मला भेटलेले देवमाणूस ! डॉ.श्रीपाद जोशी
मला भेटालेले देवमाणूस: डॉ.श्रीपाद जोशी..!
- श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,स्काऊट मास्टर ,जत हायस्कूल,जत.
जीवनामध्ये बरीच माणसं येतात आणि जातात काही येतात ते नेहमी स्मरणात राहतात... माझ्या बाबतीत असे एका देव माणसाचं नाव आहे. त्यांचे नाव डॉ .श्रीपाद जोशी ,सर त्यांची ओळख झाली कारण होतं सुंदर अक्षराचे पत्र ! त्यामधील सुंदर अक्षरांचा ने त्यांची भेट झाली. ती आज अखेर तशीच आहे. मूक बधिर विद्यालय,जत मध्ये असताना सुद्धा डॉ. जोशी सर सर्व शिक्षक ,शिक्षकांना आर्थिक मदत द्यायची .त्यांना शैक्षणिक कामामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची मदत करत मी मूक बधिर विद्यालय,जत सोडून .. मुंबईला गेलो. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या स्मृती माझ्या मनात होता. मुंबईमध्ये नोकरी गेलो होतो. तेंव्हा मी तिथे वाटलं स्थिर होईल.माझ्या घरच्या अडचणी असल्यामुळे मला परत माझ्या मूळ गावी म्हणजे बुधगावला यावं लागलं कारण वडिलांचा अपघात झाला होता. त्यांना बघण्यासाठी मी गावी आलो .तर त्यानंतर बघा जिल्हा परिषद मध्ये माझ्या मित्राचे मामा त्यांनाही माहीती होती. त्यांनी मला शिक्षणाधिकारी मा.श्री.म.ल.देसाई भेट झाली.माझ्या परिस्थिती माहिती त्यांना सांगितली गितली. त्यांनी नोकरी देण्याचे आश्वासन मला दिले . एक कागद माझ्यासोबत ठेवला त्यामध्ये अनेक शाळा होत्या . त्यामध्ये जत हायस्कूल , जत चे नाव होतं .मी सांगितलं ह्या शाळेत मी नोकरीत जातो. साहेब म्हणाले ,थांबा तुम्ही या शाळेत का जाणार आहे ? मी लगेच डॉ. श्रीपाद जोशी सरांचे नाव सांगितले. त्यावर देसाई साहेब म्हणाले ,मी सुद्धा जोशी गुरुजींचा भक्त आहे. तुम्ही जाऊन बघा त्यांच्या सांगण्याप्रमाणे डॉ. श्रीपाद जोशी सरांना भेट आणि मुलाखतीला गेलो. खरं जाताना खूप अशी अडचण पैसाची होती. मला सांगली जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पाचशे रुपये चे बक्षीस लागले होते .मी गेलो मुलाखतीला जत ला गेलो.मुलाखत दिली . मला निरोप दिला उद्यापासून तुम्ही नोकरी या ,ऑर्डर नंतर देऊ. नोकरी लागली म्हटल्यानंतर आनंद व्हायला पाहिजेल होता. तसं झालं नाही. मी बारीक नजरेने बघत होतो .अहो! सुभाषराव काळजी कशाला करतात ? सर, नोकरी दिल्याबद्दल अभिनंदन पण या जत मध्ये मी कसा राहणार ? ऑर्डर, मान्यता याला पाच ,सहा महिने लागतील. तोपर्यंत मला जत मध्ये पैसे कोण देणार? गावाकडे वडील आजारी,झोपून आहेत . पैसै देण्यासाठी कोणच नाही. मी काय करू सर ! डॉ. जोशी साहेबांनी ओळखलं आणि ते माझ्या जवळ आले, आणि म्हणाले सर, काळजी कर करू नका .महिन्याला जे लागेल दोनशे, तीनशे रुपये लागेल ते पैसे मी देतो. समजा तुम्हांला कमी, जास्त काही लागलं तर ते पण देईल ,बोला आता काय अडचण आहे .मला इतका आनंद झाला की एकीकडे माझे वडील आजारी अंथरुणावर पडलेले आहे .अनेक तालुक्याचा प्रवास करून मी जत मध्ये
आलो आहे . माझ्या मदतीला कोण येणार ? हा एक प्रश्न माझ्या मनात होता. पण माझ्या मदतीला देव माणूस! धावला म्हणजेच डॉ.श्रीपाद जोशी , साहेब माझ्यासाठी धावून , आले. माझ्या डोळ्यात अश्रू येत अश्रू होते.त्यांना वाट मोकळी करून दिली. आणि उद्यापासून आपण जत मध्ये दि फ्रेंडस् असोसिएशन, जत, संचलित जत हायस्कूल,जत मध्ये शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली.
डॉ . जोशी सर सर्व काही विचारायचे तब्येत कशी आहे. जेवण व्यवस्थित जाते का ? सगळं विचारीत होते .मला आश्चर्य वाटायचं ! साहेब !एवढे मोठे माणूस ! माझ्यासारख्या एका शिक्षकांसवर कसे प्रेम करतात.प्रत्येक वेळेला शाळेची कोणती वेळ असू दे , मला बोलावलं की ,मी हजर असायचं ! आज अखेर कोणत्याही मुख्याध्यापकांनी मला बोलून दे मी हजर होत .शाळेचे काम म्हणजे माझंच काम आहे .असं मी नेहमीच समजतो .शाळेसाठी वेगवेगळे प्रयोग राबवले ,विविध परीक्षेला मुलं बसविले ,आपल्या शाळेचे नाव नेहमी शाळेचे नाव मोठं झालं पाहिजेल .ही भावना माझ्या मनात होती .मी आल्यानंतर इथल्या मुलांना चित्रकलेची आवड विशेष नव्ही. मी आल्यानंतर विषय परिचय ,या कलेमध्ये किती विषय आहेत. त्याचं विषयज्ञान दिले .त्यामुळे मुलांना वाटू लागलं हा विषयही खूप मोठा आहे. माझ्या कार्याने चित्रकला शिक्षक हा विशेष शिक्षक असतो.तो कोणतीही गोष्टी विशेष कार्य शकतो .हे मी माझ्या कार्याने सिद्ध केलं ! साने गुरुजी कथामाला ,राष्ट्रसेवा दल, असू दे विविध संघटना किंवा सामाजिक संस्था असू देत किंवा पाठ्यपुस्तक मंडळ मध्ये लेखकांचे काम असू दे ,या विविधस्तरावर काम करून मी लोकांना चित्रकला शिक्षक विशेष काही करू शकतो .हे सिद्ध करून दाखवलेला आहे. जगामध्ये असणाऱ्या विविध संघटना त्यामध्ये मला मानाचे स्थान! लायन्स क्लब ऑफ जत या अध्यक्षपदी माझी निवड! करून जर मधल्या प्रतिष्ठीत डॉ. वकील, व्यापारी मान्यवरांनी गौरव माझा केला .मी लायन्स क्लब ऑफ जत मध्ये सुद्धा भरीवं काम केले आहे . यामध्ये विविध उपक्रम राबवून लायन्स क्लब ऑफ जत चे नाव राज्य, राष्ट्रीय स्तरावर काम केलं आहे. विविध स्पर्धा घेऊन चित्रकला स्पर्धा , गायन स्पर्धा , श्री गणेश डेकोरेशन स्पर्धा , आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन विविध संकल्पना मी राबवल्या ,यासाठी मला डॉ. रवींद्र आरळी ,संस्थापक अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ जत यांची साथ बोलायची लाभली. आज समाजामध्ये ज्या विविध संघटना आहेत. त्यामध्ये जाऊन विद्यार्थी ,विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या घटकांचा अभ्यास करून मनोबल वाढवण्याचे काम मी केले आहे .विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषद, जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा संघटना कार्यालय यांच्यावतीने दरवर्षी कब ,बुलबुल स्काऊट ,गाईड जिल्हा मेळावा भरण्यात येतो. विशेष म्हणजे ह्या मेळावाची सुरुवात झाल्यापासून आज अखेर मी अँडव्हान्स पार्टी लीडर कामकाज करीत आहे. स्पर्धा निश्चित झाल्यापासून स्पर्धा संपले पर्यंत हे काम आमची अॅडव्हान्स पार्टी सदस्य वर जागा निवडणे ,मांडणी करणे नकाशा करणे ,विविध कार्यक्रम आखणी करणे विविध कामे गेली नऊ वर्षे मी करीत आहे.
याचा मला अभिमान आहे. त्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे सहकार्य मला लाभलेले आहे. स्काऊट गाईड चळवळ: जिल्ह्यामध्ये उभी राहावी यासाठी मी विविध व्याख्याने, प्रात्यक्षिके याद्वारे ही प्रबोधन करीत आहे .जिल्ह्यातल्या विविध शाळेमध्ये जाऊन मी हे कामकाज केले आहे .सामाजिक काम करत असताना स्काऊट, गाईड चळवळीमध्ये जत मध्ये माझी शाळा सुद्धा स्काऊट, गाईड विषयामध्ये पुढे आहे . स्काऊट , गाईड राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थीनी पुरस्कार मिळालेला आहे .विशेष म्हणजे एका वर्षी मला राजभवनामध्ये जाऊन सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा बहुमान मला मिळाला त्यामध्ये स्काऊट दोन गाईड त्यांना घेऊन राजभवनामध्ये राज्य पुरस्कार कार्यक्रमाला माझी उपस्थिती होती . हा सोहळा बघण्याची संधी मला प्राप्त झाली. स्काऊट, गाईड जिल्हा कार्यालयामध्ये अर्थ विभाग सदस्य अशा विविध पदावर मी काम केले आहे प्रत्येक वेळी स्काऊट गाईडचे जे सामाजिक उपक्रम होतात. त्याची अंमलबजावणी मी माझ्या तालुक्यात ए .डी.सी. म्हणून कामकाज केले आहे. खरी कमाई ,ध्वज निधी असू दे हा निधी जिल्हा पेक्षा जास्त प्रमाणात मी जमा करून जत तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. स्काऊट ,गाईड हा विषय व विविध उपक्रमाद्वारे जागृत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. बऱ्याच गोष्टीसाठी आर्थिक बाबीची गरज होती. त्यावेळी मी माझ्या परीने प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही स्काऊट मास्टर कडे स्वतःच्या मालकीचा तंबू नाही माझ्याकडे भव्य असा तंबू आहे .लागणारे साहित्य सर्व माझ्याकडे आहे. एखादी गोष्ट करताना पदर मोड करावी लागली की मी नेहमीच करतो .ज्यावेळी मला असाही होतं शासकीय रेखाकला परीक्षा: एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा,इंटरमिजीएट डॉईग ग्रेड परीक्षा मी सेवेत आल्यापासून आज अखेर या विषयांमध्ये जास्तीत ,जास्त विद्यार्थ्यांना बसवणे आणि निकाल नव्वद ते शंभर टक्के लावणे. हे का मी करत आलो आहे . मी सुरुवातीला आलो त्यावेळेला पाच ते पंधरा विद्यार्थी बसायचे. आता 100 ते 200 विद्यार्थी बसतात आणि निकाल हा 90% ते 100% टक्के निकाल लागतो या शासकीय परीक्षेसाठी विभागीय केंद्रावर माझी डी .सी. एम .(D.C.M.)या पदावर नियुक्ती झाली . हे कामकाज सलग नऊ वर्ष केले आहे . शासकीय रेखाकला परीक्षा: एलिमेंटरी व इंटरमिजीएट डॉईग ग्रेड परीक्षा परीक्षा नविन अभ्यासक्रम बदलला. त्यावेळी सुद्धा अभ्यास मंडळ निरीक्षण गटावर माझी नेमणूक झाली होती .मी ज्या ठिकाणी काम केले . तेथे सर्वस्व अर्पण करून छान काम केलं शासकीय रेखाकला परीक्षा यामध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनी उज्वल हे संपादन करीत आहेत. याचा मला अभिमान आहे शिवाय चित्रकला स्पर्धा दैनिक सकाळ, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा सुयश प्राप्त करतात.
जिल्ह्यामध्ये कोणतीही चित्रकला स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये माझे जत हायस्कूल जत चे विद्यार्थी सहभागी होतात . नाही तर नवल विद्यार्थ्यांना या कलेमध्ये गेले 35 वर्ष अहोरात्र कष्ट करून त्या विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षा शालेय परीक्षा राज्यश्री परीक्षा या सर्व स्तरावर विद्यार्थ्यांना मी घेऊन विविध ठिकाणी पोचलेला आहे याची पोस्ट होती म्हणजे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची चित्रे राज्यस्तरीय मध्ये व जपानी चित्रकला स्पर्धा सहभागी झाली. माझे आठ ते दहा विद्यार्थी, विद्यार्थिनी कलाशिक्षक ,कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत . कलेचा महिमा आपल्या पद्धतीने देत आहेत. ही सर्व प्रेरणा काम करताना अनेक मुख्याध्यापक आले ,निघून गेले पण मला भेटलेले मुख्याध्यापक डॉ.श्रीपाद जोशी सर यांची प्रेरणा ,त्यांची शबासकी देण्याची वेगळी शैली ! ती आज अखेर माझ्या पाठीशी आहे .असं मला वाटतं आज अखेर कुठे भेटू दे सुभाषराव ! कसं काय चाललंय तुम्हांला काय कमी असलं तर मला सांगा .बरेच दिवस झाले तरी सुद्धा यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम कमी झालं नाही .म्हणूनच मला वाटतं मला भेटलेली देव माणसं डॉ. श्रीपाद जोशी सर ...
-लेखक : श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जत हायस्कूल,जत.
भ्रमणध्वनी:८००७२२७५९७. ________________________
Comments
Post a Comment