सेवाकाळातील एक प्रसंग! मला भावलेले प्रेमळ काका!
सेवाकालावधी क्षण...
आठवणीतील एक भेट....
जत हायस्कूल, जत मध्ये सेवेला सुरुवात झाली. पण अजून ऑर्डर मिळाली नव्हती. कामकाज सुरू होते. माझी आर्थिक स्थिती बेताची होती. मला ऑर्डर केंव्हा मिळणार याची चिंता लागून राहिली होती. शाळा सुटल्यानंतर मी गावातून जात होतो. तेव्हा समाजसेवक श्री. कुलकर्णी,भाऊ मला भेटले .अहो! शिंदे सर कुठे निघालात ? नाराज दिसताय... मी त्यांच्याजवळ गेलो. त्याला नमस्कार केला. आणि माझ्या
जत हायस्कूल, जत मध्ये सेवेला सुरुवात झाली. पण अजून ऑर्डर मिळाली नव्हती. कामकाज सुरू होते. माझी आर्थिक स्थिती बेताची होती. मला ऑर्डर केंव्हा मिळणार याची चिंता लागून राहिली होती. शाळा सुटल्यानंतर मी गावातून जात होतो. तेव्हा समाजसेवक श्री. कुलकर्णी,भाऊ मला भेटले .अहो! शिंदे सर कुठे निघालात ? नाराज दिसताय... मी त्यांच्याजवळ गेलो. त्याला नमस्कार केला. आणि माझ्या
मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी पण मला जवळ घेतले आणि सुभाषराव आपण थोड्या वेळेत तंगडी मळ्यामध्ये जायचं आहे. असं त्यांनी मला सांगितलं मला भीती वाटली.काका कडं, मी नाही येणार ... तुम्हीच सांगा, ते म्हणाले मी सांगतोय ,असं तुम्ही करायचं नाही.तिथे श्री. पवारांची चार चाकी गाडी होती. वाचनालय पासून आम्ही चार चाकी गाडीतून आमचा प्रवास तंगडी मळ्याच्या दिशेने निघाला. माझ्या मनात खूप भीती होती. मी नवीन होतो . काका पुढे बोलायची माझी हिम्मत नव्हती. शिवाय भाऊंना घेऊन मी मळ्यात आलोय.. म्हटल्कायानंतर काय होईल याची मला चिंता होती. साडेसात ते आठ च्या दरम्यान आम्ही तंगडी मळ्यामध्ये पोचलो. भाऊंनी काकांना आवाज दिला. कोण आहे ..? भाऊ म्हणाले मी भाऊ कुलकर्णी आहे. असं म्हणल्यावर काका म्हणाले , आत या ..काका जेवणासाठी बसले होते. तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलो. त्यांनी भाऊलाच आत बोलवलं ... बसं जेवायला नंतर बोलु आणि एवढ्या रात्री काय आहे काम ? होय, काम आहे. मी एकटा आलो नाही. माझ्याबरोबर तुमच्या शाळेतील श्री. शिंदे सर पण आलेत. चित्रकलेचे होय, तुमची त्यांची कशी ओळख ? भाऊ म्हणाले ,सर आमच्या मळ्यात मूकबधीर विद्यालय जत होते. त्यांची माझी ओळख चांगली आहे. सर, कष्ट करतात .प्रेमळ आहेत. आता. ते तुमच्या शाळेत नोकरीला आहेत. होय, असे काका म्हणाले, भाऊ आता थांबा, काकांनी मला हाक मारली. सर ,आत या म्हणल्यावर मला खूपच भीती वाटली. आता काय होते , काका म्हणाले तुम्ही येऊन बसा जेवायला आणि माझा जीव भांडत पडला. एवढा मोठा माणूस त्यांच्याबरोबर जेवायला बसलो .मनात आनंद, डोळ्यात असू व हृदयात प्रेम या भावना माझ्या मनात दाटून आला .आपण एक शिक्षक पण त्यांनी मला बरोबर बसून जेवण केलं .ज्या संस्थेत मी नोकरीला आहे .अजून माझी ऑर्डर नाही, पगार नाही दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत ही संस्था कशी वेगळी वाटली. काका म्हणाले काळजी करू नका .मी तुमच्या पाठीशी आहे. माझा पण एक मुलगा सुभाष आहे ,तसं तुम्ही! हा विचार ऐकायल्यावर कुण्या एका जन्माची कहाणी माझ्या जीवनात घडली असं मनात येऊन गेले! काका आणि भाऊ कुलकर्णी बोलत होते . मी बाहेरच्या खुर्चीवर बसून त्यांचं संभाषण ऐकत होतो. नंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं तुम्ही फक्त काम करा .सर्व काही मी बघतो .हा शब्द लाखमोलाचा मला असं वाटलं! देवच माझ्या पाठीशी आहे . जन्माला येऊन दि फ्रेंडस् असोसिएशन, जत या संस्थेत मला नोकरी मिळावी. यासाठी ज्या वेळेला मूक बधीर विद्यालयांमध्ये नोकरीस होतो .असं माझं स्वप्न होतं ! डॉ. श्रीपाद जोशी सारखं ज्ञानवंत , मुख्याध्यापक यांच्या सहवासात राहावं. सुंदर काम करावं ही इच्छा होती. तेंव्हापासून काका आणि माझं नातं एक वेगळंच होतं .ते मला सुट्टीच्या वेळी मला बोलवायचे , शैक्षणिक व इतर काही गोष्टीची चर्चा करायचे. ते नेहमी संस्था ,शाळा विषयी बोलायचे ! आपली संस्था दि फ्रेंडस् असोसिएशन, जत ही संस्था मोठी झाली पाहिजेल .या संस्थेत गुणवंत ,ज्ञानवंत शिक्षक ,शिक्षिका असायला पाहिजेल अशी त्यांची संकल्पना होती. मी त्यांना तेव्हांपासून आज अखेर माझ्या समस्या कधीही सांगितल्या नाहीत. पण काकांना कळालं ते मला बोलवत काय झालं? मग असं करा आणि योग्य ती सल्ला देत. काका,दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत या संस्थेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या संकल्पना, कल्पना साकार करायची धमक काका मध्ये होती. काका जे शिक्षक छान काम करतात त्यांना प्रेरणा देण्याचे काम काकांनी केलं आहे.ते केव्हाही विविध संकल्पना संस्थेत आणायचे असेल तर आम्हांला बरोबर घेऊन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. त्या नवीन संकल्पना आमच्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये ज्या सुरू आहेत. काका म्हणायचे नवीन काही दिसलं ते आपण आपल्या शाळेत असले पाहिजेल . शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी गुणात्मक खेळामध्ये ,स्पर्धेमध्ये यश संपादन केल्यानंतर त्यांना खूप आनंद वाटायचा , ते आनंदाने सर्वांना सांगत असत. असे एक प्रसंग आहे त्यांच्या मनात विविध कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ताकद होती. जीवन अमृतमय जाहाले.. जीवन व कार्य ही पुस्तिका लेखन: डॉ. श्रीपाद जोशी यांनी केलं. त्यावेळी हे पुस्तक तयार करण्यामध्ये मी सक्रिय होतो. त्यावेळी मला काकांच्या जीवनातील विविध प्रसंग ,विविध शहरांमध्ये प्रवास ,जी राजकीय व्यक्ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सहवासात फोटो पाहिला.राजकीय नेते असो यांच्याशीही संवाद अशा विविध गोष्टी मला माहिती झाल्या. पुस्तकात फोटो पाहिजेल होते. मी सांगलीला काका चे चिरंजीव गिरीश तंगडी यांच्याकडे घरी गेलो. मी त्यांना सांगितलं काकांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. . काही फोटो मला द्या. मला वाटलं एक दुसरा फोटो देतील किंवा एखादा अल्बम देतील. गिरीशनी कपाट उघडलं आणि माझ्यापुढे असंख्य अल्बम ठेवले हे बघा सर ....फोटो काकांचे आहेत.पाहिजेल तेवढे घ्या. मी आश्चर्याने त्या फोटो कडे बघत होतो . ते फोटो मी दोन तास मी फोटो बघत होतो. तेवढ्यात वहिनी आल्या चहा घ्या सर ,अजून आतमध्ये फोटो आहेत. खरंतर मला मोजकेच चार-पाच फोटो पाहिलेल होते . त्यांनी तर अनेक अल्बम माझ्याजवळ ठेवले होते. खरंतर गिरीश साहेब आणि वहिनी यांचा परिचय नव्हता मला, कधी त्यांना पाहिले नव्हते. घरामध्ये असे बोलायचे की आपल्या घरालाच आहे.भाऊसमान आहे असे बोलायचे मन भरून आलं .मी एक अल्बम घेतला त्यांतील काही फोटो घेतले. काकाचा हा इतिहास या छोट्याशा पुस्तिकेमध्ये साकार होणार नाही त्यासाठी एक मोठं पुस्तक लिहिलं पाहिजेल .असं माझ्या मनाला वाटलं! काका, काकू नी तंगडी परिवार , घराण्यातील माणसा प्रमाणे दि फ्रेंडस् असोसिएशन,जत परिवार हा आपला मानला !असं मला वाटतं !
काका जीवनातील अनेक प्रसंग आज सुद्धा मनात घर आहेत. त्यांच्या जीवनशैलीतून आम्हांला खूप शिकण्यासारखे आहे.
देव आहे किंवा नाही हे माहित नाही. पण काका सारखी देवमाणूस आहे हेच खरं! दि फ्रेंडस् असोसिएशन, जत मध्ये सेवा करताना काकांची लाख मोलाची होती.
अशा पण काही शैक्षणिक संस्था आहेत.नाही भांडण तंटा, प्रत्येक जण जपतो हे मायेचे छत्र!
या संस्थेला माझा त्रिवार वंदन....!
काका यांना विनम्र अभिवादन!
Comments
Post a Comment