पूज्य साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
विनम्र अभिवादन!
🔵साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे अमूल्य विचार!!!
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
🟣आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
🟡आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत. 🟤 साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देतील त्यांनीच लिहिलेल्या या निवडक कविता.
🔵करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.
🔴कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
🟡कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे.
जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्या.
🔵ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
🟡आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
🔵जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.
🟡सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🔵🔵विचारांच्या महिमा 🟣🟣 भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गायलेला दिसतो. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो; परंतु वेद म्हणजे काय ? वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.
जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.
विचार नवजीवन देतो. आज निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची नितांत आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उतावीळपणा नको; स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल, तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूरी आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूरी आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागाल. मग जो विचार स्फुरेल, त्याचा आचार सुरू होईल. हाच विचारांचा महिमा आहे.
- साने गुरुजी
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
श्री.सुभाष शिंदे, अध्यक्ष
साने गुरुजी कथामाला व कला केंद्र,जत.
ता.जत जि. सांगली.
🔵 साने गुरुजी कथामाला/राष्ट्र सेवा दल
संघटक.
🟣माजी सदस्य,
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
पूज्य साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
Comments
Post a Comment