श्री.सुभाष शिंदे यांचे मतदान जनजागृती कार्य उल्लेखनीय...!
श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर यांचे
सामाजिक, मतदार जनजागृती कार्य उल्लेखनीय....!
(एस. आर्टस् न्यूज, प्रतिनिधी)
मतदान जनजागृती व सामाजिक कार्य करणारे श्री. सुभाष शिंदे, कलाशिक्षक ,स्काऊट मास्टर R B N न्यूज मराठी चे प्रतिनिधी है गेले महिनाभर मतदान जनजागृती कार्य करीत आहेत .स्व:ता व्हिडिओ निर्मिती करून विविध प्रसारमाध्यमे लोक जागृती चे काम त्यांनी केले आहे.यावेळी मतदान जनजागृती याविषयी शंभराहून अधिक व्हिडिओ निर्मीती श्री.शिंदे सरांनी केली आहे.विविध प्रकारच्या माध्यमातून तयार करून त्यांनी प्रसिद्ध केले आहेत .स्वतः कलाशिक्षक असल्यामुळे रेखाटन ,रंगकाम लेखन आणि साहित्यिक ,कवी असल्यामुळे त्यांनी केलेल्या विविध पोस्टर माहितीपट किंवा पोस्टर चित्र , पथनाट्य सादरीकरण द्वारे सामाजिक काम करण्याचा त्यांचा छंद आहे .प्रत्येक निर्णय वेगवेगळ्या संकल्पना श्री. सुभाष शिंदे ,सर करीत असतात. मागे त्यांनी मतदार गुढी ही संकल्पना त्यांच्या स्वयंप्रेरणेने तयार निर्मिती केली होती. घोषवाक्य, प्रभात फेरी आणि चित्रकला स्पर्धा घेऊन मुलांच्या मध्ये लोकशाही मधील मतदान प्रक्रिया जागृतीचे काम त्यांनी केलेले आहे. त्यांनी केलेल्या मतदार जागृती पोस्टर ला विविध स्तरांवर बक्षिसे मिळाली आहेत . अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे,दिवाळी सुट्टीमध्ये बरेच जण दिवाळी साजरी करण्याच्या उत्साहात होते .तर श्री. सुभाष शिंदे सर हे मतदान जनजागृती मध्ये पोस्टर, चित्र ,व्हिडिओ निर्मितीमध्ये गुंग होते. प्रसार माध्यमांना वरती विविध सामाजिक व्हिडिओ आहेत. जत मधील श्री. सुभाष शिंदे कलाशिक्षक, स्काऊट मास्टर जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट सायन्स , जत मध्ये सर गेले 35 वर्षे कार्यरत आहेत. सेवानिवृत्ती ला अकरा महिने राहिले असताना सुद्धा हा त्यांचा उत्साह महत्त्वाचा आहे .मतदान जनजागृती कामांमध्ये ते स्वतः सक्रिय होऊन काम करत आहे .कोणाताही आदेश नसताना स्वयंप्रेरणेने केलेले हे कार्य अतिशय महत्त्वाचा आहे. सर यूट्यूब चॅनल द्वारे पाचशे ते सहाशे व्हिडिओ निर्मिती करून व्हिडिओमध्ये सामाजिक,सर विविध विषयांवर काम करून जनजागृतीचे कार्य करीत असतात. तसेच विविध वार्ता फलक ब्लॉक द्वारे सुध्दा विविध लेख, लेखन करून सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो .त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून ते काम करत नाही हे विशेष !स्वतःला आनंद मिळाला की झालं त्या मध्ये आनंद मानतात. सामाजिक भान ठेवणारे असे काही शिक्षक जत मध्ये आहेत. हे विशेष
श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,
R B N न्यूज मराठी जत चे प्रतिनिधी म्हणून सुध्दा कामकाज बघतात.
Comments
Post a Comment