बाल वारकरी दिंडी सोहळ ! हा जत हायस्कूल, जत.हा उपक्रम वेगळा !माझ्या मनी भावना दाटला...!
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आर्टस् अँड सायन्स, जत या शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केलं जाते. यामध्ये विशेष आकर्षण बाल वारकरी दिंडी सोहळा हे पण एक! खरं म्हणजे या सोहळ्यामध्ये मी पहिल्यापासूनच सक्रिय असतो . कारण मी एक माळकरी आहे. लहानपणापासून भजन ,कीर्तन यामध्ये रमणारा मी ! प्रथम पासून आज अखेर मी सहभागी होत असतो. आषाढी एकादशी आधी हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये साजरा करण्यात येतो . या उपक्रमामध्ये सुरवातीपासून वेगवेगळे बदल होत गेले .आता तर सुंदर सादरीकरण करण्यात येत आहे. ज्यावेळी हा उपक्रम जवळ येतो. तसतशी विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वतःहून विचारू लागतात .सर ,दिंडी सोहळा केव्हा आहे ? आम्हाला सांगा. यामध्ये बाल वारकरी वेशभूषा व दिंडी मधील नत्य प्रकार सराव करतात. काही विद्यार्थिनी विठ्ठलाच्या विविध अभंग यावरती नृत्य बसतात . आता आमच्या शाळेमध्ये सर्वजण यामध्ये मनापासून सहभागी होतात. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक खातं, अध्यापक ,अध्यापिका सक्रिय काम करतात .मा. मुख्याध्यापक सुद्धा यामध्ये बारीक-सारीक तपशील आम्हाला सांगतात . आमच्या मुख्याध्यापकांचे नाव श्री .पी.एम. कांबळे आहे. हे सुद्धा या बाल वारकरी दिंडीमध्ये सक्रिय स्वतः सहभागी होतात. दिंडीतल्या विविध प्रकारामध्ये स्वतः सहभागी होऊन आनंद घेतात. वारी उपक्रमांमध्ये सहभागी होणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी वारकरीच्या वेशभूषा मध्ये ज्यावेळी शाळेत येतात .जणू काही ते पंढरीच्या नगर आहे का ... असंच भास होतो. यावेळी तर सर्व शिक्षक, शिक्षिका वारकरी गणवेशात मध्ये येण्याचे आव्हान मा. मुख्याध्यापकांनी केले होते .त्यामुळे खूप मजा आली. यावेळी टाळ ,मृदंग याची साथ होती. कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेव्हा दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शाळेच्या मैदानावर ओळीने टाळ , मृदुंग या वाद्यासह हजर होती .मा .मुख्याध्यापक श्री. कांबळे सर व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका व पालक बंधू-भगिनी सुद्धा सहभागी झाले होते. उपक्रमाची सुरुवात झाली .ज्ञानबा तुकाराम! पंढरीनाथ की जय! तुकाराम महाराज की जय ! या जयघोष मध्ये दिंडी शाळेच्या प्रवेशद्वारातून शाळेकडे प्रस्थान झाली . दोन्ही इयर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी बसले होते. ठिकठिकाणी रांगोळी टाकली होती. स्टेजच्या जवळच विठ्ठल, रुक्माई च्या रूपात विद्यार्थी उभे होते .ज्यावेळी वाद्यांच्या साथीने दिंडीचे प्रस्तान झाल्यामुळे सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी टाळ्यांच्या घोषात स्वागत केले .त्यानंतर पालखीचे आगमनापासून सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले.तुकाराम मी महाराज करू जत ! जयघोष करत होती. विना श्री .सुभाष शिंदे सर यांच्याकडे होता. टाळ मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या गळ्यामध्ये होता. मृदुंग श्री .चव्हाण महाराज वाजवत होते .त्यावेळी दिंडीतील सहभागी विद्यार्थी टाळ ,तुळशीचं तुळस डोक्यावर घेऊन येत होते . सर्व वातावरण भक्तीमय झालेलं होतं. जणू काही जत शाळे मध्ये पंढरपूर आलं काय! असा भास झाला. दिंडी मध्ये सहभागी विद्यार्थी गोलाकार बसले .त्यानंतर भजनांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रतिमापूजन मा. श्री .पी.एम. कांबळे सर , मुख्याध्यापक, श्री. सुभाष शिंदे व इतर शिक्षक, शिक्षिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला .त्यानंतर प्रथमच सर्व शिक्षक बंधू - भगिनी यांनी रिंगण सोहळा मध्ये सहभागी झाले. मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षिका यांनी टाळाच्या आवाजात, मृदुंगाच्या ठेक्यात ठेका धरला. यावेळी मुख्याध्यापक व कलाशिक्षकांनी फुगडी फेर धरला. शाळेतील विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. आज आपले शिक्षक वारकरी विषयात आणि आणि वारकरी रंगात विविध दिंडी सोहळा आनंदमय वाटला. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून शिक्षकांचे कौतुक केले. त्यानंतर विद्यार्थी ,विद्यार्थिनींचे नृत्य प्रकार झाले .या नृत्याला सुद्धा विद्यार्थ्यांनी टाळीची साथ व मुखाने बोला विठ्ठल, विठ्ठल घोष नाद केला .कार्यक्रमा मध्ये पालक बंधू- भगिनी सहभागी होऊन यांनी सुद्धा टाळी वाजवून आनंद व्यक्त केला. सर्व प्रकार झाल्यानंतर शेवटी आरती झाली. या कार्यक्रमास दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत चे संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री. बिजरगी साहेब सुद्धा उपस्थित होते .त्यांना या उपक्रम , संयोजना बद्दल आनंद व्यक्त केला.
या उपक्रमामध्ये कु . हल्याळ मॅडम, माळेकर मॅडम, सौ. कुलकर्णी मॅडम, सर्व मॅडम, कलाश श्री.सुभाष शिंदे , कलाशिक्षक यांचे सहकार्य लाभले.
श्री.पी.एम.कांबळे,सर मुख्याध्यापक, श्री.एस.डी.चौगुले, उपमुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. अशा रीतीने बाल वारकरी दिंडी सोहळा विविध उपक्रमाणे साजरा करण्यात आला.
बाल वारकरी दिंडी सोहळा:
मनी दाटला भावना!
-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.
शाळेमध्ये कोणताही उपक्रम असू दे ! प्रत्येक उपक्रमांमध्ये मी सहभागी होऊन आनंद घेत असे. आज बाल वारकरी दिंडी सोहळा मध्ये मी सहभागी होत असताना मनामध्ये विविध भावना निर्माण झाल्या. कारण पुढील वर्षी होणारा हा दिंडी उत्सव यामध्ये मी सहभागी होणार नाही .कारण दि.३१ वर्ष २०२६ रोजी मी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या सोहळ्यामध्ये विविध उपक्रम राबवले .या दिंडी सोहळा उपक्रमाचे व्हिडिओ चित्र करण्यात आले .शिवाय फोटोग्राफी द्वारे या प्रत्येक क्षणांचे चित्रण करण्यात आले. युट्युब चॅनेल वरती ,फेसबुक वरती व व्हाट्सअप वरती या उपक्रमाला विशेष प्रसिद्धी देण्यात आली होती. या उपक्रमामध्ये एक विद्यार्थी ,विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक बंधू -भगिनी यामध्ये प्रेममय, आनंदमय वातावरण निर्माण होते. विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये शालेय जीवनामध्ये परस्पर सहकार्य , बंधुभाव,
पर्यावरण विशेषी उपक्रम, वृक्षारोपण ,स्वच्छता राखणे . राष्ट्रीय एकात्मता या भावना जपता येतात खरं ! मी माळकरी असल्यामुळे लहानपणापासून भजन, कीर्तन यामध्ये ही सक्रिय होतो .हा उपक्रम आल्यापासून मला खूप आनंद झाला . हा उपक्रम सुंदर कसा होईल याकडे माझे विशेष लक्ष होते .यासाठी यावर्षी तर वाद्य वाजणारे कलाकार व भजनामध्ये अभंग गाणारे व्यक्ती व आमच्या शाळेतील शिक्षक गीत गायन करतात त्यांना पण या उपक्रमाला विशेष प्रेरणा मिळाली. पुढील वर्षी हा उपक्रम ज्यावेळी सादरीकरण होईल .त्यावेळी मी नसेल पण हा उपक्रम तसाच पुढे सुरू असु दे ! असं मला वाटतं काही विद्यार्थी ,विद्यार्थिनी मला सांगत होते सर ,तुम्ही पुढल्या वर्षी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी नसणार ... काही विद्यार्थी म्हणत होते सर तुम्ही हा उपक्रम असल्यानंतर शाळेमध्ये या.. पण मी जत मध्ये असलो तर नक्कीच येईल ! असं त्यांना मी सांगितलं. खरंच शालेय जीवनातील विविध प्रसंग आपल्यासमोरून जात असतात. त्याच्या स्मृती आपल्या मनात सदैव असतात .दि फ्रेंडस् असोसिएशन जत चे जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आर्टस् अँड सायन्स , जत माझी संस्था जत तालुक्यामध्ये नव्हे ,तर जिल्ह्यामध्ये राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे.अशी शाळा आहे. या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक ,सामाजिक विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थी, विद्यार्थिनीं वरती सहज संस्कार होतात हे विशेष...!
- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.
Comments
Post a Comment