 



Comments