सौ.वर्षा शिंदे सौभाग्यवती ची साथ लाख मोलाची....!
शालेय कामकाज करीत असताना अनेक समस्या निर्माण व्हायच्या त्यावेळी माझी पत्नी सौ .वर्षा शिंदे यांची साथ लाख मोलाची होती. माझा विवाह झाल्यावर पासून आज अखेर प्रत्येक क्षणाला मदत करणारी माझी पत्नी होती .प्रतिकृती परिस्थितीमध्ये काम करत असताना योग्य मार्गदर्शन ,जे मला मिळेल घरामध्ये आज अखेर कोणतेही गोष्टीची काळजी मी केली नव्हती . प्रत्येक वेळी ती मला कधी मदत मदत करीत असे. अशी म्हणली नाही घरातील तीन कन्या वैभवी वैष्णवी आणि संध्या याच्या पालन ,पोषण शिक्षण याच्याकडे की जर लक्ष होतं .मी ज्यावेळी जत हायस्कूल जत मध्ये सहशिक्षक ,स्काऊट मास्टर , कलाशिक्षक या विविध भूमिकेमध्ये काम करीत होतो. तेंव्हा ती मला प्रेरणा देत होती. आणि यामध्ये आणि काय कराल याची माहिती देत असे. शाळेच्या पगाराबाबत मला काहीही माहिती नसायची .पण ती बिचूकपणे मला सांगायची. आज तुम्हांला एवढा फरक मिळणार आहे .तुमचा पगार एवढा आहे. ती सांगायची . मी पगाराची काळजी करत नसे... किती आहे याविषयी मला काही कल्पना असते बँकेत जाऊन पगार काढणे एवढेच मला माहिती असायचे . पण तिचं या गोष्टीकडे लक्ष असायचं हा पगार एवढा कमी का आला तेंव्हा मी चौकशी करणार .शालेय अध्यापन करताना ती सुद्धा शिक्षिका होती. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया मध्ये होणारे बदल ती मला नेहमी सांगत असते. तुम्ही असं करा, तुमचा फायदा आहे माझं शिक्षण घेताना सुद्धा तिने मला मदत केली. बी .ए .झालो. ए.एम. झालो. त्या पूर्ण कराण्यामागे मला तीचा पाठिंबा होता.हे विशेष ! स्काऊट ,गाईड ट्रेनिंग ( प्रशिक्षण ) उच्च शिक्षण प्राथमिक , प्रगत , हिमालय ग
ड कुठपर्यंत केलं त्याचे श्रेय तिला जातं कारण आम्ही प्रत्येक ट्रेनिंगला दोघे मिळून ट्रेनिंग पूर्ण केली आहेत फक्त हिमालय वुड ट्रेडिंग पूर्ण केले . काही प्रशिक्षणामध्ये तीचा सहभाग असायचा.जिल्हा ,राज्य ,स्काऊट कॅम्प (मेळावा ) मध्ये आम्ही सहभागी होत असे ,आमची अडचण एकच होती. आम्हांला तब्बू नव्हता .तेव्हा सांगली जिल्हा स्काऊट कार्यालय मध्ये तंबू विक्री सुरू होती. त्यावेळी दहा-पंधरा हजार रुपये ला तंबू विक्रीस होते . मला वाटलं जर आपण आपल्या शाळेला, आपल्याला तंबू असेल तर जिल्हा ,राज्य मेळावा मध्ये आपल्याला भरीव काम करता येईल. मी घरी आल्यानंतर सौ. वर्षा शिंदे माझ्या पत्नीस सांगितलं अशाशी तंबूत घ्यायची घेतले तर काय होईल शेजारचा विचार न करता तिने सांगितलं आपण तर बघ घेऊ आणि आम्ही पंधरा हजार रुपयांच्या तंबू विकत घेतला त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते कर्ज काढून तंबू घेतला स्काऊट ,गाईड यासाठी तंबू असणे गरजेचे होतं. एखादी पत्नी म्हणाली असती आपण साडी घेऊया.... आपण स्काऊट साठी तंबू घेणारी माझी पत्नी मला प्रेरणादायी वाटली ! तिचं पण प्राथमिक कब, बुलबुल, स्काऊट गाईड सर्व प्रशिक्षण झालेली आहेत .पण कोणतीही गोष्ट आपण दाखवायची नाही .असं तिचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये बारकावे मी तिच्याकडून शिकलो. मला सामाजिक ,शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा ही तिचीच मी प्रत्येक रविवारी घरी नव्हतो. कुठे साने गुरुजी कथामाला, कुठे स्काऊट कॅम्प कुठे, स्काऊटची मिटिंग कुठे ,कलाध्यापक संघटनेची मिटिंग या बाबी करताना माझी धावपळ चालू असायची या धापळीत मध्ये माझं माझ्या घराकडे लक्ष नसे. त्यावेळी सर्व बाजू सांभाळणारी माझी पत्नी मला लाख मोलाची वाटते ! मला अनेक पुरस्कार मिळाले .कौतुक झालं पण घरी आल्यानंतर ती मला नेहमी अशा गोष्टी सांगे माझे पाय जमिनीवर असायचे. एकदा असं झालं आम्ही मिरजेला पुरस्कार घेण्यासाठी जात होतो गाडीमध्ये मी आणि सौ वर्षा दोघेजण जात
होतो. समारंभ भव्यदिव्य होता. त्या कार्यक्रमात सुद्धा सौ .वर्षा शिंदे यांचे कौतुक करण्यात आलं .मी पुरस्कार घेताना खाली बसून आपल्या मोबाईलद्वारे माझं रेकॉर्डिंग करीत आहे. मग नव्हती. तेवढ्या मध्ये स्टेजवरच्या सन्मानीय पाहुणे म्हणाले ,मॅडम वरती आहे . मग तेंव्हावरती आली .हा सोहळा संपन्न होत होता .अभिप्रायसाठी मी उठलो तेव्हा मी हा पुरस्कार सौ. वर्षा शिंदे माझ्या पत्नीस अर्पण केला .आपला पती पुढे जात असताना त्याला मानपान मिळत असताना कधीही आपली बाजू तिनं कधी कमी लेखली नाही. जेवढा साने गुरुजी राज्य पुरस्कार प्राप्त झाला .त्यावेळी सांगली पासून कराड पर्यंत कराड मधील शिक्षक वृंद पाहुणे वृंद यांची सर्व नियोजन केले .खरंतर प्रत्येक गोष्टींमध्ये ती सिंहासारखी पुढे असते. प्रत्येक कार्यामध्ये मी पुढे जाऊन जे सामाजिक शैक्षणिक ,कार्यकर्ता त्याला नेहमीच प्रेरणा दिली .आज सेवानिवृत्तीच्या वाटेवर मी जात असताना माझ्या मनात खूप आदर आहे. आज समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी उद्याहरणे बघायला मिळत नाही. खरंतर माझ्या तीन कन्या ह्या सुद्धा उच्चशिक्षित आहेत . नोकरीस आहेत .याचे सर्व श्रेय तिला जाते. मी सेवानिवृत्त होत असताना आज समाजामध्ये जी नाती समाजामध्ये आदर्श काम करीत आहेत .
Comments
Post a Comment