आभाळा एवढा मोठ्या मनाचा नेता...! आर.आर. पाटील (आबा)
आठवणीतीले क्षण...!
श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक, स्काऊट मास्टर
जिल्हा परिषद सांगली, प्राथमिक शिक्षण विभाग सांगली,भारत स्काऊट अँड गाईड जिल्हा कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी जिल्हा मेळावा चे आयोजन होत असते. या जिल्हा मेळावा मध्ये अँडव्हान्स पार्टी लीडर म्हणून काम पाहतो. मेळाव्याचे घेण्याचे स्थळ निश्चित झाल्यानंतर जिल्हा कार्यालय आम्हांला त्या स्थळाची पाहणी करण्यासाठी पाठविते, स्काऊट मास्टर श्री .सुभाष शिंदे व श्री वसंत माने आणि जिल्हा कार्यालयातील काहीजण मिळून आम्ही त्या स्थळांची पाहणी करतो. त्याची मांडणी , पाण्याची सोय, विद्यार्थी , विद्यार्थिनींना सोयीस्कर अशा सर्व सोयी आहेत की नाहीत .हे पहिले जाते. सन: २०१२/२०१३ ला जिल्हा मेळावा कवठेमंकाळ येथे घेण्याचे निश्चित करण्यात आलं होतं . त्यावेळी हा मेळावाची दिनांक आठ ते दहा फेब्रुवारी २०१३ पर्यंत घेण्याचे निश्चित करण्यात आलं होतं.मी( श्री.सुभाष शिंदे ) आणि श्री. वसंत माने स्काऊट मास्टर मैदानाची जागा कशी आहे .पाहण्यासाठी गेलो . आम्हांला यावेळी मैदान बघण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज होती .कारण मा. श्री .आर .आर .पाटील ,गृहमंत्री आणि वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी , राज्यस्तरीय स्काऊट अधिकारी या मेळाव्यास येणार होती. त्यामुळे आम्ही मैदानाची आखणी महांकाली हायस्कूल पटांगणावर निश्चित केली. दिनांक १ फेब्रुवारीपासून मी (श्री. शिंदे सर) ,श्री. माने सर मैदानाची पाहणी करण्यासाठी जात होतो .जागाचे मोजमाप करणे . कब ,बुलबुल स्काऊट, गाईड जिल्ह्यातून येणारे संघ त्यांची व्यवस्था करणे. तंबू , व्यासपीठ , सर्व प्रकारचे स्टॉल स्वच्छतागृह ,जागा पाण्याची सोय आणि या मेळाव्याचे उद्घाटन समारोप व शेकोटी कार्यक्रम , प्रात्याक्षिके या सर्वांना सोयीस्कर अशी जागा निवडली व त्याप्रमाणे मांडणी करण्यात आली. खऱ्या अर्थाने हा मेळावा विशेष होता ! या मेळाव्याच्या तयारीसाठी कवठेमंकाळ येथील आर .आर .पाटील , आबा यांचे मित्रमंडळी मदत करण्यास येत होती .त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि स्काऊट ,गाईडच्या नियमाने आम्ही ही सर्व तयारी पूर्ण केली. जिल्हा कार्यालय तर्फे आम्हांला योग्य त्या सूचना देण्यात येत होत्या मा. शिक्षणाधिकारी साहेब ,तहसीलदार साहेब, आम्हांला योग्य ते मार्ग करीत होते.
मी ( श्री.सुभाष शिंदे )जिल्हा मेळावा स्थळाचा नकाशा तयार केला. त्याप्रमाणे तिथे असणारी मंडळी सुद्धा आम्हांला मदत करत होती .या मेळाव्यात मध्ये काही विशेष गोष्ट जाणवली... मा. श्री .आर .आर. पाटील गृहमंत्री साहेब येणार म्हटल्यानंतर आमच्या अंगामध्ये एक वेगळा उत्साह होता. दिवस-रात्र आम्ही मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत होतो .सर्व तयारी झाली उद्या मा. गृहमंत्री श्री. आर .आर .पाटील साहेब येणार म्हणल्यानंतर आम्हांला खूप आनंद झाला .आम्ही त्या रात्री अँडवान्स पार्टी चे सदस्य जेवण करून बसलो होतो .दहा वाजले असेल तेंव्हा मा.आर आर पाटील साहेब यांचे मित्र आमच्याकडे आले . आबांचा निरोप आहे .तुम्ही पटकन आमच्या बरोबर चला आम्हांला वाटलं काय झालं कुणास ठाऊक पण त्यांना स्काऊट, गाईड चळवळी इतिहासा ची माहिती संदर्भात आम्हांला विचारले, त्याचे लेखन करून द्या मुंबई ला माहीती पाठवण्याची आहे . आम्ही लेखन करून दिले. पण थोड्या वेळाने ती मित्रमंडळी परत आली.
आजुन थोडी माहिती हवी आहे. परत एक लेख लिहून द्या. आम्ही सर्वांनी मिळून ती माहितीचा लेख पाठवला.. त्यावेळी आम्हांला एक प्रश्न पडला. आबांना स्काऊट ,गाईड चळवळीशी माहिती आहे. ते किती बारकाईने माहिती विचारत आहेत. आम्ही परत आमच्या तंबूमध्ये आलो आणि झोपी जाणार होतो . आम्हांला वाटलं परत आबा आपल्याला माहिती मागणीत, मग आपण आणखी थोडं लिहूया पण तशी वेळ आली नाही. आम्ही झोपी गेलो .उदघाटन कार्यक्रम झाला .आबाचं भाषण इतकं अप्रतिम होतं की आम्हांला वाटलं, आम्ही लिहून दिलेलं आंबा बोलतील पण आबा ...! तसं केलंच नाहीत ... आपल्या मनातील स्काऊट, गाईड चळवळीशी मार्मिक पणे विचार मांडले,शालेय जीवनातील स्काऊट चे अनुभव सांगितले. माझ्यासारख्या स्काऊट मास्टरला प्रश्न पडला. एखादा नेताला किती अभ्यास असतो . इतकी माहिती मिळवून सुध्दा पण शेवटी आबा आपल्या मनातील विचार तू व्यक्त केले . आबा विषयी पहिल्यापासूनच आम्हांला कुतूहल होतं , आता तर आबांनी लावं असं वाटलं ,आपण त्यांना अनेक प्रश्न विचारावे असं वाटलं. तसे करता येत नव्हतं ... कारण आंबाचे बॉडीगार्ड पोलीस चारी बाजूला होते. आबा कब ,बूलबुल ,स्काऊट ,गाईडचे जेवढे तंबू होते. तेवढ्या तंबूला भेट देत होते.
तिथे असणारा स्काऊट, गाईड कब ,बुलबुल यांना ते अनेक प्रश्नांचा भडीमार करीत होते.तेवढ्यात तिथे शिक्षक दिसला की त्यांनाही प्रश्न विचारी आबा पूर्ण जिल्हा मेळावा फिरत होते .प्रत्येकाला प्रश्न विचारत होते . त्यांचे उत्तर घेत होते. खरंच आबा हे नेते नसून, एक स्काऊट मास्टर आहेत असे वाटले ! कार्यक्रम झाला आणि त्यानंतर हेलिपॅड वरती हेलिकॉप्टर तयार होते. आबा तिकडे जात होते .सगळ्यांना नमस्कार करत होते . त्यांच्या मागे सगळेजण जात होतो .तेवढ्यात मुलगा पळत ,पळत आला. बॉडीगार्ड पोलिसाने अडवलं.. त्याला ए ...पोरा थांब जाऊ नकोस ? आबांनी हा प्रकार पाहिला आणि त्या मुलाजवळ गेले बाळ मला काय विचारतोय तूचे काय काम आहे ? तुम्हीं हेलिकॉप्टरने मुंबई जाणार आहे ना ....मग काय तू मुंबईला येतोस का ? तो मुलगा म्हणाला नाही ...माझी अशी इच्छा आहे की कवठेमंकाळ येथे भरलेल्या कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा वरती तुमचं हेलिकॉप्टर बरोबर दोन वेळा फिरले पाहिजेल! असं होय...! आबांनी मुलाचा पाठीवर थाप टाकली. आणि आंबा हेलिकॉप्टरच्या दिशेने निघून गेले. मला वाटलं एवढे मोठे नेते आणि माझ्या मनात एक विचार होता. त्या मुलाचे विचार ऐकत होते आबा कसे करतील याचा विचार करत होतो! थोडा वेळाने आभाळात हेलिकॉप्टर उडालं पण जो विद्यार्थीने आबांला सांगितलं होते तो विद्यार्थी तसाच उभा होता आणि मी त्याच्यापाशी उभा होतो. आम्ही जवळच बघत होतो. आबा त्या मुलाने सांगितलेली गोष्टीकडे लक्ष देतात की नाही. असा विचार करीत होतो. आणि आकाशाकडे बघत होतो. काय आश्चर्य ! कवठेमंकाळ येथील जिल्हा मेळावा वरती दोन वेळा हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्यावर ते आंबाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने निघून गेले .....तो मुलगा आनंदाने उड्या मारत होता आणि म्हणंत होता गृहमंत्र्यांनी माझं ऐकलं..... आबांनी माझं ऐकलं !असं म्हणत तो मुलगा नाचत होता. मी त्याचा जवळ होतो . मी पण टाळ्या वाजवत होतो . ग्रामीण भागात जन्मलेला नेता कसा असतो .मी प्रत्यक्ष पहिला आणि मन भरून आलं! हे उदाहरण बघायला मिळण्यास भाग्य लागत...! तिथले सर्व शिक्षक, शिक्षिका सुद्धा त्या मुलाचं कौतुक वाटलं ! मुलांन सांगितलेलं आंबानी ऐकलं होतं .त्यांना सुद्धा आनंद झाला .आंबा हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने निघून गेले .आणि तिथं कवठेमंकाळ मध्ये जिल्हा मेळाव्यात एक प्रसंग आजही माझा मनात घर करून आहे ! या थोर नेत्याला माझा सलाम! आंबाना या स्मृतीला सदैव
सुद्धा सलाम!!!!!
- श्री.सुभाष सदाशिव शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर, अँडव्हान्स पार्टी लीडर,
जिल्हा मेळावा. (मोबाईल क्रमांक -८००७२२७५९७)
Comments
Post a Comment