सांगली जिल्ह्यातील लीडर, ट्रेनर , स्काऊटर आणि गाईडर यांची सांगली येथे बैठक संपन्न झाली...



वरील विषयासंदर्भात सांगली जिल्ह्यातील लीडर ट्रेनर,स्काऊटर गाईडर यांची बैठक  सांगली येथे आज शनिवार दिनांक-१२/०७/२०२५ रोजी संपन्न झाली.
या बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातून विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये श्री.भालचंद्र सोनावणे, श्री अरविंद देशमुख, श्री लक्ष्मण थोरात, श्री प्रताप माने व श्री सुरेंद्र शिंदे हे उपस्थित होते.
या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक संपन्न झाली सांगली जिल्ह्यामध्ये स्काऊट गाईड विषयी आपली सेवा बजावलेले सेवानिवृत्त पदाधिकारी ,प्रशिक्षक  व स्काऊटर गाईडर या बैठकीस उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील लीडर ट्रेनर श्री वसंत माने यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यानंतर सातारा जिल्ह्यातील सोनवणे सर यांनी सांगली येथे जिल्हा संघटक (स्काऊट) म्हणून काम पाहिले आहे .त्यांनी आजच्या बैठकीचे मुख्य विषय व वृत्तांत कथन केला.
त्यानंतर सर्वांची मते लक्षात घेण्यात आली व त्यानंतर लीडर ट्रेनर श्री उद्धव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यामधील मुख्य विषय असा की भारत आणि गाईड ही एक स्वायत्त संस्था आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेची धुरा महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग यांचे मार्फत सांभाळण्यात येत आहे .परंतु याआधी जिल्हा कार्यकारी मंडळ व राज्य कार्यकारी मंडळ यांचे मार्फत स्काऊट गाईड या संस्थेचा कारभार चालत असे.पण आता असे निदर्शनास येत आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड या संस्थेची कामगिरी संख्यात्मक व गुणात्मकरीत्या ढासळत चाललेली असून त्यावर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
पूर्ण महाराष्ट्रातून विविध शाळातून विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते परंतु प्रशिक्षित प्रशिक्षक शिक्षक वर्ग शाळेमध्ये कार्यरत नसल्यामुळे स्काऊट गाईडचा अभ्यासक्रम प्रभावीरीत्या राबवला जात नाही.तसेच शिक्षकास प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले जात नाही.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्काऊट गाईड जिवंत ठेवण्यासाठी विविध उपाय योजना जिल्हा किंवा राज्यसंस्थेकडून होणे अपेक्षित आहे. परंतु मेळावे घेणे दुरापास्त झाले आहे.
अशाच आणखी काही कारणांमुळे सर्व प्रशिक्षक वर्ग जे निष्ठेने काम करतात त्यांना ही स्थिती पाहवत नाही म्हणून त्यावर कठोर उपाय योजना सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स या संस्थेची धुरा
प्रशासकांच्याकडून ADHOC कमिटीने स्वतःच्या ताब्यात दिनांक २४/०६/२०२५ रोजी घेतलेली आहे.
याविषयी २४/०६/२०२५ रोजी मुंबई येथे झालेली बैठकीनुसार वरील प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन तयार करून जिल्हा संस्था,  जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावयाचे आहे.
यासाठी प्रत्येक तालुक्यातून सह्यांची मोहीम आखून निवेदन देणे बाबत आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरलेले आहे.
तरी सांगली जिल्ह्यातील सर्व स्काऊटर आणि गाइडर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या तालुक्यातील स्काऊट व गाईड या विषयासंदर्भातील शिक्षक शिक्षिका यांच्या सह्या विहित नमुन्यांमध्ये घेऊन निवेदन तयार करावयाचे आहे.
आपल्या शेजारील जिल्हे सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये निवेदन या आधीच दिलेले आहे .म्हणून सांगली जिल्हा मागे राहू नये यासाठी लवकरात लवकर सह्यांची मोहीम पूर्ण करणे व निवेदन देणे गरजेचे आहे.
तसेच नवीन जिल्हा मंडळ स्थापन करण्यात येणार असून याबाबत सेवा म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या स्काऊटर आणि गाईडर यांनी इच्छा दर्शवावी.
हे निवेदन तयार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्रशिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतलेली असून त्याबद्दल त्यांचे आभार श्री मोहन निकम यांनी मानले.
या बैठकीला मध्ये श्री.सुभाष शिंदे,श्री.वसंत माने,श्री.उध्दव शिंदे, मोहन शिंदे, रविंद्रनाथ घाडगे, श्री. संजीव चौगुले, श्री. कुमार गुरव, श्री. राहुल टकले, श्री अमोल कुलकर्णी, सौ .शकुंतला पवार, सौ. शशिकला घाडगे , कमल घुगरे, संगीता कांबळे, बापूसाहेब सुतार, श्री.रशिद टपाल, श्री .रोहित गुरव,श्री. साहेबलाल यादव, श्री शाहीर पाटील हे उपस्थित होते.
त्यानंतर चहापाना नंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
वरील विषयावर ग्रुपमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

Comments