सेवा कालखंडातील मला भेटलेले मुख्याध्यापक...
१) डॉ.श्रीपाद जोशी
जत हायस्कूल, जत.
मुक बधिर विद्यालय जत मध्ये असताना श्री ऐनापुरे काका यांच्या सल्ल्याने भेट घेण्यासाठी मी व श्री.कदम सर जत हायस्कूल,जत गेलो. पांढरे शुभ्र गणवेश त्यांनी नम्रपणे आमच्या आधी त्यांनी नमस्कार केला.मी त्यांच्या पायावर ती डोकं ठेवून नमस्कार केला. गुरुतुल हा व्यक्तीच्या सहवासात नोकरी करायची संधी मिळायला पाहिजेल असं माझ्या मनात विचार येऊन गेला.
त्यावेळी बोलताना वेळ किती वेळ झाला हे आम्हाला समजले नाही.श्री.गुरव मामा आत आला आणि म्हणाला साहेब ७.३०वाजले हो.अण्णा आम्ही निघालो ... कुलुप लावा.मी एक.. दोनदा दिवसात डॉ.जोशी साहेबांची भेट घेत असे, त्यांच्या अक्षरांनी वेड लागले! त्यांनी लिहिलेल्या वह्या मी मागून घेई. मुक -बधिर ते जत हायस्कूल,जत प्रवास सुरू झाला....!
श्री.ऐनापुरे काका व डॉ.श्रीपाद जोशी ते संचालक म्हणून कामकाज पाहत होते.
काही कालावधीनंतर मी जत सोडून मुंबईला नोकरीस दैनिक सामना मध्ये आर्टिस्ट विभागात कामकाज गेलो.एका वर्षात माझ्या वडिलांचा अपघात झाला.आणि मी सांगलीला आलो. वडिलांना उपचार केले.आणि मुंबई ला जाण्याचा विचार करत होतो.तेंव्हा मी त्यावेळेचे शिक्षणाधिकारी मा.श्री.म.ल. देसाई साहेबांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले सुभाष तू सांगली मध्ये नोकरी करा. मला नोकरी कोण देणार... साहेब!मी आहे ना! सांगली जिल्ह्यात काही जागा रिक्त आहेत.उद्या या ....मी सांगलीला गेल्यावर त्यांनी एक कागद माझ्या दिला . रिक्त जागाच्या गावाची नावे होती .त्यामध्ये
तीन क्रमांक ला जत हायस्कूल, जत नाव होते.साहेबांनी मला नाव निवडा असे सांगितले.तेंव्हा मी जत हायस्कूल,जत ची निवड केली. साहेब म्हणाले सुभाषराव तुम्ही ती का निवड केली? मी जत मध्ये होतो.डाॅ.श्रीपाद जोशी, साहेब यांच्या कडे काम करायची इच्छा आहे.ती पूर्ण होईल ...!
साहेब!हसले डॉ.जोशी गुरुजी माझे पण मित्र आहेत.
मग काय डॉ.जोशी साहेबांनी !माझे सर्व काही गुरूवर्य,आई, वडील सर सर्व जबाबदारी त्यांनी पार पडली. सरांनी मुलासारखा जपलं!जत माझे माझं जीवनच फुललं! दुष्काळात होरपळत असताना पण माझ्या जीवनात डॉ.श्रीपाद जोशी साहेबांनी एक कलायात्री चा प्रवास आनंददायी केला ! माझे वडील नेहमी सांगायचे डॉ.जोशी गुरुजी हे साने गुरुजी आहेत.त्यांना तू केव्हाही विसरू नकोस! त्यांच्या सहवासात राहून एक छान कार्य कर!
खरंच! माझ्या वडिलांचे शब्द मी केंव्हास विसरणार नाही.दि फ्रेंड्स असोसिएशन, जत संचलीत जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड ज्युनिअर, जत जि.सांगली
संस्थेत विविध उपक्रमांनी होत असे त्यामध्ये सहभागी होताना आनंद वाटत होता.
डॉ. श्रीपाद जोशी सर यांच्यामुळे मला जत येथे सेवा करण्याचे भाग्य मिळाले. सरांचे वर्णन एक कुशल प्रशासक आणि साने गुरुजी यांचा वसा जपणारे! आमच्या जतचे साने गुरुजी म्हणून परिचित आहेत.त्यांचे अक्षर पद्धत एक वेगळ्या प्रकारची लेणी आहे. त्यांच्या अक्षर लेखनातून संपूर्ण शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक,शिक्षिका यांच्यावरच छाप आहे .उत्कृष्ट वक्तृत्व, प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांगणे . दि फ्रेंडस्असोसिएशन ,जत या संस्थेला जत हायस्कूल, जत शैक्षणिक एक शिस्त लावण्याची काम त्यांनी केले आहे. ते विविध उपक्रम,विविध संकल्प करण्यामध्ये त्यांचा जिल्हा मध्ये नाव आहे. अनेक पुस्तकांचे लेखन करणारा एक लेखक व पीएचडी धारक मुख्याध्यापक महाराष्ट्रामध्ये एकमेव श्री. जोशी सरांचं नाव सांगता येईल,जत सारख्या दुष्काळग्रस्त परिसरामध्ये एका माध्यमिक शाळेमध्ये केलेले शैक्षणिक प्रयोग साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. सर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा छाप पहावयास मिळतो. सांगली आकाशवाणी केंद्र विविध चिंतनाद्वारे सामाजिक शैक्षणिक आणि देशातील विविध घटना व त्यावरती विशेष कथन पावस मिळते श्री जोशी सर विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करी त्या लेखनातून शैक्षणिक व्यवस्था आणि विविध प्रयोगाचे सादरीकरण करत असे त्यामुळे समाज प्रबोधन करून सामाजिक जागृती करून हा समाज पूज्य साने गुरुजी यांच्या विचारांवर समता या मूल्याशी जोडतात. सर,खरंच हाडाई शिक्षक आहेत. अध्यापन करीत असताना आपल्याबरोबर जे अध्यापक ,अध्यापिका आहेत .त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाऊन शैक्षणिक प्रगती कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं. शाळेच्या सुरुवातीला एक एक रुपया साठवून शाळेचे हे भव्य रूप साकारण्यामध्ये संस्थाचालकाबरोबर त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. आज जे शैक्षणिक वैभव आपणास पाहावयास मिळते. ते संस्थेतील जेष्ठ संचालक सभासद शिक्षक, शिक्षिका आणि डॉ. श्रीपाद जोशी यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. अशा या मुख्याध्यापक संगे माझी सेवा सुरुवात झाली. हे माझे हे माझे भाग्य समजतो ! त्यांच्या सहवासात विविध गोष्टी शिकायला मिळाल्या पूज्य साने गुरुजी यांची आवड मला बालपणापासूनच होती. पण डॉ. जोशी सरांच्या मुळे मला राज्यस्तरीय साने गुरुजी कथामला याचे राज्याचे सदस्य म्हणून माझी नेमणूक झाली. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, सांगली जिल्हा संघटक ,राष्ट्रसेवा संघटक अशा विविध साने गुरुजींच्या विविध संस्था यावर मला काम करायला मिळाले. मी राज्यस्तरीय अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला राज्यस्तरीय अधिवेशनास सहभागी झालो. जे मा. व्यक्तित्त्वास साने गुरुजींच्या सहवासात होते. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली.स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगावकर, साने गुरुजी यांची पुतणी सुधाताई .
राम शेवाळकर , वसंत बापट अशा विविध लोकांच्या सहवासात काम करण्याचे भाग्य मला मिळाले. ते डॉ. श्रीपाद जोशी सरांमुळे अशा विविध प्रसंग घटनास मी डॉ. श्रीपाद जोशी सर यांच्यावर लेख लिहिले आहेत. त्यावर आपण पाहू शकता. माझ्या सेवेची सुरुवात डॉ. श्रीपाद जोशी सर यांच्यामुळे सेवाकार्याची सुरुवात झाली.मनात हे भाग्य आहे. २) श्री.पी.जी. कुलकर्णी
दुसरे मुख्याध्यापक: श्री .पी. जी. कुलकर्णी त्यांच्या सोबत काम करताना विज्ञान विषयी साधने निर्माण करणे व विज्ञान प्रदर्शनामध्ये मी जत हायस्कूल जत च्या विद्यार्थ्यांच्या साधनांची सजावट, तक्ते आकर्षक करून देत असे. व लोकसंख्या शिक्षण यामध्ये मी स्पर्धेत सहभाग घेत असे तालुका ,जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये लोकसंख्या शिक्षण यामध्ये मला क्रमांक येऊन पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांचे सुद्धा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये क्रमांक घ्यायचे. श्री कुलकर्णी सर विनोदी, हसतमुख असायचे त्यांचे सुध्दा अक्षर सुंदर होतं. शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये मी प्रत्येक घटकांमध्ये सहभागी होत असे. विविध स्पर्धा, कार्यक्रम असू देत विद्यार्थी,विद्यार्थ्यांना वेशभूषा ,रंगभूषा, रंगमचचे सजावट ही कामे मी आवडीने करत असत .मी केलेल्या प्रत्येक कामाची सर, नोंद घेत असत. वा! सुभाषराव असंच काम करा,असे म्हणायचे. सर शाळेमध्ये विज्ञान विषयी प्रयोगशाळा आदर्श असली पाहिजेल यासाठी प्रयत्न केला . श्री.पी.जी. कुलकर्णी सर , मुख्याध्यापक मध्ये सुद्धा काम करताना मला आनंद वाटला.
३) श्री.बी.जी.हल्याळ
माझे तिसरे मुख्याध्यापक :श्री .बी .जी .हल्याळ सर विज्ञान, गणित या विषयाचे होते. त्यांचा कालावधीत थोडासा होता .ते मला सांगायचे तुम्ही काम करा .तुम्हांला पाहिजेल ते मी देतो. शाळेमध्ये सांस्कृतिक, कार्यक्रमांमध्ये , विविध स्पर्धेत, कलात्मक काम करता आले.
शाळेमध्ये एकूण अनेक विषयाचे काम करत होतो. कला विषयासाठी लागणारी साधने ,रंग , साहित्य त्यांनी मला दिले .शासकीय लखकाला रेखाकला परीक्षा त्यांच्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी बसले होते. शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड परीक्षा, इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा याचा निकाल सरासरी ९०% ते १००% टक्के निकाल लागला होता.२६ जानेवारी रोजी होणारा संस्कृत कार्यक्रमांमध्ये रंगमंच, सजावट यावर्षी वेगळ्या प्रकारची करण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनीचा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ओढा वाढला होता. वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करण्यासाठी यावर्षी मी मागील पडदा आकर्षक केला होता. यासाठी श्री हल्याळ सर मुख्याध्यापक यांचे सहकार्य मला लाभल होते. तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असा मुख्याध्यापक मला भेटलाने याचा मला आनंद झाला. ४) श्री.डी.पी.इनामदार
माझे चौथे मुख्याध्यापक :श्री .डी .पी. इनामदार सर भेटले .त्यांचा पण कालखंड छोटासा होता .पण त्यांच्या कालखंडामध्ये शाळा आदर्श , शिस्तप्रिय आणि विविध उपक्रमांचे सादरीकरण झाले. विविध सण,उत्सव राष्ट्रीय कार्यक्रम यामध्ये सरांनी सर्व शिक्षकांना प्रेरणा दिली यावेळी शाळेला एक शिस्तप्रिय ,कर्तव्यदक्ष असा मुख्याध्यापक लाभला होता. त्यांनी विद्यार्थ्याबरोबर ,शिक्षकांना सुद्धा शिस्त लावली. सर्वांनी नमस्कार केलाच पाहिजे ,नाहीतर ते स्वतः उठायचे नमस्कार करायला लावयाचे . सर विज्ञान शाखेचे होते. तरीपण सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम यामध्ये ते सहभागी व्हायचे .बेशिस्त पणा त्यांना चालत नसे. शिक्षक असो वा विद्यार्थी असो, त्यांच्यावर त्यांचा कटाक्ष होता. शासकीय रेखाकला परीक्षा :एलिमेंटरी ग्रेड परीक्षा, इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा , बाह्य चित्रकला स्पर्धा यामध्ये त्यांनी मला प्रोत्साहन दिले .त्यामुळे आम्ही जत तालुका सोडून सांगली जिल्ह्यामध्ये चित्र स्पर्धेला मुले घेऊन गेलो .आणि यश संपादन केले . हा पहिलाच प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला. शाळेत असताना शाळेचाच विचार करावा.शाळेचेच काम करावे असा कटाक्ष होता .या कालखंडामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये शिस्त लावण्याचे काम श्री .डी .पी. इनामदार सर मुख्याध्यापक यांनी केले . शाळेला प्रगतीपदावर नेले.
५) श्री.बी.ए.महाजन
माझे पाचवे मुख्याध्यापक : श्री .बी .ए .महाजन सर मी आणि सर हे मिरज तालुक्यातील असल्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटे ! मराठी मुख्याध्यापक होते. श्री. महाजन सरांनी मुख्याध्यापक झाल्याबरोर कार्यालय सुंदर करून घेतले .मराठी विषयासंदर्भात विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. लोकनृत्य ,वकृत्व स्पर्धा ,कथाकथन स्पर्धा ,हस्तलिखित स्पर्धा यामध्ये त्यांनी विशेष काम केले. श्री महाजन सर हे लेखन करीत होते. त्यामुळे संस्थेच्या वर्धापनदिनी निघणारा अंक यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. सर शाळेमध्ये मराठी विषयाला वैभव प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी अक्षरलेखन, वाचन यासाठी विशेष प्रयत्न केले. सर चित्रकला,शासकीय रेखाकला परीक्षा याला प्रेरणा दिली. शाळेतील कोणतीही कार्यक्रम असो त्याची सजावट, मांडणी ही माझ्याकडे असे . प्रत्येक वर्षी प्रमाणे २६ जानेवारी रोजी होणारी कलारजनी यासाठी विद्यार्थी ,विद्यार्थिनींना लागणाऱ्या विविध सजावट साधनाची निर्मिती करत असे. ऐतिहासिक टोप, मुखवटे विविध वेशभूषाचे अलंकरण, डिझाईन हे मी टाकाऊ पासून टिकाऊ पध्दतीने करीत असे. कार्यक्रमाच्या वेळी पात्राप्रमाणे रंगभूषा ,वेशभूषा मी करत असे .शाळेतील फलक लखेन मी सदैव माझ्याकडेच असायचे. त्यामुळे राष्ट्रीय सण ,उत्सव ,समारंभ आणि माहितीपट विशेष कार्याची नोंदी आकर्षक पणे केल्यामुळे विद्यार्थ्यांला अक्षर लेखन, माहितीपट चा फायदा झाला. असे अनेक उपक्रमांचे सादरीकरण करण्यात मला आनंद झाला.
६) श्री.ए.ए.मेत्री
माझे सहावे मुख्याध्यापक श्री .ए .ए. मेत्री यांना विविध भाषांची आवड होती. सर इंग्रजी विषयाचे असल्यामुळे त्यांना इतर विषयाबरोबर इंग्रजी विषयाचे अध्यापन कसे करावे याचे प्रतिष्ठित दाखवले कलात्मक गोष्टीकडे त्यांचे विशेष लक्ष होते कथाकथन नृत्य करा चित्रकला विविध स्पर्धेला प्रोत्साहन देत असत ते शाळेमध्ये होणारे शाळेचे संस्थेचे जे कार्यक्रम व्हायचे त्यासाठी ते योग्य ती खबरदारी घेत असत शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धा याला प्रेरणा द्यायचे ते नेहमी मला कला विषयासाठी विशेष साथ देत असत त्यांच्याच कालखंडामध्ये कला विषयी दोन खंड प्रकाशित झाले सर नेहमी कोणताही बौद्धिक खेळ कला याला प्रोत्साहन देत होते ते नेहमी सर्वांनाच प्रेरणा देत होते. ७) श्री.यु.जी.अंगडी
माझे सातवे मुख्याध्यापक श्रीयुजी अगदी सर सर विज्ञान शाखेचे असल्यामुळे त्यांनी पण विज्ञान बरोबर सर्व विषयाला योग्य देव न्याय दिला विज्ञान प्रदर्शन मध्ये लागणाऱ्या विविध साधने निर्मिती यामध्ये त्यांचे लक्ष होते
याच कालखंडामध्ये मला जिल्हा विविध संघटना मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि याची प्रेरणा श्री अंगडी सरांना जाते महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघटनेचा कार्यवाही होण्याचा मान मला मिळाला तसेच साने गुरुजी कथामाला सेवा दल आणि बाल चित्रकला स्पर्धा याचे पण कामाला मिळाले त्यासाठी मला शाळेबरोबर बाहेरचे काम करावे लागेल त्यांना सुद्धा त्यांनी मला साथ दिली त्यामुळे शाळेचे नाव जिल्ह्यामध्ये आणि राज्यस्तरीय मध्ये घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता शाळेमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा आणि 26 जानेवारी रोजी एक वेगळा प्रयोग जत असतो जत मध्ये करण्यात आला 180 फूट लांब कागद आणून आणून एकाच वेळी दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका पालक बंधू भगिनी यांच्याद्वारे अखंड देशभक्ती या शीर्षकाखाली चित्रे काढण्यात आली हा एक आगळावेगळा उपक्रम त्यांच्या कालखंडात झाला याची नोंद जिल्हा राज्य स्तरावर घेण्यात आली आहे याचा व्हिडिओ युट्युब वरती पाहाव्यास मिळेल सरांनी कोणतेही काम करताना प्रेरणा दिली असे अनेक उपक्रम मी करत गेलो याला मुख्याध्यापक साहेबांची साथ होती.
८) श्री.ए. बी.होवाळे
माझे आठवे मुख्याध्यापक श्री. ए .बी. होवाळे सर हे पण माझ्या मिरज तालुक्यातील त्यामुळे सरांचे आणि माझं एक नातं आपुलकीचे होतं .त्यांच्या कालखंडामध्ये शाळेने विशेष प्रगती केली. दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत व जत हायस्कूल जत यांचा सुवर्ण महोत्सव समारंभ झाला नव्हता. कोव्हिडीच्या कालखंडामध्ये हा कार्यक्रम तसाच राहिला होता. ज्यावेळी श्री.होवाळे सर आले आणि
त्यांनी हा समारंभ झाला पाहिजेल .अशी प्रतिज्ञाच केली. संस्थेचे चेअरमन श्री .ऐनापुरे साहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी कामाला सुरुवात केली .निधी गोळा करणे आणि शाळेचा परिसर रंगरंगोटी सजावट वगैरे करणे. सर्व गोष्टी त्यांनी केला. त्यांच्या कामांमध्ये आम्ही सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.संस्थेचा स्थापनेपासून आतापर्यंत फोटो प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कार्यक्रमाची स्मृतीचिन्ह तयार करणे त्यासाठी डिझाईन बनवणे तयार करणे , परत शाळेत आणून देणे . ही कामे माझ्याकडे होती.अमृत मोहोत्सव समारंभाच्या वेळी मी दिपावली सुट्टी घेतली नाही. दिवाळी सुट्टीमध्ये आम्ही मोनोग्राम तयार करणे व इतर कामे सरांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो. माझ्याकडे संस्था इतिहास सुवर्ण महोत्सव इतिहास सांगणारा विविध फोटो स्थापनेपासून ते आज अखेर विविध फोटो प्रदर्शन डीझाईन काम माझ्याकडे होते. यासाठी मी दिवस-रात्र काम करून सर्व माहिती घेऊन या संस्थेचा अमृत महोत्सव फोटो प्रदर्शन काम वेळेत पूर्ण केले.श्री. होवाळे सर ,डॉ. श्रीपाद जोशी यांनी मदत केली .खरंतर संस्थेचे हे प्रदर्शन हे दुसरं आहे.पहिलं मी डॉ. श्रीपाद जोशी सेवानिवृत्त होताना स्थापनेपासून २००२ पर्यंत एक फोटो चित्र प्रदर्शन-२००२ आज संस्थेपासून अनेकांचे जीवन कसे सफल झाले. हे सांगणारी एक मासिक म्हणजे अमृत महोत्सवी अंक या अंकांमध्ये सुद्धा मी काम केले. संस्थेचे जुने संचालक ,सभासद यांचे सर्व फोटो गोळा करण्याचे काम माझ्याकडे होते. मी जे फोटो उपलब्ध होते. आणि जे फोटो मिळत नव्हते त्यासाठी त्या संचालक, सभासद त्यांच्या घरी जाऊन ते फोटो गोळा केले. शेवटी माजी मुख्याध्यापक श्री. पी.जी. कुलकर्णी सरांचा फोटो मिळत नव्हता. त्यांना निरोप पाठवला पण त्यांनी शेवटपर्यंत फोटो दिला नाही .शेवटी सांगलीचा त्यांच्या मुलीच्या कडून मिळविला. फोटो गोळा करण्यासाठी मला खूप त्रास झाला. पण संस्थेचा अमृत महोत्सव समारंभ सुंदर झाला पाहिजेल .सर्वांनी चांगलं म्हणलं पाहिजेल .यासाठी मी प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आले.आज रोजी शाळेमध्ये स्थापनेपासून आज अखेर संचालक ,सभासद, मुख्याध्यापक आणि आज अखेर सर्व शाखेमध्ये असणारे शिक्षकांचे फोटो आता माझ्याजवळ आहेत याचा आनंद मला आहे . श्री. होवाळे सर यांनी दि फ्रेंडस् असोसिएशन, जत व जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत संस्था व शाळेचा सुवर्ण महोत्सव समारंभ मोठ्या दिमागत केला.
हे या.श्री.होवाळे सरांनी छान काम केले आहे.
९) श्री.पी.एम.कांबळे
श्री. पी. एम .कांबळे सर हे माझे नववे मुख्याध्यापक आणि शेवटचे सर काही कालावधी मध्ये आले. खरं म्हणजे ते मराठी अध्पयापक त्यांच्यावर डॉ. श्रीपाद जोशी सरांच्या अक्षरांची छाप , अक्षरांची छाप सारखेच !गुरु शिष्याचे नातं कसं असतं हे ओळखण्याची ही एक खूणच...! श्री .कांबळे सर ज्यावेळी मुख्याध्यापक झाले. त्यावेळी मला आनंद झाला. कारण माझा दोस्तच मुख्याध्यापक झाला. सर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये त्यांची विशेष छाप आहे .सुंदर बोलणं ,सुंदर लेखन करणं आणि प्रत्येकाशी प्रेमान वागणं ह्म गुणांनी सर मला खूप आवडतात. सर ,आम्ही बरेच वर्ष मित्र आहोत .आमच्या दोघांच्या घरामध्ये सुखदुःखाच्या कामात आम्ही एकमेकांजी साथ देतो. सर पण आम्हांला साथ देतात, यांच्या आनंद वाटतो. खरंतर सर मुख्याध्यापक होणार हे मी पाच वर्षांपूर्वी सांगितलं होतं .सर शेवटची काही वर्ष तुम्ही मुख्याध्यापक होणार आणि मी तुमचा सहशिक्षक होणार .... आणि तसंच घडलं शाळेमध्ये कोणतेही कार्यक्रम असू दे..! आम्ही एकमेकाला विचारून कसा चांगला होईल याच्याकडे बघतो. ते केंव्हाही मला बोलवून दे. मी हजर असतो. विशेष म्हणजे सरांची जन्मतारीखेतील साल ६८ आहे . माझे पण ६८ आम्ही दोघेपण एकाच वर्षी सेवानिवृत्त होत आहोत खरं तर मी ३१ मार्च २०२६ आणि सर , पण २०२६ ला सेवानिवृत्त होत आहेत . शाळेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मी आणि सर सहभागी होतो. जिल्हास्तरीय स्पर्धेला जाताना विद्यार्थ्याबरोबर आम्ही सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. जत हायस्कूल जत शाळेचे नाव कथाकथन .अक्षरलेखन . लोकनृत्य एकांकिका या स्पर्धेचे नाव जिल्ह्यामध्ये येण्यासाठी आम्ही दोघांनी खास प्रयत्न केले आहेत . सरांचा कालखंड अगदी कमी होता. तरीपण त्यांनी जे चांगले उपक्रम राबविले होते. त्यातूनच शाळेची प्रगती केली. शाळेमध्ये आज अखेर चे संस्थेचे वर्धापन दिनाचे अंक व मासिके निघतात त्यावेळी श्री .अमोल जोशी सर ,श्री .पंडित कांबळे सर, श्री सुभाष शिंदे सर आम्ही त्यासाठी प्रयत्न केले . शाळेमध्ये विविध स्पर्धेमध्ये, खेळ ,बौद्धिक खेळ यामध्ये प्रेरणा देऊन श्री. कांबळे सरांनी प्रयत्न केले .त्यांना आम्ही सर्व अध्यापक,अध्यापिकांनी साथ दिली आहे.
डॉ. श्रीपाद जोशी सर यांचे लाडके शिष्य श्री. पंडित कांबळे मुख्याध्यापक झाले .हा आनंद आम्हांला सुद्धा झाला आहे.सर कधी चिडत नाहीत ,प्रेमाने ,शुद्ध भाषेने सांगतात. प्रत्येक काम प्रेमाने करतात . विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रिय असे माझे नववे मुख्याध्यापक , मित्र श्री. पंडित कांबळे हे मला खूप आवडतात .
Comments
Post a Comment