जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत ... हीच माझी कार्याची पंढरी!
प्रथम माझी शैक्षणिक कार्याची सुरुवात मूकबधिर विद्यालय जत मध्ये झाली. काही काळानंतर मी मुंबई येथे दैनिक सामना येथे कला विभागात आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो . त्यानंतर मी परत माझ्या बुधगाव गावी यावे लागले. कारण माझ्या वडिलांचा अपघात झाला होता .त्यासाठी मी मुंबईवरून परत माझ्या गावी बुधगावला त्यानंतर मी परत मुंबई येथे जाणार होतो. सांगली येथील काही मित्रांनी मला सांगितले तू आता मुंबईला जाऊ नकोस , तुला मी सांगली जिल्ह्यामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा सांगली जिल्हा परिषदेचे लेखनिक भोसले साहेब यांनी तात्कालीन न शिक्षणाधिकारी मा.श्री. देसाई साहेब त्यांची भेट झाली .त्यानंतर मला जत येथे नोकरी मिळाली होती .प्रथम मी मूकबधिर विद्यालय जत येथे सेवा केली होती त्यावेळी मला डॉ. श्रीपाद जोशी साहेब यांची भेट झाली होती .हा ज्ञानवंत बुद्धिवंत यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली तर माझं सोनं होईल ! असं त्यावेळी हे
वाटलं ज्यावेळी मी जत शुद्ध जत हायस्कूल जत नोकरी साठी होकार दिला तेव्हा शिक्षणाधिकारी मल देसाई यांना पण आनंद झाला कारण शिक्षणाधिकारी व माजी आवड एकच होती त्यामुळे नोकरी मला मिळाली. त्यानंतर संस्थेचे कुलकर्णी सर ,स्वामी सर , मोटगी अण्णा तंगडी साहेब, सर्व संचालन मंडळ व डॉ. श्रीपाद जोशी यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली.
ज्यावेळी मी जत मध्ये आलो. त्यावेळी विद्यार्थ्यांना कलेची आवड होती. पण त्याला विविध घटकांची ओळख नव्हती .साहित्याची ,रंग साहित्य ते कसे वापरावे .याची माहिती नव्हती मी माहिती घेतली. तेव्हा मला कळालं जी मी नावे सांगतोय... ते सर्व साहित्य जत मध्ये उपलब्ध होत नाही. त्यावेळी मी जत मध्ये प्रत्येक दुकानदार ला मी सांगत होतो की ते तुम्ही दुकानांमध्ये चित्रकलेचे साहित्य दुकानांमध्ये ठेवा .म्हणायचे सर साहित्य ठेवा काय हरकत नाही पण हे साहित्य मुलांनी नाही घेतले तर मी काय करू.... त्यावेळी त्यांना मी एक सांगितले तुमचं साहित्य विद्यार्थी याची जबाबदारी माझी, मी तासाच्या वेळी लागणारे साहित्याची ही माहिती सांगत होतो. त्यावेळी ते विद्यार्थी सर हे साहित्य मिळत नाही. आम्ही कुठून आणू त्यावेळी मी त्यांना दुकानांची माहिती माहिती सांगून ते साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी पालक सुद्धा हा विषयाकडे लक्ष देत होते. विद्यार्थी, विद्यार्थिनी जर चित्र काढायला बसले ते त्या मुलास रागवायचे मी पालकांची सुद्धा प्रबोधन केले. कलेमुळे काय घडतं व इतर विषयास कशी मदत होते. मुलाची बौद्धिक ,मानसिक यामध्ये कसा बदल होतो . पालकांना उदाहरण सांगू लागलो. त्यावेळी पालक मी जे सांगतोय ते बरोबर आहे. असं त्याला वाटू लागलं, क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांना साहित्य मिळू लागलं आणि माझी कला अध्यापन करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला मी आवड निर्माण करणे आणि त्यातून रेखाटन यातूनच मुलांना कलेची आवडी निर्माण झाली. ते रेखाटन द्वारे आता रंगकामाकडे वळू लागली .आणि त्यांना रेखाटन बरोबर कौशल्य प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न केले .विद्यार्थी. विद्यार्थ्यांना निसर्गाकडे बघण्याची दृष्टी कशी असावी. निसर्गाकडून आपल्याला विविध घटकांची माहिती कशी मिळवावी याची आवडी निर्माण केली .आता विद्यार्थी ,विद्यार्थिनी होऊ लागली. ही चित्रे पाहून पालकांना सुद्धा आनंद निर्माण झाला .त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी जे काही सांगेल हे ऐकू लागले. पालक मला येऊन भेटू लागले . कुठे मिळते . सांगलीमध्ये मी जातो मी मुलांना माझ्या रंग साहित्य आणून देतो .असे म्हणू लागले. तेंव्हा मला आनंद वाटला .आपण जे प्रयत्न करतोय त्या गोष्टी यश मिळत आहे त्याची जाणीव झाली. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत . उदाहरणार्थ :जे गरीब विद्यार्थी होते पण त्यांना कलेची आवड होती .अशा मुलांसाठी मी माझ्या पैशातूनच त्यांना रंग साहित्य आणून देत होतो. त्यामुळे शाळेमध्ये सर्वांच्या कडे कला साहित्य उपलब्ध होऊ लागल्याबरोबर शाळेमध्ये विविध प्रकार मी त्या मुलांना शिकवत गेलो. आता वेळ होता की मुलांना स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी मदत करणे मी प्रथम माझ्या शाळेमध्ये चित्रकला ,हस्तकला त्रिमित आकाराची वस्तू तयार करून त्या चित्रांचे प्रदर्शन विविध निसर्ग चित्र, स्मरण चित्र याविषयी चित्रकलेची प्रदर्शने भरवू लागलो .त्यामुळे विद्यार्थी ,विद्यार्थिनीना, पालक बंधू-भगिनीना , संस्थाचालक ,शिक्षक- शिक्षिका यांना आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची कला पाहण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे पालकांना सुद्धा आनंद झाला .
मी चित्रकला स्पर्धेसाठी जिल्ह्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. तेंव्हा पालक बोलले, सर ,विद्यार्थ्यांना घेऊन जाताय... शहरातील मुले खूप हुशार असतात. आपली मुलं कशी आहेत , तेव्हा मी सांगितले ,असू दे माझी मुलं..! मुलांना घेऊन जिल्हा पातळीवर चित्रकला स्पर्धा कशा असतात याची जाणीव त्यांना होऊ दे ! तेंव्हा मी पालकांना संधी देण्या विषयी सांगितले . आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. तेंव्हा तेथील विद्यार्थी तेथील विद्यार्थिनी आम्हांस जत होऊन आल्याबद्दल नावे ठेवत होती. मुलं म्हणायची सर ,ती मुले आम्हाला नाव ठेवतात मी सांगितलं आपण येथे चित्रकला स्पर्धेसाठी आलो आहे तेव्हा तुम्ही स्पर्धेवेळी लक्ष द्या स्पर्धेसाठी कागद आला आणि जर चे विद्यार्थी, विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धेमध्ये सुंदर चित्र काढली दोन तासांमध्ये रेखाटन रक्कम करून ती चित्र मी गोळा केली आणि स्वयं स्वयं याकडे मी दिली मला वाटलं होतं आपला इथे नंबर येणार नाही मी मुले घेऊन त्या ठिकाणी जाऊ लागलो आम्ही एक किलोमीटर अंतरावर होतो तेव्हा त्या शाळेचा शिपाई धाव झाला अहो सर थांबा थांबा मला वाटलं माझ्या विद्यार्थ्यांनी त्या शाळेत काहीतरी चूक केलेली दिसते मी थांबलो तेवढा शिपायाला आणि म्हणाला सर कुठे निघालाय मी सांगितले निघाले अहो कुठे निघालात थांबा थांबा चला परत आम्ही तिथं काही चुकीचं काय केलंय का चुकीचे काय केले तुमच्या मुलाचे नंबर जास्त आलेत आणि बक्षीस बरोबर साठी तुम्हाला मुख्याध्यापकांनी बोलवलं आहे चला तेव्हा विद्यार्थी विद्यार्थिनी उड्या मारत आणून व्यक्त करत होती ही पहिली स्पर्धा होती की मी जिल्हा बाहेर मुल घेऊन गेलो होतो मला आनंद वाटला दुसऱ्या दिवशी पालकांनी मुख्याध्यापकांनी आमचा अभिनंदन केलं तेव्हापासून चित्रकला वर्धा असली की माझ्या जत हायस्कूल जत ची मुले पहिल्या क्रमांकाला असायची नंबर स्पर्धेला जायचं सहभागी व्हायचं चित्र काढायची अशी भावना मुलाच्या मध्ये मी रुजवली आज त्याचा वटवृक्ष झाला आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची चित्रे क्रमांक प्राप्त असतातच या चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेची जिद्द मेहनत आणि एकात्मक पद्धतीने आपण विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करतो ही भावना निर्माण झाली मला हेच बाहेर होतं आज माझे शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी अखेर विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये 90 ते 95 टक्के कलेची आवड निर्माण झाली आहेत.
Comments
Post a Comment