श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक स्काऊट मास्टर यांचे प्राथमिक शिक्षण...


प्राथमिक शिक्षण : माझा कला प्रवास ..
- श्री.सुभाष शिंदे 
माझ्या कलेची पहिली प्रेरणा: बुधगावाचा श्री हनुमान मंदीरातील फळा...!
     - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
मुळ गाव: बुधगाव ता.मिरज जि.सांगली
इयत्ता १ ली पासून चित्रकलेचा छंद मला होता.तेंव्हापासून रेखाटन, रंगकाम यांचा दररोज सराव नेहमीचा असायचा ...!
एकवेळ अभ्यास कमी पण चित्रकला सराव जास्त करायचा..!
घरातील माझ्या बहिणी मला रागावत सारखी चित्रे काढतोस अभ्यास कधी करणार? ते कागद, रंगत साहित्य लपून ठेवत असतं आणि माझ्या वडिलांना सांगयच थोडा त्रास होता पण ते माझ्या चित्रांना त्यांना अभिनंदन करायला विसरले नाहीत!
माझ्या घरांतील पाचजण शिक्षण घेत होते.घरातील परिस्थिती गरिबीची होती.त्यामुळे कला विकास करण्यासाठी साहित्य कमतरता मला भासु लागली.तेंव्हा एक कल्पना सुचली.माझ्या घराजवळ श्री हनुमान मंदिर आहे.तेथे फळा होता.  तेथे  पुजारी गुरव मामा  होता.त्यांची मैत्री केली.त्याला मी विचारले पुजारी मामा मंदिरात फळांवर फक्त शनिवारी हनुमानाचे चित्र काढू का? तो माझ्या कडे बघून म्हणाला खरच तुला चित्र काढता येतात.... मी म्हणालो हो! चित्र काढायला परवानगी मिळाली पण खंडू ला पैसे शाळेत गेल्यावर श्रीमती दातार  मॅडमना एक खंडू मागितला मॅडमनी विचारले कशाला पाहिजेल...?
मी त्यांना सांगितले शनिवारी मी मंदीरात फळ्यावर श्री हनुमान चे रेखाटन करणार आहे. त्यांना माझी संकल्पना आवडली. त्यांनी मला एक नाही चार खंडू दिले. मला खूपच आनंद झाला! शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर मी दप्तर घरात ठेवून. पळत मंदिर गेलो.फळा स्वच्छ केला. तेवढ्यात पुजारी मामा आले आणि म्हणाले सुभाष .... काय करतोय....? त्यांना परत एकदा सांगितले श्री हनुमानाचे चित्र रेखाटन करतोय...! हो का अरे तू सांगितलेलं विसरुन गेलो बुवा! तू चित्र काढ... चित्र छान तर बरं! नाहीतर तुला फळा स्वच्छ करायला पाहिजेल.. मी म्हणालो ठीक आहे.
मी मंदिरातील मूर्ती ला नमस्कार केला.चित्र काढायला सुरुवात केली.माझे रेखाटन सुरू झालं... तसं पुजारी मामा म्हणू लागले.वा वा..... छान छान पोरा ! प्रत्येक शनिवारी चित्र काढायला येत जा ...!
मला खूपच आनंद झाला. माझ्या कलेला ईश्वरकृपा झाली. त्यादिवशी आमच्या  श्रीमती दातार मॅडम यांनी गुपचूप मंदिरात येऊन चित्र बघून गेल्या. हे मी दूर उभे राहुन पाहिले! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मॅडम यांनी मला जवळ बोलावले आणि माझं अभिनंदन केले!
आणि चित्रकलेची वही व तेलकट रंगीत खंडूची
पेटी दिली. माझ्या कलेला दिलेली ही दाद होती!
मॅडम यांनी सांगितले की दररोज सुविचार व चित्रे शाळेत काढायची बरं का? माझ्या मित्रांनी घरात जाऊन सांगितले मग काय .... घराची मॅडमना सांगतले.... अभ्यास करायला सांगा.
  मग प्रत्येक शनिवारी श्री हनुमान मंदिरातील फळांवर काढत होतो. मला साहित्यासाठी पैशाची 
 गरज होती. मला एक कल्पना सुचली मंदिरातील फळांवर चित्र काढुन त्याखाली मला मदत करा 
असं लिहिलं! चित्र बघण्यासाठी आलेल्या लोकांनी मदत करायला सुरुवात झाली.मला प्रत्येक शनिवारी पाच ते दहा रुपये मिळायला 
लागले. मग घरातील कुणाही न सांगता कलेचा
विकास करण्यासाठी संधी मिळाली!
तेव्हा पासून आज अखेर  बुधगाव मध्ये श्री.सिध्देश्वर व जोर्तिलिंग.यात्रा व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा वेळी बुधगावाच्या श्री हनुमान मंदिरातील फळांवर आज अखेर श्री हनुमानाचे चित्र काढतो....! या चित्र काढायला आज रोजी ५६ वर्ष  होत आहेत. माझ्या कलेची प्ररेणा मी विसरलो नाही! 
आजसुद्धा बघा ,! श्री.हनुमानाचे चित्र काढले आहे. याला  आज  चित्र फलक लेखन ला      ही माझ्या बुधगावाचा श्री हनुमानाचे मंदिरातील फळा ! मी आज अखेर मी विसरलो नाही ‌ नोकरी निमित्त तीसपेक्षा परगावी गेला.
    यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जर प्रयत्न केला तर आपल्याला कोणतंही गोष्ट शक्य होऊ शकते.
माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर -२ बुधगाव येथे झाले. ही शाळा माझ्या घराजवळ होती. शाळेत माझे नाव काका  राजाराम शिंदे ( काका ) यांनी घेतले. शालेय शिक्षण घेत असताना माझी थोडा त्रास झाला.कारण  मला इयत्ता - पहिली व दुसरी मध्ये वर्षांमध्ये  मला बोलता येत नव्हतं. त्यामुळे शाळेत जाणं आणि शिक्षण घेणं ही मोठी जबाबदारी माझ्यावर तसेच माझ्या आई-वडिलावर होती. ज्यावेळी प्रवेश घेतला त्यावेळी मला बोलता येत नव्हते .त्यामुळे घरातील र्डॉक्टरना‌ व धार्मिक विधी करून उपाय करीत राहायचे पण दुसरी मध्ये असतानाच अचानकपणे मला बोलता येऊ लागलं. त्याचा  सर्वांना खूप आनंद झाला. शिक्षक, विद्यार्थी माझ्याकडे येऊन बोलत होते. त्यावेळी  शाळेतील  सर्व मुले मला गोळ्या बिस्कीट देत होती. कारण मी आज बोलू लागलो. मग त्यानंतर आज अखेर मी बोलतच आहे.  प्राथमिक शाळेत असताना साधले सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांच्याबरोबर प्रेमाने वागत असतं  शाळेमध्ये असताना आमच्या मॅडम दातार मॅडम ह्या माझ्याकडून वर्ग सजावट करून घेत असत, भिंतीवर चित्र काढणे, सुविचार लिहिणे आणि वर्गामध्ये सर्व सजावट मी आणि माझ्या शाळेतील वर्गमित्र कडून करून  घेत होते .त्यामुळे मॅडम आमच्यावर खूप खुश  असायच्या . ह्या मॅडम आम्हांला  देवदूतच वाटायच्या प्राथमिक शिक्षण इयत्ता- पहिली ,दुसरी आणि तिसरी मध्ये शिक्षण घेत होतो . आम्ही   चौथीला असताना आमच्या गावामध्ये मा. मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील येणार होते . त्यांच्या गावातून  भव्य स्वागत करण्याचे  नियोजन बुधगाव  ग्रामपंचायत सदस्य व बंधू-भगिनी  ठरविले होते .
त्यामुळे आम्ही पूर्ण रस्त्यावर सजावट करणे रांगोळी टाकणेचे  काम केले , आम्ही ही सर्व कामे होतो . शाळेमध्ये ज्या विद्यार्थी , विद्यार्थिनींना लेझीम सराव करत होते. आणि मा. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे आगमन आमच्या बुधगावांमध्ये झाले .सुरुवातीपासून ते व्यासपीठापर्यंत आम्ही लहान मुले, मुली  लेझीम खेळून त्यांचे स्वागत  करण्याच्या मान आम्हांला मिळाला होता. आमचे लेझीम  पथकांचा खेळ पाहून मा. श्री. वसंतराव दादा पाटील ,मुख्यमंत्री साहेबांना आनंद झाला . आणि व्यासपीठावर जाण्याआधी त्यांनी आम्हां सर्व लेझीम खेळणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थ्यांना जवळ बोलावलं! आणि शाबासकी दिली . आम्हांला खूप अभिमान वाटला ! प्राथमिक शाळेत असताना आम्हांला हा बहुमान  मिळाला.  शिक्षक ,शिक्षिका इतकं छान ज्ञानदान  करायचे  मन भरून यायचं !
  आम्हांला समाधान वाटायचे कोणतीही गोष्ट करताना त्यांच लक्ष असायचं प्रत्येक वेळी काही चुकलं तर प्रथम ती चूक सांगून ती  चुक परत होणार नाहीत याकडे लक्ष त्यांचे असायचे . त्यामुळे शिक्षकांनी कोणतेही काम सांगू दे ,ती  कामे आम्ही आनंदाने करत असत .आज अखेर त्यांच्या पुढे जाताना सुद्धा आम्हांला आधारयुक्त भीती वाटते. आमचे गुरुजन जाऊ देत आम्ही नंतर जाऊ ही भावना आजच्या घडीला सुद्धा होऊ लागलेली आहे .प्राथमिक शाळेत असताना वेगवेगळे शिबिर आयोजित केले जायचे.  त्यामध्ये समाजसेवा, कब ,बुलबुल विविध संघांमध्ये सहभागी होऊन आनंदाने जे दिलं ते का आम्ही सामुदायिक पुणे काम करीत असे.आम्ही आमच्या गावामध्ये ज्यावेळी यात्रा असते.  आम्ही परिसर स्वच्छता करीत असे. शाळेमध्ये असताना विविध स्पर्धा असायच्या गायन ,कथाकथन चित्रकला स्पर्धेतून   एकमेकांच्या सहकार्य  प्रेम वाटायचं असे उपक्रम मॅडम उपक्रम राबवत  होत्या .शाळेत असताना विविध उपक्रम याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. यासाठी काही वेळेला हिवाळी , उन्हाळी सुट्टी असली तरी सुद्धा मॅडम शाळेत बोलवत आणि विविध सणांची, विविध उपक्रम याची माहिती  आम्हांला सांगत प्राथमिक शाळेतील शिक्षण खरंच जीवनाला दिशा देणारे! आदर्शवादी शिक्षण !आहे. ही भावना आजही  माझ्या मनात आहे.आम्हांला श्री . कोष्टी गुरुजी केलेले उपकार हे विसरता येत नाही .आज चित्रकार म्हणून मी आहे. त्यांची प्रेरणा आहे.माझ्या प्राथमिक शाळेमध्येच श्री.कोष्टी गुरुजी हे होत! त्यांना चित्रकला , अक्षरलेखन याची खूप आवड होती .शाळा आल्यानंतर ते एका पिशवीमध्ये रंग ,साहित्य, ब्रश कापड, पट्टी असं साहित्य घेऊन यायचे. गावातील लोक त्यांच्याकडून सायकल वरती नाव टाकून घेत ,आणि रिकामे वेळी ते आम्हांला शिकवायचे त्यांचं रेखाटन खूप सुंदर होतं धार्मिक कथा, कादंबरी ,रामायण महाभारत या विषयावर त्यांनी अनेक रेखाटन केली आहेत. आम्ही सुट्टी दिवशी           त्यांच्याबरोबर असायचं गुरुजी आम्हाला काम सांगायचं ब्रश, रंग साहित्य व्यवस्थित  ठेवणे सांगायचे ,मला आवड असल्यामुळे ही सर्व कामे मी आवडीने करे. असो पुढे, पुढे गुरुजी मला  पेटिंग चेहरा सोडून सर्व व्यक्तींचे रंग पेटिंग काम करायला मला   आवडतं यामुळे कलेची  बीजे प्राथमिक शाळेमध्ये रुजली ! शाळेमध्ये अभ्यासाबरोबर कलाचा अभ्यास  होतं पण ही वार्ता घराकडे सर्वजण सर्वजण खवळत असतात पहिला अभ्यास कर मग चित्रकार त्यामध्ये जास्त करून माझी मोठी बहीण मला ताकद करायची चित्र काढून पोट भरते का अभ्यास कर ती कवळ्याची पण आम्ही काय करायचं अभ्यास हा घरीच आणलाच नाही म्हणजे शाळेत मंदिरात किंवा मित्राच्या खोलीवर चित्रे काढत असे तरीपण हे करत असताना माझे वडील संध्याकाळी भजनाला घेऊन जायचे भजन घेऊन जायचे त्यामुळे माझी पण जास्त चित्रे काढतोय भजन करतोय असं कसं होणार याची चिंता म्हणजे बहिणीला असायची वडील म्हणायचे इयत्ता - पहिली ते दहावीपर्यंत वडिलांच्या बरोबर भजन करत जात असे त्यामुळे घरातील माझी बहीण खूप चिडायची. हा अभ्यास करत नाही, चित्र काढतोय ,भजन करतोय त्याचं काय होणार? देवास माहिती अशा तऱ्हेने प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत माझे पूर्ण झाले.
सन-१९८०-१९८१ ला बुधगाव हायस्कूल, बुधगाव. मध्ये इयत्ता -८ वी मध्ये माझे शिक्षण सुरू होते.कलाशिक्षक -गुरूवर्य परीट सरांची प्रेरणा होती.  ते कोणत्याही चित्रकला स्पर्धेच्या विशेषी मला माहिती देत असतं. मी पण चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होत असे. माझी अडचण रंग साहित्य विपुल प्रमाणात माझ्याकडे नव्हते. घरी रंग साहित्य मागितलं की मिळतं नसे. पण स्पर्धेत सहभागी होणार हे मात्र माझं नक्की होतं! मी मित्रांना खराब किंवा शिल्लक रंग मागत असे.त्यापासून रंग साहित्य जमा करीत असे.
सांगली मध्ये आमराई मध्ये भव्य चित्रकला स्पर्धा होती. असं मला समजले होते.त्या स्पर्धेमध्ये सहभागी फक्त आमचा गावचा  मी एकटाच होतो. बुधगाव ते सांगली पाच किलोमीटर अंतर होते. एस टी ने जाण्यासाठी पैसे नव्हते.सायकल पण  माझ्या कडे नव्हती. चित्रकला स्पर्धेला कसं जायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता .चित्रकला स्पर्धेला सांगलीला जाणार हे घरी व शाळेत सुद्धा सांगितलेलं नव्हते .स्पर्धेचा दिवस उजाडला .मी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य ,रंग ,पोस्टर खडू, पट्टी ,पेन त्याची एक पिशवी तयार केली .आणि शाळेचे दप्तर घेऊन शाळेत गेलो. माझ्या मित्राला मी सांगितलं की हे दप्तर तुझ्यापाशी असू दे ! माझ्या मित्राने विचारलं तू कुठे निघालास? मी चित्रकला स्पर्धेला सांगलीला आमराई मध्ये जात आहे .तुझ्या जवळचे रंग मला दे !अरे ....बुधगाव पासून आमराई खूप लांब अंतर आहे. कसं जाणार ? माझ्या मित्राने मला विचारलं ,अरे मला त्या चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. मी जुन्या बुधगाव  रोड ने चालत ,चालत त्या चित्रकला स्पर्धेला जाणार आहे .हे माझं ऐकून माझ्या मित्राने माझ्या हात,  हातात घेऊन मला त्याने चित्रकला स्पर्धेला शुभेच्छा दिला ! त्यांने त्याच्या जवळचे सगळे रंग साहित्य मला दिले. वा..! सुभाष ! तू स्पर्धेमध्ये सहभागी हो !आणि बक्षीस घेऊन ये बरं का ! मी कुणाला न सांगता जुन्या बुधगाव रोड ने आमराई  दिशेने चालत जात होतो. मनात जिद्द होती .आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आणि  बक्षीस मिळवायचे! चालत ,चालत,चालत जाताना खूप वेळ झाला .आणि स्पर्धा संपायच्या वेळीच मी  आमराई मध्ये पोचलो. तेथील संयोजकांनी माझ्याकडे बघितले. हे बाळ कुठून आलायस ? साहेब !मी बुधगाव वरून आलोय ते साहेब खवळले .अरे  तुला स्पर्धेची वेळ कळत नाही का रे .स्पर्धेची वेळ बारा ते दोन वाजेपर्यंत ची होती ‌आणि तू आता दीड वाजता आला आहेस! वेळेचे भान तुला नाही का? मी शांत उभा होतो. आणि त्यांना  मी नमस्कार केला. मला  चित्रकला स्पर्धा आणि स्पर्धेची वेळ मला माहिती होती. पण ...इथे येण्यासाठी एसटी साठी पैसे नव्हते .आणि माझ्याकडे सायकल पण  नाही आणि  रंग कसे तर गोळ्या करून येथे आलो आहे. ‌ते चिडलेले साहेबांनी मला जवळ घेतले .तुझं नाव सांग काय आहे? .मी सुभाष शिंदे बुधगावाचा आहे. तुला स्पर्धेसाठी सहभागी होता येईल. पण एक अट आहे ....कोणती ? बघ तीस मिनिटांच्या आत तुझं चित्र  काढले  पाहिजेल .आणि तू दिलं पाहिजेल हे जर तुला मान्य असेल तर तू या   चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊ शकतोस . मला  खूप आनंद झाला .मी पण  त्यांनी सांगितलेली वेळेच्या  आत  चित्र काढून देतो. असे मी म्हणालो ...!  मला या चित्रकला स्पर्धेत  सहभागी होण्यासाठी संधी  मिळाली .संयोजकांनी मला कागद दिला माझ्या मित्रांच्या रंग साहित्यातून एक सुंदर निसर्ग देखावा! मी  रेखाटन करून रंगकाम करीत होतो. माझे चित्र बघण्यासाठी आजूबाजूचे मुलं माझ्याकडे येत होती .अरे वा! ...वा छान! छान !असे म्हणत होती .मी चित्र काढलं आणि विसाव्या मिनिटालाच ते चित्र मी संयोजकांच्या हाती दिले.ते खुश झाले अरे तू एकटाच आहेस .होय ,मी शाळेत, घरी पण सांगितलं नाही . संयोजकांनी मला  म्हणाले  या चित्रकला स्पर्धेचा निकाल दहा मिनिटात लागणार आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मला  मिळायचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत  होता ! तेथे जवळच हनुमान मंदिर दिसलं आणि जाऊन दर्शन घेतलं आणि हनुमानाला माझ्या मनाने सांगितलं हनुमान देवा !तुझ्यामुळे मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. मी त्या  मंदिरा  जवळ बसलो होतो.चित्रकला  स्पर्धेचा निकाल जाहीर होत होता. मी काही त्या निकाल ऐकण्यासाठी गेलो नव्हतो .तेवढ्यात माझं नाव पुकारलं माझा त्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. पण तिथं मी नव्हतोच ...साहेब, मला शोधू  लागले.अरे शिंदे ! या मंदिरापाशी काय करतोयस... चल , तुझं चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहेस . हे  ऐकल्यावर मला खूप आनंद झाला. . मला  बक्षीस प्रमाणपत्र आणि मला पन्नास रुपयाची रक्कम मला मिळाली होती .मी ते बक्षीस घेतल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.  संयोजकांनी मला परत स्टेजवर बोलवलं. संयोजक म्हणाले हा मुलगा चित्रकला स्पर्धेसाठी बुधगाव वरून सांगली ला चालत आला आहे .आणि त्यानं कमी वेळेमध्ये चित्र सुंदर काढून प्रथम क्रमांक मिळाला आहे! त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन !!!
आमच्या गावचे प्राथमिक शिक्षक  पण चित्रकला स्पर्धेसाठी मुले  घेऊन आले होते .त्यांनी सांगितलं सुभाष आता चालत जायचं नाही .माझी सायकल आहे. तुला मी डबल सीट घेऊन जातो .तेवढ्यात रात्र झाली होती. घरातली सर्वजण मला शोधत होती. कुठे गेला सुभाष ..कुठे गेला माझ्या मित्राने घरी जाऊन माझं दप्तर दिलं .आणि सुभाष चित्रकला स्पर्धेला सांगलीला गेला आहे .असं सांगितलं. घरच्यांना बरं वाटलं .घरचे सगळे  घरा बाहेर उभे होते .तेवढ्यात गुरुजींच्या सायकलवरून मी बुधगावात  आलो .आणि आई मला खवळली तुला सांगून जायला काय होतं .आम्ही किती वाट बघायची ?.....गुरुजी, म्हटले अहो ! सुभाषाला  रागवू नका .त्याचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे . सर्वांनी माझं अभिनंदन केलं ! त्यावेळी आमच्या गावामध्ये एकच वृत्तपत्र येत असे    त्याचं नाव  नव संदेश आणि हा पेपर आमच्या घराच्या समोर च्या दुकानात येत  होता .त्या दुकानातील  मालकानं  पेपर मधलं  माझं नाव पाहून माझ्या वडिलांना बोलावलं .तुझ्या पोराचं नाव पेपर ला आले आहे.वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला .कारण पेपरला नाव कोणाचीही आलं नव्हतं ,माझ्या पोरानं चित्रकलेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळून पेपरला नाव आणलं .आणि  त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू  आले.ते सर्वांना सांगत होते. माझ्या मुलाचा पहिला क्रमांक आला !                 ही आठवण ज्यावेळी माझ्या मनात येते त्यावेळी मनात विविध भावना येऊन  माझ्या पण डोळ्यात आनंदअश्रू येतात.आनंद खूप होतो !
कथा एका माझ्या चित्रकला स्पर्धेची !
तुम्हांला कथा आवडली तर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी विसरू नका....!
माझ्या जीवनातील कलेच्या प्रवासातील अनेक प्रसंग लिहिण्यासारखं आहे ते लिहिणार आहे.
        - श्री.सुभाष शिंदे (बुधगाव) कलाशिक्षक,जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत,जत.ता.जत जि.सांगली
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
कलाविश्व महाविद्यालय , सांगली येथे इंटरमिजीएट डिप्लोमा ( सन-१९८८) या वर्गात प्रवेश घेतला होता. कलाशिक्षक ए्.टी.डी. पदविका माझ्या कडे होती. शिक्षण सुरू होते.त्यासाठी खर्च खुप होता.
काॅलेज करून रात्री चे दैनिक केसरी कला विभागात काम करीत होतो.
 शांतिनिकेतन येथील सौ.पाटील मॅडम यांनी बोलविले. जत ला एक नोकरी आहे. मूक बधिर मुलांची शाळा असून त्याला मान्यता आहे.पगार लवकरच सुरू होईल.तुम्हांला,
नाट्य, अभिनय, कलेची आवड आहे.असे पाटील मॅडम यांनी सांगितले.मी त्यांना सांगितले दोन ते तीन दिवसात सांगतो.  म्हणून निघून गेलो.
  मी आज अखेर माझं गाव , तालुका सोडून कोठेही गेलो नव्हतो. माझ्या आई, वडिलांना सांगितले.पण आईच्या डोळ्यात अश्रू आले.माझं पोरंकाच कसं होईल? आई चे अश्रू ने मलाही खूप वाईट वाटले.... पण वडिलांनी सांगितले तुझ्या मनात आहे.  तसं कर पण... पैशाची नियोजन तुला करावे लागेल. घरात पाच ,सहा माणसं आहेत.
मी दोन विचार करीत होतो.माझ्या मित्रांचा सल्ला घेत होतो.
तेवढ्यात शासनाची एड्स दिनानिमित्त जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धा होती. बक्षीसे मोठी होती.मी स्पर्धेत सहभागी झालो. दुसऱ्या दिवशी दैनिक केसरी मध्ये पोस्टर स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक  एक हजार रूपये, प्रमाणपत्र मिळणार जाहीर झाले. दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ झाल्यावर मी घरी आलो.आणि सांगितले मी जत जाणार आहे.
वडिलांनी तुला प्रवासाला जाण्यासाठी माझ्या कडे पैसे नाहीत.मला बक्षीस एक हजार मिळाले आहेत.त्यामधील पैसे मी तुम्हांला देणार आहे. हे ऐकल्यावर वडिलांच्या डोळ्यात पाणी आले.जीवनात काही क्षण येतात आणि योग्य संदेश देऊन जातात हेच खरे!
मी जाण्याची तयारी सुरू केली. एस.टी.चा मार्ग, पैसे माहिती घेतली.आणि प्रवासाला सुरुवात झाली.मनात अनेक प्रश्न आणि जत गेल्यावर आपले कोणीही ओळखीचे नाही.आज अखेर जत केंव्हा ही गेलो नव्हतो. कन्नड भाषा माहिती होती.ती बोलतात याची जाणीव एसटीत    बसल्यावर झाली. चार तासांच्या प्रवासानंतर जत स्टॅण्ड वरती एस टी आली.तेव्हा सायंकाळी -६वाजले. शाळा केव्हाच बंद झाली होती. आता जत रात्र कुठे काढायची ? निवारा शोधू लागलो. एक हमाल आला साहेब येथे बामणे लाॅज आहे. कमीतकमी पैसाच सोय होते.
मी बामणे लाॅज वरती एक रात्रीच्या मुक्कामासाठी माहिती घेतली.त्याचे पैसे मला जरा जास्तच वाटले. मी परत एसटी स्टँडवर आलो.तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. श्री.दत्त मंदिर जवळ पिण्याच्या पाण्याची सोय होती.हात पाय धुऊन मंदिराजवळ जेवण केले. आणि तेथे बसलो.
माझ्या जीवनातील सेवेचा प्रारंभ सुरू होता ! क्षणाक्षणाला प्रश्न निर्माण होत होते. त्यावेळी मोबाईल नव्हते बुधगाव येताना सांगुन आलो होतो.वेळ झाला तर मुक्काम करून उद्या येतो. रात्र झाली होती.एसटी स्टॅण्ड गर्दी कमी झाली. मंदिराच्या आवारात लाईट होती.तेथे जेवण केले.श्री दत्त मंदिरात विश्रांती घेतली. कशी तरी झोप लागली. सकाळी उठल्यावर  सर्व काही आवरले. 
सकाळी श्री.दत्त मंदिरात मनात म्हणालो श्री दत्त महाराज आज   रोजी मला जत मध्ये कोणीही ओळखीचे चेहरे,माणसे नाहीत.
जर मला नोकरी लागली तर जत नाहीतर जत तालुका माझा मित्र असेल.असे मी श्रीदत्त मंदिरात बोललो.आणि मुलाखत देण्यास मुक बधीर विद्यालय,जत कडे रवाना झालो.
मूक बधिर विद्यालय जत  प्रथम सुरूवात झाली. सेवेचा  पहिल्या दिवशी   प्रथम     श्री .कदम सर,श्री.रणदिवे सर , श्री.देशमुख, भुयार मॅडम,जाबशेट्टी मॅडम याची ओळख,
 संस्था व शाळेची माहिती देण्यात आली . मूक बधिर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी २५ ते २७...!
माझ्या मनातील संकल्पना होती. खूप मोठी शाळा असेल शाळेत विद्यार्थी अनेक असेल परिसर खूप मोठा असेल पण इथे आल्यानंतर मूक बधिर विद्यालय हे कुलकर्णी मळ्यामध्ये चार खोल्यांमध्ये भरत होते .मला दिसलं सर्व विद्यार्थी माझ्याकडे उत्सुकतेने बघत होती. त्याना बोलता येत नव्हतं . हात वारे...करत मुले...   विचारत होते. हे कोण आहेत? हे कोण आहे ? श्री. कदम सरांनी सांगितले.  की मी रेखाटन कसं करतो तसे हात वारे करून सांगितलं .हे सर ! तुम्हाला  चित्रकला शिकवणार आहेत.  त्यांनी  फळयावर  चित्र काढायला सांगितलं  ! मी फळ्यावर ज्यावेळी चित्र  रेखाटन करू लागलो. त्यावेळी ती मुले मोठमोठ्याने उड्या मारू लागली ! त्यांना वाटलं असेल छान,! छान !  सर्व विद्यार्थी , विद्यार्थ्यिनी माझ्याकडे हाताच्या द्वारे  थँक्यू !थँक्यू! असे म्हणत होती.
शाळा सद्यस्थिती: शाळेत एकही टेबल नव्हता फळे ,खडू चार  खुर्च्या होत्या . श्री.कदम सरांनी मला सांगितलं सर आपण उद्या मोरे वखारीतून फळ्या   आणायच्या त्या फळ्यापासून  सर्व शिक्षकांनी मिळून  रद्दा  मारून टेबल तयार करायचा .मी ही अवस्था बघून मला वाईट वाटले. पण नोकरी करायची ते काम करायला तयार झालो ! आमच्यातील लोहार हे सुतार कामांमध्ये ट्रेन होते त्यांनी देशमुख सर आणि मी फळ्या सायकलवरून आणल्या आणि शाळेचा पहिला टेबल! काय करायचं तयारी सुरू झाली .आम्ही रद्दा मारू लागलो .सर्व फळ्या रद्दून झाल्यानंतर आम्ही टेबल तयार करायची प्रक्रिया सुरू झाली. एक एक करता त्यावेळी दोन टेबल तयार झाले. टेबल बघून आम्ही सर्व शिक्षक आनंदाने त्या टेबल जरी बघत होतो. कारण ते पण काम करताना फळ्या आणणे , रद्दा मारणे  आणि टेबल तयार करण्यासाठी सर्व शिक्षकाचे कष्ट त्यामध्ये होतं! अशा पद्धतीने पहिला टेबल ! आमच्या सर्व शिक्षकांच्या कष्टातून तयार झाला. 
वर्गाची रचना आठ मुलांमध्ये एक शिक्षक!  आठ मुलांचा एक वर्ग ते पण प्रत्येक मुलाला   हेडफोन असतो. शिक्षकांच्या   गळ्यात माईक   आणि विविध शिक्षण  पद्धतीने  शिकवणे ! माझं काही मूकबधिर ट्रेनिंग झालेले नव्हतं, मी त्यांना चित्रकला, क्राफ्ट, नाट्य ,अभिनय हे विषय घेत होतो .सुरुवातीला मला प्रत्येक मुलांचा अभ्यास करावा लागला. त्यांच्याशी मैत्री करावी लागली. त्यांचे संभाषण करायचे विविध पैलू मला जाणून घेऊ लागलो. मी त्यांच्याशी एकरूप होऊन ! त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना चित्रकलेमध्ये शिकवत होतो. त्यांची आणि माझी मैत्री खूप छान ! झाली .मूकबधिर विद्यालय शिकवताना मला बोलणं कमी मूक अभिनय , मूक अभिनय,हालचाली याद्वारे त्यांच्याशी  बोलावे  लागे. त्यामुळे मी जास्त बोलणारा शिक्षक अबोल झालो! हस्तकलीमध्ये विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड करणे भेटकार्ड तयार करणे विविध कागदापासून विविध वस्तू करायला शिकवल्या आणि त्या वस्तूचे प्रशन भरून त्यापासून विक्री पण तयार झाली मुले बाकीच्या मुला पैकी ही मुले एकानी गोष्ट करताना एकाग्रता चिकाटी त्यांच्यामध्ये असते त्यामुळे हस्तकलामध्ये त्यांना कौशल्य प्राप्त होते.
      संस्था चालक श्री.गोसावी साहेब यांनी आम्हांला सुट्टीत सर्व्हे करा. मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवा. दि.१४ एप्रिल रोजी यादिवशी सर्वेक्षण करण्याचे नियोजन करून श्री.कदम सर, श्री.रणदिवे सर, मी (श्री.शिंदे सर) सर्वेक्षण सुरूवात आमच्या सायकल वरून  झाली. सकाळ पासून  प्रत्येक गावात जाऊन मूकबधिर मुलांची चौकशी सुरू झाली.
बरेच तासांनंतर आम्हांला तहान,भूक लागली. 
आमच्या कडे थोडे पैसे होते.पण हाँटेल नव्हते.सर्वजण आम्ही कोठे मिळते काय बघत होतो. मागे ,पुढे माळरान होते. आम्ही सायकलवरून प्रवास करत होतो. मनात नोकरी करताना हे कष्ट करण्याची तयारी दाखवली होती.
मला दूरवर मंडप दिसला, जवळ येताच स्पिकरचा आवाज ऐकू येऊ लागला. मला आनंद झाला.मी कदम सर, रणदिवे सरांना सांगितले आपण तेधे जायचे ! पाणी, खाण्यासाठी काही तरी सांगायचं!
भूक लागल्यामुळे सर्वजण तयार झालो.जवळ येताच आम्हांला  दिसले महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभ होता. आम्ही तीन सायकली बाहेर लावल्या! आमची ओळख तेथील कोणाशी नव्हती. मी मंडपात गेलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  गुलाब पुष्पे अर्पण केली. विनम्र अभिवादन केले!
हे कार्यकर्ते बघत होती. ते आमच्या जवळ आले .आमची चौकशी केली. आम्ही सारे जण  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.साहेब ,या शाळेत त्यांनी आम्हांला पाणी, खाऊ दिला. आम्ही ते पाणी आणि खाऊन झाल्यावर त्या सर्वांना धन्यवाद! 
आमच्या जीवनात सर्वेक्षण काम! आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं विनम्र अभिवादन! सदैव स्मरणात राहील!
माझ्या जीवनातील मनातील एक प्रसंग  :            :माझा गणवेश 
     -श्री.सुभाष शिंदे,जत
मी ज्यावेळी जत हायस्कूल, जत ला सेवेला प्रारंभ केला. त्यावेळी माझी परीस्थिती अत्यंत गरिबीची होती.  जेवण, कपड्यांसाठी पैसे नसल्यामुळे मी डाॅ.श्रीपाद जोशी, साहेबांना  सांगितले मी नोकरी करण्यास तयार आहे.पण.....डाॅ.जोशी साहेब म्हणाले पण काय...?
पगार येईपर्यंत माझ्याकडे फक्त ८०/-रूपये आहेत. मी कुठे राहु? खानावळ साठी पैसे नाहीत? शिवाय जत मध्ये माझं तुमच्या  शिवाय  ओळखीचे कोणीही नाही. साहेब ...मी पैसाचे  काय करू!  मी सांगत होतो.साहेब माझ्या कडे बघत होते.ते खुर्चीवरून माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले सुभाषराव! तुम्ही काळजी करू नका .मी आहे ना....! त्यावेळी माझ्या मनात  देव भेटल्याचा आनंद झाला! उद्यापासून सेवेत हजर व्हा! मी तुम्हांला महिन्याला तीनशे रुपये देतो. मला इतका आनंद झाला! माझे घरचे लोक मदत करणार नाही पण एक आदर्श मुख्याध्यापक माझी मदत करत आहे .हा माझ्या सेवेचा सुरूवातीचा एक चांगला अनुभव आला.                    त्या दिवशीपासून आज अखेर त्यांचं स्थान माझ्या मनात नेहमी स्थान प्रेरणादायी, गुरु समान आहे!                       मी अध्यापन करीत होतो .प्रत्येक महिन्याला सर मला ठरलेली रक्कम मला देत होते. पण त्या तीनशे रुपयात गावी आल्यानंतर आई-वडिलांना शंभर रुपये दावे लागत असे .मी अध्यापन करीत असताना त्यावेळी माझ्याकडे दोनच गणवेश होते .माझ्या मनात आलं की आपल्यालाही गणवेश घेतला पाहिजेल पण पैशाची बेरीज घरची परिस्थिती काय करावे असा काय प्रश्न पडला मला पडला. गावी जात असताना  एसटी तून जात असताना एक रस्त्याच्या कडेला असलेले एक जुन्या कपड्यांचे दुकान मला दिसलं ! मी सांगली मध्ये उतरल्यानंतर जुन्या कपड्यांच्या दुकानातील  पन्नास रुपयाचा एक गणवेश विकत घेतला. मी तसंच घरी आलो .
तो गणवेश परिधान करून मी शाळेत गेलो पण तो सदरा मॉडर्न होता . एक ,दोन दिवस तो गणवेश घातला मा. मुख्याध्यापकांनी मला बोलावलं हा गणवेश शाळेत चालणार नाही ? तुम्ही तो बदला.                              पण त्यांना मी जुन्या बाजारातील गणवेश आणला आहे सांगितलं नव्हतं .परत दोन दिवस झाले  परत गणवेश माझ्या अंगावर होता त्यावेळी मा. मुख्याध्यापक माझ्यावर चिडले आणि शाळा सुटल्यानंतर थांबा ! तुम्हांला काही सांगायचं आहे .शेवटचा तास संपल्यानंतर मी ऑफिसच्या बाहेरच्या बाकावर मी बसलो होतो. त्यावेळी त्या बाकावर सेवक गुरव मामा माझ्यावर बघत होते .काय हो सर ,काय झालं ,काय चुक केली आहे.काय साहेबांनी कशाला भेटायला  सांगितले आहे. तेव्हा मी म्हणालो काही नाही ...फक्त एकच आहे ....माझा गणवेश !          हा माझा गणवेश असं म्हटल्यानंतर तो नाईक गुरव सेवक माझ्याकडे बघू लागला .सर चांगले कपडे शिवून टाका .असा सल्ला त्यांने मला दिला .पण गणवेश घेण्यासाठी पैसे कोण देणार ?   हा प्रश्न माझ्या मनात आला.. तेव्हा आतून बेल वाजली नाईक ..श्री.शिंदे सरांना  आत पाठवा .मी परवानगी घेऊन ,आत गेलो नमस्कार केला साहेबांनी मला बसा म्हणून सांगितले .मी नाही बसलो ,बसा सांगतो ना ....बसा पहिल्यांदा मग मी खुर्चीवर बसलो . तुम्हांला दोन दिवस मी काय सांगतोय ....होय साहेब !गणवेश बदला मी गप्प राहिलो .ते  म्हणाले काय ते मला पहिल्यांदा सांगा सर माझ्याकडे दोनच गणवेश आहेत. त्यातला एक गणवेश फाटला आहे. माझ्याकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत . तुम्ही राहण्यासाठी व जेवणासाठी  तीनशे रुपये देता त्यात कसा तरी मी दिनक्रम कसा तरी चालवितो.मी  त्यातले शिल्लक पन्नास रुपये घेऊन मी जुन्या बाजारातून एक  गणवेश खरेदी केला आहे. मी  तोच हा गणवेश! घालतोय... माझ्याकडे साहेब गणवेश घेण्यासाठी पैसे नाहीत .ज्यावेळी मला पैसे मिळतील योग्य असा गणवेश घेणार आहे. असं मी सांगितलं डॉ. जोशी सरांना काय वाटलं   आणणार साहेब  नि:शब्द झाले.  शिंदे सर घरी जावा . मी साहेबांचा  निरोप घेतला ...    शैक्षणिक कार्याची सुरुवात करीत असताना जीवनात येणारे अनेक प्रसंग येऊन जातात .ज्यावेळी गणवेश हा शब्द येतो त्यावेळी मला वरील गोष्टीची आठवण होते आणि गणवेश आणि गणवेश ! ही भावना मनात कायमस्वरूपी मनात राहते .वरील प्रसंगातून मला एक जाणवलं की आपण कार्य करत असताना आपल्याला मनापासून साहाय्य करणारी मंडळी भेटतात . मंडळी भेटतात जर ती भेटली नसती तर मी जत हायस्कूल जत मध्ये मी कलाशिक्षक म्हणून 35 वर्षे सेवा करू शकलो नसतो .आज समाजामध्ये अशा आश्रयदाते माणसं असली तर समाजामध्ये काही प्रश्न, काही समस्या  सुटू लागतील असं मला वाटतं!
🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟨🟪
कला विश्वातील माणूस : श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, जत हायस्कूल,जत.

कलेच्या विश्वातील माणूस श्री. सुभाष शिंदे सर. 
  कलेच्या विश्वात जगणारा, वावरणारा साने गुरुजींच्या विचाराचा वारसा नव्या पिढीला देणारा, एक आदर्श,  विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून, सुभाष  शिंदे सर यांच्याकडे पाहिले जाते. जत हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जत मधील चित्रकलेचे अध्यापक, उत्कृष्ट छायाचित्रकार,  स्काऊट मास्टर,  उत्कृष्ट कवी व साहित्यिक अशी ख्याती, श्री सुभाष शिंदे सर यांची आहे. बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे,  सन -१९६८ मध्ये एका गरीब कुटुंबात श्री. सुभाष शिंदे सर यांचा जन्म झाला. वडील संगीत प्रेमी व  पेटीवादक. पोवाडा या कलाप्रकारात शाहिराला पेटीची साथ देणारे, भजन गाणारे कलाप्रेमी होते. उदरनिर्वाहासाठी माधवनगर सांगली येथे कॉटन मिलमध्ये ते काम करत होते. त्यांना कलेची विलक्षण आवड होती. दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी आपली कला सादर केली. आणि तसाच कलेचा वारसा, श्री सुभाष शिंदे सर यांनी,  जोपासला चित्रकलेची विलक्षण आवड असल्यामुळे, बुधगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संपवून, श्री सुभाष शिंदे सर सांगली येथील कस्तुरबाई  वालचंद महाविद्यालय येथे आले. तेथे त्यांनी, कॉमर्स शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व पुढे कला शिक्षक पदविका सांगली येथे पूर्ण करून मुंबई या ठिकाणी त्याच्या परीक्षा देऊन प्रथम श्रेणीत श्री. शिंदे सर उत्तीर्ण झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे शिवसेनेचे मुखपत्र सामना साठी कला विभागात आर्टिस्ट व दैनिक केसरी मध्ये आर्टिस्ट म्हणून काम केले. पुढे शिंदे सर १९९१ मध्ये. दि. फ्रेंडस्  असोसिएशन जतचे, जत हायस्कूल जत येथे कला शिक्षक म्हणून रुजू झाले.  तेव्हापासून त्यांच्या अविरत कार्याला सुरुवात झाली. शिंदे सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. आपल्या अध्यापन बरोबरच मुलांना गोष्टी सांगणे,  त्यांना गाणी म्हणून दाखवणे,  त्यांना कविता ऐकवणे, 
 त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे,  त्यांना उत्तम चित्रे काढायला शिकवणे, त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा घेणे,  स्काऊट आणि गाईड या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनवणे, असे असंख्य उपक्रम  स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य सरांनी केले आहे. कब, बुलबुल, स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा मध्ये गेले नऊ वर्षे अॅड व्सहास पार्टी सदस्य सक्रिय आहेत. स्काऊट, गाईड विविध गाठी व गॉझेट प्रात्यक्षिक जिल्ह्याच्या विविध ठिकाणी व्याख्यान, प्रात्यक्षिके  यांनी दिली आहेत. शिंदे सरांच्या या कार्याची दखल घेऊन  त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य त्यांना प्राप्त झाला. 

शाळेतील अध्यापनाचे कार्य करताना बी.ए. ए.एम. डिग्री घेऊन शैक्षणिक ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न हे विशेष! शाळेच्या फलकावर सुंदर हस्ताक्षरात शिंदे सर लेखन करत राहिले. शाळेत कोणताही कार्यक्रम असो स्टेज सजावट शिंदे सर आवडीने करत राहिले. खरेतर शिंदे सर यांचे कार्य शब्दात मांडणे अवघड आहे. 
🔴 श्री.सुभाष शिंदे, सरांना मिळालेले विविध पुरस्कार:
🔘 रचना चित्र (सन-१९८७) राज्य पुरस्कार
🔘 रचना चित्र (१९८७) राष्ट्रीय पुरस्कार
🔘 सांगली जिल्हा एड्स पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक पटकावला.
🔘वन्य सप्ताह निमित्त हस्तलिखित मुखपृष्ठ व आतील रेखाटन जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
🔘 महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणे यांचे सन्मानचिन्ह प्रदान (सन-२००२)
🔘 सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली यांचा आदर्श स्पर्धा नियोजन पुरस्कार प्राप्त (सन-१९८९-९०)
🔘 जालना जिल्हा रंगभरण चित्रकला स्पर्धा स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान (सन-२००५)
🔘 भारतीय शिक्षण मंडळ सांगली,चैत्र पाडवा भेटकार्ड स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल गौरव स्मृतिचिन्ह पुरस्कार प्राप्त (सन-२००५)
 सांगली जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय उपआयुक्त कामकाज पाहिले.                         ११) महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळ, पुणे येथे कला शिक्षण या पाठय पुस्तकांचे१० वी / १२ वी लेखक / रेखाचित्र काम.
१२. पूज्य साने गुरुजी जन्मशताब्दी निमित्त सांगली जिल्हामध्ये व राज्यामध्ये विविध शाळेमध्ये कथाकथन श्यामची वाटप व साने गुरुजी चित्र प्रदर्शन भरविले.                                   १३. सांगली जिल्हा कब बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये अॅडव्हास - पार्टी सदस्य म्हणून कामकाज पाहिले. 
🌼नोकरी सुरू तारीख :-०६/११/१९९१ व्यवसाय-कलाशिक्षक पद-सह शिक्षक/कलाशिक्षक
नोकरीचे गाव - जत
अध्यापनाचा अनुभव :- ३५+२ वर्षे(मूक बधिर विद्यालय,जत. +
जत हायस्कूल, जत)
मिळालेली बक्षिसे: वैयक्तिक / कलाशिक्षक :                             १) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नाशिक
२) राज्यस्तरीय साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक मंडळ, कराड.                           ३) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ, पुणे, राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार: कलाशिक्षण परीषद, सांगली.                                     ४) भारतीय शिक्षण मंडळ : आदर्श शिक्षक पुरस्कार, जत.  ५) ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार:अजिंक्यतारा
प्रतिष्ठान, जत..                          ६) लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार, जत.
७) कॉलेज ऑफ आर्ट्स सांगली, आदर्श माजी विद्यार्थी:  स्मृतिचिन्ह पुरस्कार. 
८) सांगली जिल्हा परिषद व सांगली स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, सांगली.
नऊ  वर्षे जिल्हा मेळाव्यात अॅडव्हान्स पार्टी लीडर , कार्यभार:  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र गौरव...
९) सिद्धेश्वर यात्रा कमिटी बुधगाव आदर्श शिक्षक व विविध उपक्रम राबविल्याबद्दल साक्षी चिन्ह देऊन सत्कार.    १०) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ सांगली आयोजित विवी स्पर्धेमध्ये नियोजन केल्याबद्दल अनेक स्मृती चिन्ह प्राप्त.
🔵🔵🔵✍️✍️✍️✍️🔴🟡🟤🟣🟡🔴🔵
💠अध्यापन विषयक राबविले उपक्रम:-                                 १) कला विशेषी अभ्यासक्रम नुसार व्हिडिओ निर्मिती-२४९ Subhash Shinde, Jath  यूट्यूब चैनल सुरू आहे.
२) विविध स्पर्धा याद्वारे विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करणे.
३)दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी या शिबिराचे आयोजन करून कला, नाट्य विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन.प्रेरणा देऊन घेतलेल्या स्पर्धा:
१) देशभक्ती चित्रकला स्पर्धा: सहभागी संख्या -६०
२) कविता लेखन/गायन स्पर्धा: सहभागी संख्या-८०
३) रक्षाबंधन: भेटकार्ड तयार करण्याचा स्पर्धा: -८५
४) वेशभूषा स्पर्धा : -२०
५) घोष वाक्य स्पर्धा : -१५
विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक प्राप्त.
💠संस्था निर्मिती/ सदस्य-निमंत्रित कार्य:
१) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई- स्विकृत सदस्य.
२) सांगली जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय,सांगली. - अर्थ विभाग सदस्य
३) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली-कार्यवाह.                                                         ४) साने गुरुजी कथामाला/कला केंद्र, जत: अध्यक्ष 
५) लायन्स क्लब जत, सदस्य ते
प्रथम उपाध्यक्ष पदभार पाहिलेला
आहे.
💠🔘💠🔘💠🔘💠🔘💠🔘

💠डॉ.श्रीपाद जोशी (ज्येष्ठ साहित्यिक)                                  स्नेहसंमेलन, कॉलनी  विद्य४१६४०४
 🔵डॉ.श्रीपाद जोशी ( ज्येष्ठ साहित्यिक ).                          💠💠🌼  मनोगत 🌼💠💠
श्री. सुभाष सदाशिव शिंदे हे जत हायस्कूल, जत येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. केवळ कलाशिक्षक 'ही त्यांची ओळख पुरेशी नाही. ते फोटोग्राफर आहेत. नाट्य कलावंत आहेत. स्काऊट चळवळीतील धडपडणारे कार्यकर्ते आहेत. सानेगुरुजी कथामालेचे प्रचारक आहेत. राष्ट्र सेवा दलातील सैनिक आहेत. ते काय नाहीत? हाच प्रश्न आहे. ते समरसून काम करणारे हाडाचे शिक्षक आहेत.
करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे असे निर्मळ मनाचे श्री. सुभाष मुलांमध्ये रमून जातात. त्यांना त्यावेळी तान.. भुकेचे भानच राहत नाही. मुलांसाठी समर्पित भावाने काम करणारे श्रीयुत सुभाषराव शिंदे ही जत हायस्कूल ची ओळख आहे. हीच संपत्ती आहे . त्यांच्या कुंचल्यातून मनोहारी चित्रे मिळतात. फोटोग्राफीतून अनमोल प्रसंग सहज टिपले जातात. तर त्यांच्या वाणीतून सानेगुरूजी जणू बोलतात असाच भास होतो. असे श्री. सुभाष शिंदे हे फुलत राहोत . मुलांना रमवत, हसवत राहोत. शाळेत चैतन्य निर्माण करत राहोत त्यांना माझ्या शुभेच्छा !
श्रीपाद जोशी(ज्येष्ठ साहित्यिक)
🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨🟪🟧🟨
श्री.सुभाष शिंदे यांना राज्यस्तरीय विविध पुरस्कार:
🔵 राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार -२०२२
संस्था: प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक विकास संस्था, नाशिक
(रजा.नं. महा. एफ/८४५०/२००५नाशि.
🟡 राज्यस्तरीय : ज्ञानज्योती क्रांतीज्योती पुरस्कार -२०२२: आदर्श कलाशिक्षक , शैक्षणिक प्रबोधन कार्य.
संस्था: भावना बहुउद्देशीय संस्था नाशिक
(संस्था रजा.नं. महा.ध.उ.आ./१४२६ नाशिक -/३०/११/२०१६ पब्लिक ट्रस्ट रजा.नं.महा./एफ१८२३. ६/७/२०१७
🟤 मराठी भाषा राज्य शिक्षक पुरस्कार -२०१२
संस्था: अकादमी कला दालन रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई
(मराठी राज्यभाषा दिनी: रविवारी दि.२७फेब्रुवारी २०२२.
🔴 राज्यस्तरीय  साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१४
संस्था: शिक्षण मंडळ कराड कराड
(शनिवार,दि.१२जुलै २०१४.
🟣 शिवराज्याभिषेक विश्वविक्रम रांगोळी उत्सव समिती, सांगली.
श्री.कलाश्री श्री.सुभाष शिंदे, रजिस्टर नं.91
(रजी.SNG/00031/41C/19)
🟡विविध विश्वविक्रम पुरस्कार प्राप्त!
१) ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
२) आसाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
३) एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
४) नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
५) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 
६) युनायटेड किंग्डम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨🟧🟪🟨
🟣 राज्यस्तरीय समाज प्रबोधन आदर्श शिक्षक पुरस्कार
संस्था: युवा शक्ती सामाजिक संस्था
(रजा.नं महा./८६३५/०४/नाशिक)
🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤🔵🟡🟣🔴🟤
मी विद्यार्थी दशे पासून आज त्यांच्यासोबत काम करत असताना पर्यंत जे पाहिले ते मांडले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री सुभाष शिंदे सर यांच्या हातून असेच शैक्षणिक कार्य घडो,  त्यांना उत्तम आरोग्य आनंद,  समाधान लाभो हीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभकामना
🔴🔴🔴🔴🔴🔴🔵🔵🔵🔵🟤🔵🔴🟣
🔵लोकमत  💠व्हरायटी
💠सोमवार, दि. २ ऑगस्ट, २०१० 🔘पान-८ 
कला ही मागून मिळत नसते.
ती विकतही घेता येत नाही. कला शिकण्यासाठी कलेबद्दल मनात भक्ती असावी लागते. 'कला देवीचा साक्षात्कार होण्यासाठी कलाकाराकडे सच्चे जिगर असावे लागते. शालेय जीवनातच चित्रकलेशी मैत्री करून कलाविश्वात आपला वेगळाच ठसा उमटविणारा एक अवलिया जतमध्ये वावरत आहे. कलेला परमेश्वर मानून तिची पूजा करणान्या त्या सच्चा कलाउपासकाचे नाव आहे 'सुभाष सदाशिव शिंदे.
सुभाष शिंदे हे सध्या जतमधील दि फ्रेन्डस् असोसिएशनच्या जत हायस्कूलमध्ये  कलाशिक्षक' म्हणून कार्यरत आहेत. जिद्द, आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कला क्षेत्रात गरुडभरारी घेतलेल्या आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती शिंदे यांचे मार्गदर्शक डॉ. श्रीपाद जोशी अभिमानाने सांगत होते. ते पुढे म्हणाले, सुभाषचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण बुधगावमधील बुधगाव हायस्कूलमध्ये झाले. सुभाषला लहानपणापासून चित्रकलेबद्दल विशेष आकर्षण होते, त्याचे वडील हार्मोनियमवादक होते. त्यामुळे बालपणापासूनच सुभाष कलेच्या वातावरणात वाढत होता सुभाष' चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण
🔘🔘🔘🔘🔘
कलेचा सच्चा उपासक
💠🌼💠🌼💠
शिक्षक म्हणून
एकदा नोकरी मिळाली
की बऱ्याचवेळा
कलाशिक्षकांचे खडू, फळा, पेन्सील
कॅनव्हास व रंगांशी
असलेले नाते तुटत
💠✍️💠✍️💠🌼🌼🌼🌼
विद्यार्थ्याचे नाव सुभाष शिंदे , शिक्षण: ए.टी.डी,ए.एम
(कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत)
शिक्षकांचे नाव: डॉ.श्रीपाद जोशी 
✍️💠✍️💠✍️🌼🌼🌼🌼
मातृत्वाची भावना जपणारे* :
मला भेटले. डॉ.श्रीपाद जोशी साहेब!
    - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत. 
🟪🟧

 

जत हा शब्द मी शाळेत असताना पाठ्यपुस्तक शिकताना असताना, सांगली जिल्ह्यातील एक मोठा तालुका व दुष्काळ छायेमध्ये असतो.एवढचं मला माहिती होते ‌
 बघा हो जीवन! मी जत मध्ये ३५वर्ष शिक्षक म्हणून सेवा करेल, असं केंव्हाच वाटले नव्हते! आज मी लेखमालिका लिहित आहे. कारण सेवानिवृत्तीच्या  दिशा  जवळ येत आहे. माझ्या मनातील भावनेला वाट करून देण्यासाठी मी वाट पाहतोय!
 मला या जत आणि या तालुक्यात सर्वांनी खूप दिले आहे. आलो तेंव्हा छत  नव्हते,
पाघराला पांघरूण नव्हते,मायेचा हात नव्हता!
आज रोजी लाखो प्रेमाचे! मायेचे हात! माझ्याजवळ आहेत!
त्यातील एक हात माझ्या मातृत्वाची भावना जपणारा !
डॉ.श्रीपाद जोशी या ज्ञानयोगी 
माझ्या गुरूचा...!
    मी जत मध्ये सन - १९८८ साली आलो तेंव्हा मी मूक बधिर विद्यालय जत चे मुख्याध्यापक श्री.कदम सरांना विचारले जत शहरात नवीन, प्रसिद्ध काय आहे. मला सांगा.तेंव्हा त्यांनी सर्व काही माहिती सांगितली. 
आपल्या संस्थेचे आश्रयदाते,जत हायस्कूल, जतचे मुख्याध्यापक मा.डॉ.श्रीपाद जोशी, छान बोलतात, सुंदर अक्षर आणि प्रेमाने बोलणारे 
हे एक आदर्श शिक्षक आहेत!
तेवढ्यात डॉ.श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले पत्र शाळेत आलं ....!
श्री.कदम सरांनी मला ते पत्र मला दिले. बघा  हे सुंदर अक्षर! ते पत्र घेऊन मी वाचु लागलो! अक्षरांचे लेणे ,वळणदार अक्षर बघून त्यावेळी  मला न बघताच हा ज्ञानयोगी ची भेट आजच घेणार असं मनाशी ठरवले . आणि श्री.कदम सरांना सांगितले.आज शाळा सुटल्यानंतर जायचे...!
माझ्या मनात डाॅ.श्रीपाद जोशी साहेब कसे असतील ? ह्या भावना जागृत झाला.
  आमचे  मूक बधिर विद्यालय जत हे कुलकर्णी मळ्यामध्ये होते. शाळा सुटल्यावर मी ,कदम सर जत हायस्कूल,जत निघालो.मी कदम सरांना विचारतं होतो. शिंदे सर ,तुम्ही जरा थांबा हे बघा ....! ते बघा पांढरे वेशभूषा, हातात पुस्तके, दुसऱ्या हातात पट्टी हे शिक्षक 
कोण असेल शिंदे सर मला सांगा?
असे श्री.कदम सर म्हणाले...!
हेच असणार डॉ.श्रीपाद जोशी 
शंभर टक्के.....!
कदम सरांनी मला विचारले तुम्ही कसं ओळखले! त्यांच्या पट्टी मुळे..!अक्षर लेखन करताना अत्यंत महत्त्वाचे साधन...!
आम्ही सरांच्या दिशेने  निघालो. सर, आमच्याकडे आले आणि कदम सर नमस्कार! कदम साहेब नमस्कार केला आणि हे कोण तुम्हांला नमस्कार सर ओळख करून देतो. आमच्या विद्यालयांमध्ये कलाशिक्षक म्हणून श्री सुभाष शिंदे आले आहेत. त्यांना तुमच्या बरोबर बोलायचं आहे .त्यासाठी आम्ही आलोय मग चला की ऑफिसमध्ये जाऊन बसू या ! मी ऑफिसला जाऊन बसलो .गप्पाला सुरुवात कशी झाली वेळ कसा गेला हे कळालं नाही. मला पण या सरांचा नातं आपलं पहिलं असेल अशी भावना झाली ..रात्र झाली साहेब म्हणाले, सुभाषराव उद्या शाळा सुटल्यावर या आपण पुढील चर्चा करू या....आता आपण  निरोप  घेऊ. आणि आम्ही निघालो. ..
परत मी शाळा सुटली की जत हायस्कूल ,जत मध्ये येत असे.  विविध गोष्टी, अक्षर लेखन, सामाजिक ,शैक्षणिक याविषयी  डॉ . जोशी साहेब यांच्या शी बोलत असे! सर्व बोलताना  मला  साने गुरुजी  बरोबर  बोलतो ! काय असं वाटू लागलंय ... आम्हांला मूक बधिर विद्यालय जतला पगार केंव्हा  मिळेल नक्की  सांगता येत नव्हतं.त्यावेळी सर गावी जाताना पाकिटात  काही रक्कम आम्हाला देत असे !    आणि काही लागलं तर सांगा हे शब्द आम्हाला  आधार देत होते . दिवाळी सण आला की ,आमचा  पगार आम्हांला  नव्हताच .. कसं तर एसटीला पैसे होते .ते घेऊन मी गावी गेलो आणि घरच्यांना सांगितले. दिवाळीचे पदार्थ थोडेच करा .पगार सुरू झाला की आपण दिवाळी मोठ्या प्रमाणात करू, दिवाळीच्या आधी दोन दिवस श्री.कदम सर बुधगावाला  एक पाकीट घेऊन आले. त्यामध्ये काही  रक्कम होती.हे पाकीट  डॉ . श्रीपाद जोशी साहेबांनी दिवाळी सणासाठी दिली आहे. दिवाळी सण साजरी करा, असं सांगून कदम सर त्यांच्या गावी निघून गेले. ते पाकीट म्हणजे दिवाळी सण साजरा करण्याची इच्छा होती .ती इच्छा पूर्ण करण्यासाठी साहेबांनी हा क्षण जीवनातील ज्ञानयोगी हा असा मी पाहिला !                                                        मा. श्री.ऐनापुरे साहेब , डॉ . जोशी साहेब मूकबधिर विद्यालय,जत मध्ये येऊन विद्यार्थ्यांची चौकशी करीत असे .                                      माझा निर्णय: गावी  बुधगावाला आल्यानंतर आपण परत मूक बधिर विद्यालय,जत ला  परत जायचं नाही .असं मी ठरवलं. सर्वच प्रश्न निर्माण झाले होते .जत  मध्ये राहून आपलं जीवन कसं जगायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता .मी मुंबईला निघालो.तिथे माझे दाजी पी.एस.आय .होते .त्यांच्याकडे गेलो मुंबईमध्ये नोकरी करावी असं मला वाटलं. तिथे पण नोकरी मिळेल असं  वाटतंय.. मी मुंबईला मरोळ पोलिस कॅम्पस मध्ये राहत  होतो. तेथे  श्री . पाटील साहेब होते .त्यांनी मला सांगितले  की तुला दैनिक सामना  मध्ये   नोकरी बघू या...! मी तेथील  साहेबांना विचारून  दोन दिवसात पाटील साहेबांनी दैनिक सामना कार्यालय ,मुंबई येथे जाऊन आले . मुलाखतीला येण्यासाठी भेट घेतली.  त्यावेळी मी दैनिक सामना चे कार्यकारी संपादक साहेबांची होते  .त्यांनी भेट घेतली.मी त्यांना सर्व माहिती सांगितली आणि पान नंबर चार चे काम त्यांनी  मला दिले. एका ट्रे मध्ये बातम्या ,फोटो  आणि मला वेळ  ४५ मिनिटे वेळ दिला .
आणि म्हणाले हे पेज  तयार करून  माझ्याकडे ये ! मग मी तुझं काम बघतो ‌.आणि ते कार्यालय निघून गेले .मी दैनिक केसरी प्रमाणे ते पेज तयार केले. फोटोसाठी जागा योग्य प्रमाणात निवड केली .आणि साहेबांच्या कडे गेलो. साहेब म्हणाले काय रे!  पेज तयार केले. साहेब ....झालं !  चल बघूया !माझं काम बघल्या नंतर साहेबांच्या...शब्द त्यांच्या तोडून आला  वा... वा...! तू आजपासूनच दैनिक सामनामध्ये हजर हो. अशा रीतीने माझी दैनिक सामना , मुंबई मध्ये कामकाज सुरू झाले . माझं मोठे भाग्य! सभेमध्ये बोलताना ,टी .व्ही .मध्ये बघत
होतो. त्यांच्या थोरांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली हे भाग्यच माझं!
मला दैनिक सामना मुंबई मध्ये पहिले व शेवटचे पेज तयार करण्याची संधी मिळाली. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता. तरी ग्रामीण भागातील होतो. पण प्रत्येक कामात एक वेगळेपण होते. माझ्या स्वभावामुळे सर्वांना माझे  काम आवडू लागले.पण दैनिक सामना, मुंबई मध्ये जास्त काळ काम करू शकलो नाही.
    वेळ कशी असती बघा... माझ्या वडिलांचा अपघात झाला.त्याच्या सेवेसाठी मी परत बुधगावाला आलो. वडिलांना औषध ,पाणी केले. बराच कालावधी गेला. पुन्हा तोच प्रश्न नोकरी शोधावी लागणार ? सांगली जिल्हा परिषद मध्ये माझ्या मित्राचे मामा जेष्ठ लेखनिक होते.त्यांनी तात्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.श्री.म.ल.देसाई साहेब त्याची भेट झाली.माझा प्रवास 
ऐकल्यावर साहेब म्हणाले ,सुभाषराव तुमचं काम मी नक्कीच करणार मला पाच दिवस द्या....!
परत मुंबईला जाण्याच्या निर्णय परत घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी मला पाच शाळेची नावे दिली. तुला कुठे जाण्यासाठी आवडेल? असे साहेबांनी विचारले.... पहिल्या पासून शेवटपर्यंत यादी वाचली. मला फक्त तीन क्रमांकाची शाळा आवडली! त्यापुढे बरोबर चिन्ह केले. साहेबांनी यादी बघत मला विचारले सुभाषराव तुम्ही तीन क्रमांकाची शाळा का निवडी?
मी जत मध्ये नोकरी केली आहे. त्यावेळी  डॉ.श्रीपाद जोशी, साहेबांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा आहे. तुम्ही जर संधी दिली तर....
साहेब म्हणाले ...माझे पण डाॅ.जोशी साहेब आदर्श गुरूवर्य आहेत.
योग्य वेळी तुम्हांला निरोप देतो .  असे  मग  जतला जावा. तुमचं काम शंभर टक्के होणार!
मा.श्री. देसाई साहेबांच्या रूपा मध्यें देवच मला भेटला...!
काही दिवसांनी मी जत हायस्कूल,जत मुलाखतीला गेलो . आणि सेवेला सुरूवात झाली. पण पगार सुरू होई पर्यंत डॉ.जोशी जबाबदारी घेतली. सेवा करताना काही अडचणी येत होत्या. पण त्यातून मार्ग काढत होतो. विद्यार्थी, विद्यर्थ्यिनी खुष होत्या.त्यांना कलाशिक्षक  मिळाला होता . मी रेखाटन करताना....!उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मला पण आनंद वाटायचा.मी पण  नव नवीन प्रयोग करून जिल्हा राज्यस्तरीय  चित्रकला, नाट्य,गायन स्पर्धेत सहभागी होऊन विविध बक्षिसे मिळाली तेव्हा पालकांना वाटले की कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि कलेचा सुगंध दरवळला आणि जिल्हा, राज्यस्तरीय बक्षिसे माझ्या   हातात दिसु लागलीडॉ.श्रीपाद जोशी साहेबांना चित्रकला विषयांचं ज्ञान छान होते! स्वातंत्र्याची ७५वर्ष या विषयावर माझी चित्रे, सरांनी स्वातंत्र्यदिन याविषयीची सुविचार, सुवचने लेखन केले.हे चित्रप्रदर्शन जत शहरात पहिले होते. जत करांनी 
प्रतिसाद मला आवडला...!
(पुढील भाग लवकर देत आहे.वाचा आणि प्रतिक्रियाचे स्वागत आहे.)





Comments