महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् : स्काऊट गाईड राज्य पुरस्कार वितरण सोहळा मध्ये उपस्थिती....
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊस् आणि गाईडस्
स्काऊट गाईड राज्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 23 एप्रिल 2015 रोजी होणार होता .या समारंभास सांगली जिल्ह्यातील पाच स्काऊट, गाईड व एक स्काऊट काॅन्टीजेन्ट लिएंडर म्हणून श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत. यांची निवड करण्यात आली.
स्काऊट जिल्हा कार्यालय तर्फे या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याची टीम घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती.
स्काऊट, गाईड विविध तालुक्यातील होते . त्यांच्याशी चर्चा करून आम्ही या समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक दिवस आधल्या दिवशी स्काऊट ऑफिस मुंबई येथे रवाना झालो .हा समारंभ उपस्थिती राहणाची संधी आम्हां सर्वांना मिळणार होती .
आम्हांला खूप आनंद झाला .विशेष म्हणजे माझ्या शाळेतील गाईड कुमारी वैभवी शिंदे या पण स्काऊट गाईड राज्य पुरस्कार ला जाऊन आल्या होत्या. आम्हाला या समारंभासाठी मुंबई येथे खास ट्रेनिंग देण्यात आलं. आम्हांला उत्सुकता होती .उद्या सकाळी जाऊन राजभवनामध्ये स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार समारंभ पाहिजे स्काऊट ,गाईड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम योग्य वेळी ,योग्य क्षणी महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन महामहिम राज्यपाल मा. श्री .सी. विद्यासागरराव यांच्या उपस्थितीमध्ये राजभवन मुंबई येथे दिनांक - 23 एप्रिल 2015 रोजी राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं .त्यावेळी स्काऊट चे राज्यप्रमुख भाई नागराळे राज्य आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होती. हा समारंभ सुरू झाल्यापासून संपेपर्यंत असा सोहळा आम्ही कधीही पहिला नव्हता हा समारंभ झाल्यानंतर मा. श्री. सी विद्यासागरराव यांच्या समवेत ग्रुप फोटो घेण्यात आले
हा समारंभ पाहत असताना संपूर्ण राज्यातून आलेले स्काऊट गाईड, स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन सर्वांच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद दिसत होता .सांगली जिल्ह्यातील सर्व स्काऊट, गाईड यांना मुंबईमधील ऐतिहासिक स्थळे दाखवून परत त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली. हा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे.
स्काऊट, गाईड राज्य पुरस्कार वितरण समारंभ: राजभवन येथे उपस्थिती आनंद देऊन गेली
************************
हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस्, मुंबई या कार्यालयाच्या वतीने राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सन- २०१३-२०१४ मधील गुणवंत व प्रज्ञावंत स्काऊटस् आणि गाईडस् यांना महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. श्री. सी. विद्यासागरराव यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे दि २३ एप्रिल २०१५ रोजी राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सांगली भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाकडुन या राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभास उपस्थित राहण्याचा मान जत हायस्कुल मधील स्काऊट कॉन्टीजेन्ट लिडर सुभाष शिंदे यांना प्राप्त झाला आहे. या पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभात श्री. सुभाष शिंदे सांगली जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त स्काउटस् आणि गाईडस् यांच्या सोबत राहुन या सांगली कार्यालयाचे नेतृत्व करीत
आहेत.
एक स्काऊट कॉन्टीजेन्ट लिडर श्री.सुभाष शिंदे हे जत हायस्कूल,जत येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्काऊट आणि गाईड या सेवाभावी कार्यात श्री. सुभाष शिंदे यांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यांच्या निवडीमुळे सुभाष शिंदे यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
****************************
Comments
Post a Comment