स्काऊटिंग मुळे जीवन झाले समृद्ध...! -श्री.सभाष शिंदे, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत.
शालेय जीवनामध्ये अनेक धडे मिळाले. खरंतर माध्यमिकला गेल्यानंतर मला वाटलं स्काऊट- गाईड हा विषय असेल वाटलं होतं पण मी ज्या शाळेत होतो .त्या शाळेत हा विषय नव्हता .नंतर ज्या वेळेस शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. त्या शाळेमध्ये स्काऊट - गाईड हा विषय होता . मनाला आनंद झाला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी हा विषय माझ्याकडे दिला. त्यावेळी माझे प्रशिक्षण झाले नव्हते .मी माध्यमिक अध्यापन करीत असताना कोर्स प्राथमिक ,प्रगत ,हिमालय वुड अशी प्रशिक्षण घेत गेलो . त्यानंतर स्काऊट, गाईड या विषयांमध्ये शिकवण्यामध्ये खूप मजा येऊ लागली .शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्काऊट शिक्षण घेत असताना विविध प्रकारची माहिती, प्रकारचे अभ्यासक्रम प्रथम सोपान, द्वितीय सोपान , तृतीय सोपान हा अभ्यासक्रम शास्त्रशुद्ध अध्यापन करताना आनंद झाला.
शालेय स्काऊट, गाईड यांचा गणवेश याकडे लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य जिल्हा संस्था आणून देण्यात आले.त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी मध्ये विशेष आनंद जाणविला!
तालुका मेळावा, जिल्हा मेळावा , राज्य मेळावा मध्ये सुद्धा स्काऊट गाईड सहभागी होतो. यामध्ये सुद्धा स्काऊट ,गाईड विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करत होते.
स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार साठी परीक्षेसाठी स्काऊट - गाईड सहभागी झालो.. त्या राज्य पुरस्कार चाचणी मध्ये परीक्षेमध्ये सुयश प्राप्त झाले आहे. स्काऊट , गाईड राज्य पुरस्कार साठी मुंबई येथे राजभवन येथे पारितोषिक घेण्यासाठी स्काऊट ,गाईड सहभागी तेंव्हा सर्वांना आनंद झाला. मी मास्टर स्काऊट श्री. सुभाष शिंदे मला सुद्धा सन - २०१३-२०१३ मध्ये गुणवंत व प्रतिभावंत स्काऊटर आणि गाईडर यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल माननीय श्री श्री विद्यासागर राव यांच्या हस्ते हरिभाऊ मुंबई येथे दिनांक २३ एप्रिल २०१५ रोजी राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .त्यासाठी सांगली भारत स्काऊटर आणि गाईडर जिल्हा कार्याकडून या राज्य पुरस्कार प्रमाणपत्रासाठी वितरण समारंभास उपस्थित राहण्याचा मान जत हायस्कूल,जत मधील स्काऊट कॉन्टीजेन्ट लिडर श्री. सुभाष शिंदे यांना प्राप्त झाला. या समारंभात श्री. सुभाष शिंदे तसेच सांगली जिल्ह्यातील स्काऊट ,गाईड यांना सुद्धा राजभवन येथे प्राप्त झाला शाळेच्या वैभवात एक विशेष नोंद व्हावी अशी घटना !
सांगली जिल्हा परिषद ,प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली व सांगली जिल्हा भारत स्काऊटर गाईडर जिल्हा कार्यालय , सांगली आयोजित जिल्हा मेळावा मध्ये मी श्री. सुभाष शिंदे हे सलग नऊ वे अॅडव्हान्स पार्टी लीडर म्हणून कामकाज पाहिले आहे.
शालेय स्काऊट गाईड मध्ये आणि जिल्हा कार्यालय मध्ये जे जे उपक्रम राबविले त्यामध्ये विशेष नोंदण्यासारखं अशा गोष्टी घडत गेल्या जिल्हा कार्यालय याद्वारे होणाऱ्या विविध उपक्रमाचे आयोजन जत सारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा राबवण्यात आली खरी कमाईअसे विविध उपक्रम मी आणि सहकारी गाईड कॅप्टन, स्काऊट यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.
तालुका, जिल्हा, राज्य मेळाव्यात सहभागी होऊन विविध सहभागी होऊन विविध स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळाली.
स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत . राजभवन मध्ये अनेक स्काऊट, गाईड पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी सांगली जिल्ह्याचे स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार टीमचे नेतृत्व केले आहे.
सांगली जिल्हा परिषद, सांगली जिल्हा कार्यालय भारत स्काऊट, आणि गाईड जिल्हा कार्यालय आयोजित कब, बुलबुल, स्काऊट,गाईड जिल्हा मेळाव्यात श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांनी सलग नऊ वेळा अॅडव्हान्स पार्टी लीडर म्हणून यशस्वी पणे कामकाज पाहिले आहे.
शालेय जीवनापासून स्काऊट, गाईड यांना विविध उपक्रम राबविले जातात.
खरी कमाई महोत्सव:
आमच्या प्रशालेतील स्काऊट, गाईड हे आपल्या पथकाने द्वारे
एक, एक खाऊचा प्रदार्थ तयार करून ,यांचे विविध स्टाॅल लावतात. त्याची विक्री करण्यात येते. खरी कमाई आनंद घेतात.
शालेय पातळीवर एक दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात येतो.
Comments
Post a Comment