माझा कला प्रवास... - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर

*माझा कला प्रवास*...
*श्री सुभाष शिंदे कला शिक्षक मास्टर* 

सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात एक बुधगाव आहे .या गावाची परंपरा उज्वल आहे. त्या गावांमध्ये एका गरीब  कुटुंबात माझा जन्म -सन: 1968 मध्ये 12 मार्च रोजी माझा जन्म झाला. घरामध्ये एकूण   सातजण आजी ,आई-वडील असे  सातजण खाणारे आणि बाकीचे आपापल्या  शिक्षण, घरकामामध्ये असणारे  होते . माझ्या पुढील मोठ्या बहिणी शिक्षण घेत होत्या. त्यामागे मी आणि माझ्या मागे दोन बहिणी असा आमचा परिवार होता .आणि त्या परिवारला आधार देणारी माझी आजी होती. शेतामध्ये जे पीक यायचं त्याच  उत्पन्न घेण्याआधीच नष्ट व्हायचं .त्यामुळे उत्पन्नाची अशा कमीच होती .अशा वेळी  माझे वडील कॉटन मिल मध्ये कामाला जात असत .आणि सारा संसार एकाच्या मेहनती वर असल्यामुळे खूप मोठा त्रास व्हायचा आम्ही पण सर्व भावंडे शिक्षण घेत होतो .त्यामुळे आमच्या शिक्षणाची साधने , वह्या, पुस्तके ,गणवेश यासाठी आम्हांला  संघर्ष करावा लागे, तरीपण काही वेळा अशी वेळ यायची जेवणासाठी लागणारे गहू, ज्वारी,  हे पण घरी असायचे नाही ...वडील रात्री आल्यानंतर ही ज्वारी दळून आणायचे आणि त्यापासून भाकरी  आई करायची  एक भाकरी आम्ही भावंडं जेवण करीत  असे...कसंतरी   वडिलांचा प्रयत्न होता... सर्वांना पालन ,पोषण करायचं ,शिक्षण ! द्यायचं ही जिद्द होती .आणि रात्री घरी आल्यानंतर त्यांना हार्मोनियम वादनाची  आवड होती . रात्री  भजन करायचं ! आणि सकाळ झाली की कामाला निघून जायचं पण आमच्या समस्या आम्ही आमच्या वडिलांना सांगायला भित होतो. कारण एवढी ओढाताण त्यांची  होती .पैसे कमी आणि खर्च खूप जास्त व्हायचं .आम्ही पण आमची शैक्षणिक साधने व या पुस्तके कमीत कमी वापरून त्यावर मात करीत असे.अशा तऱ्हेने आमचं शालेय शिक्षण चाललेलं होतं .प्रत्येक जण आपण किती बचत करतो त्याकडे लक्ष असायचं शिवाय जे गणवेश आहेत ते शिवून वापरत असे घरामध्ये मी एक पुरुष होते . मला पॅन्ट फाटली, सदरा  शिवून घालायची सवय होती .पण माझ्या बहिणी यांना गणवेश सर्वप्रथम माझे वडील  आणून देत . मी शिक्षण घेत असताना आमच्या घरी लाईटची सोय नव्हती .त्यावेळी माझा मित्र तुकाराम सूर्यवंशी व त्यांच्या आई आणि वडील त्यांनी मला अभ्यास करण्यासाठी केली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सोय केली. मला त्याचा फायदा झाला. त्यांच्या  घरामध्ये धार्मिक ,मायाळू व प्रेमळ होते .मी अभ्यासाला गेलो की ते मला त्यांच्या घरामध्ये जेवणाचा विशेष पदार्थ केला असेल तर खाण्यात देत . प्रत्येक वेळी ते माझ्याशी प्रेमाने बघत असेल .त्यांच्या गावी यात्रा असली की ते मला बरोबर घेऊन जायचे नेहमी मी त्यांच्या घरी असल्यामुळे मला त्यांचाच मुलगा म्हणायचे .घरामध्ये जे संस्कार माझ्यावर झाले ते माझ्या मित्राच्या आई-वडिलांची हे माझ्यासाठी  खास होते. मला वेळप्रसंगी वह्या ,पेन्सिल रंग नसले तर ते त्यांच्या मुलाबरोबर मलाही द्यायचे .दहावीचा निकाल आल्यानंतर आनंद झाला .आणि पुढील शिक्षणासाठी वाटणाऱ्या कलेचा नाद हा लहानपणापासूनच होता.
प्राथमिक शिक्षणापासून मला कलेची आवड होती मी प्राथमिक शिक्षण घेत असताना आमच्या शाळेमध्ये एक गोष्टी गुरुजी हे ड्रॉइंगची आवड असणारे प्राथमिक शिक्षक होते ते नेहमी शाळेमध्ये वेगवेगळी चित्र काढायची रंगकाम करायची व गावातील काही पालकांच्या सायकलीवर छत्रीवर नाव टाकायची मला चित्रकलेची आवड असल्यामुळे मी त्या गुरुजींच्या जवळ जाणार त्यांना रंग साहित्य विविध गोष्टी त्यांच्या हातामध्ये देणार त्यामुळे मला चित्रकलेचे बार खावे प्रकाश मिळाले ते सुट्टीमध्ये मंदिरामध्ये शाळेमध्ये वेगवेगळी प्रकारची बिल चित्रे रेखाटन व रंगकाम करीत असेल त्यांच्या हाताखाली मी रंग तयार करणे रेखाटन करणे अशी काम करीत होतो एकदा मंदिरामध्ये चित्रे करण्याचे काम त्यांनी घेतली होती त्यावेळी ती चित्रे ठराविक वेळेमध्ये पूर्ण करण्याचे त्यांच्यावर नियम गावकरी मंडळींनी घातला होता पण निम्मं काम झालं आणि गुरुजी आजारी पडले मी दररोज रंगासाठी घेऊन त्या मंदिरामध्ये जाणार आणि गुरुजींची वाट बघणार पण मला समजलं की गुरुजी आजारी आहेत त्यामुळे ते देवळाल तेव्हा तू पुजारी म्हणाला दररोज रंग घेऊ का येतोयस गुरुजी कुठे आहेत मी त्यांना सांगितलं गुरुजी आजारी आहेत ते येतील ते पुजारी रागावले मग मी एक निर्णय घेतला राहिली चित्रे ंची माझ्या मनाने पूर्ण केली आणि संध्याकाळी तू पुजारी आला वक्तृत्व तर काय चित्र पूर्ण झाले त्या पुजारीने मला बोलावले काय रे गुरुजी आजार आहेत ना ती म्हणलं होय हे चित्र कुणी पूर्ण केली मी त्याला सांगितलं राहिलेली निम्मी चित्रे मी पूर्ण केली आहे म्हणाला वा पोरा तू चित्र होणार असं म्हणत त्यांनी पाठवल  दुसऱ्या दिवशी गुरुजी आले त्यांनी पहिलं मंदिरातील सर्व चित्र पूर्ण झाली होती त्यांनी त्यांनी सुद्धा माझं अभिनंदन केलं अशा तऱ्हेने प्राथमिक पासून रेखाटन व रंगकाम काम करण्याची आवड मला होती फक्त एकच अडचण होती या चित्रपटासाठी लागणार साहित्य रंग साहित्य मला मिळत नव्हतचि कसे मिळवायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता.
त्यासाठी विविध युत्या मी माझ्या मनाने तयार केल्या त्याप्रमाणे मी प्रयत्न करीत गेलो.
त्यातील काही प्रसंग पुढीलप्रमाणे....
माझ्या कलेची पहिली प्रेरणा: बुधगावाचा श्री हनुमान मंदीरातील फळा...!
     - श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक,जत हायस्कूल,जत.
मुळ गाव: बुधगाव ता.मिरज जि.सांगली.         इयत्ता १ ली पासून चित्रकलेचा छंद मला होता.तेंव्हापासून रेखाटन, रंगकाम यांचा दररोज सराव नेहमीचा असायचा ...!
एकवेळ अभ्यास कमी पण चित्रकला सराव जास्त करायचा..!
घरातील माझ्या बहिणी मला रागावत सारखी चित्रे काढतोस अभ्यास कधी करणार? ते कागद, रंगत साहित्य लपून ठेवत असतं आणि माझ्या वडिलांना सांगयच थोडा त्रास होता पण ते माझ्या चित्रांना त्यांना अभिनंदन करायला विसरले नाहीत!
माझ्या घरांतील पाचजण शिक्षण घेत होते.घरातील परिस्थिती गरिबीची होती.त्यामुळे कला विकास करण्यासाठी साहित्य कमतरता मला भासु लागली.तेंव्हा एक कल्पना सुचली.माझ्या घराजवळ श्री हनुमान मंदिर आहे.तेथे फळा होता.  तेथे  पुजारी गुरव मामा  होता.त्यांची मैत्री केली.त्याला मी विचारले पुजारी मामा मंदिरात फळांवर फक्त शनिवारी हनुमानाचे चित्र काढू का? तो माझ्या कडे बघून म्हणाला खरच तुला चित्र काढता येतात.... मी म्हणालो हो! चित्र काढायला परवानगी मिळाली पण खंडू ला पैसे शाळेत गेल्यावर श्रीमती दातार  मॅडमना एक खंडू मागितला मॅडमनी विचारले कशाला पाहिजेल...?
मी त्यांना सांगितले शनिवारी मी मंदीरात फळ्यावर श्री हनुमान चे रेखाटन करणार आहे. त्यांना माझी संकल्पना आवडली. त्यांनी मला एक नाही चार खंडू दिले. मला खूपच आनंद झाला! शनिवारी सकाळी शाळा सुटल्यावर मी दप्तर घरात ठेवून. पळत मंदिर गेलो.फळा स्वच्छ केला. तेवढ्यात पुजारी मामा आले आणि म्हणाले सुभाष .... काय करतोय....? त्यांना परत एकदा सांगितले श्री हनुमानाचे चित्र रेखाटन करतोय...! हो का अरे तू सांगितलेलं विसरुन गेलो बुवा! तू चित्र काढ... चित्र छान तर बरं! नाहीतर तुला फळा स्वच्छ करायला पाहिजेल.. मी म्हणालो ठीक आहे.
मी मंदिरातील मूर्ती ला नमस्कार केला.चित्र काढायला सुरुवात केली.माझे रेखाटन सुरू झालं... तसं पुजारी मामा म्हणू लागले.वा वा..... छान छान पोरा ! प्रत्येक शनिवारी चित्र काढायला येत जा ...!
मला खूपच आनंद झाला. माझ्या कलेला ईश्वरकृपा झाली. त्यादिवशी आमच्या  श्रीमती दातार मॅडम यांनी गुपचूप मंदिरात येऊन चित्र बघून गेल्या. हे मी दूर उभे राहुन पाहिले! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मॅडम यांनी मला जवळ बोलावले आणि माझं अभिनंदन केले!
आणि चित्रकलेची वही व तेलकट रंगीत खंडूची
पेटी दिली. माझ्या कलेला दिलेली ही दाद होती!
मॅडम यांनी सांगितले की दररोज सुविचार व चित्रे शाळेत काढायची बरं का? माझ्या मित्रांनी घरात जाऊन सांगितले मग काय .... घराची मॅडमना सांगतले.... अभ्यास करायला सांगा.
  मग प्रत्येक शनिवारी श्री हनुमान मंदिरातील फळांवर काढत होतो. मला साहित्यासाठी पैशाची 
 गरज होती. मला एक कल्पना सुचली मंदिरातील फळांवर चित्र काढुन त्याखाली मला मदत करा 
असं लिहिलं! चित्र बघण्यासाठी आलेल्या लोकांनी मदत करायला सुरुवात झाली.मला प्रत्येक शनिवारी पाच ते दहा रुपये मिळायला 
लागले. मग घरातील कुणाही न सांगता कलेचा
विकास करण्यासाठी संधी मिळाली!
तेव्हा पासून आज अखेर  बुधगाव मध्ये श्री.सिध्देश्वर व जोर्तिलिंग.यात्रा व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा वेळी बुधगावाच्या श्री हनुमान मंदिरातील फळांवर आज अखेर श्री हनुमानाचे चित्र काढतो....! या चित्र काढायला आज रोजी ५६ वर्ष  होत आहेत. माझ्या कलेची प्ररेणा मी विसरलो नाही! 
आजसुद्धा बघा ,! श्री.हनुमानाचे चित्र काढले आहे. याला  आज  चित्र फलक लेखन ला      ही माझ्या बुधगावाचा श्री हनुमानाचे मंदिरातील फळा ! मी आज अखेर मी विसरलो नाही ‌ नोकरी निमित्त तीसपेक्षा परगावी गेला.
    यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जर प्रयत्न केला तर आपल्याला कोणतंही गोष्ट शक्य होऊ शकते.
मूक बधिर विद्यालय जत  प्रथम सुरूवात झाली. सेवेचा  पहिल्या दिवशी   प्रथम     श्री .कदम सर,श्री.रणदिवे सर , श्री.देशमुख, भुयार मॅडम,जाबशेट्टी मॅडम याची ओळख,
 संस्था व शाळेची माहिती देण्यात आली . मूक बधिर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी २५ ते २७...!
माझ्या मनातील संकल्पना होती. खूप मोठी शाळा असेल शाळेत विद्यार्थी अनेक असेल परिसर खूप मोठा असेल पण इथे आल्यानंतर मूक बधिर विद्यालय हे कुलकर्णी मळ्यामध्ये चार खोल्यांमध्ये भरत होते .मला दिसलं सर्व विद्यार्थी माझ्याकडे उत्सुकतेने बघत होती. त्याना बोलता येत नव्हतं . हात वारे...करत मुले...   विचारत होते. हे कोण आहेत? हे कोण आहे ? श्री. कदम सरांनी सांगितले.  की मी रेखाटन कसं करतो तसे हात वारे करून सांगितलं .हे सर ! तुम्हाला  चित्रकला शिकवणार आहेत.  त्यांनी  फळयावर  चित्र काढायला सांगितलं  ! मी फळ्यावर ज्यावेळी चित्र  रेखाटन करू लागलो. त्यावेळी ती मुले मोठमोठ्याने उड्या मारू लागली ! त्यांना वाटलं असेल छान,! छान !  सर्व विद्यार्थी , विद्यार्थ्यिनी माझ्याकडे हाताच्या द्वारे  थँक्यू !थँक्यू! असे म्हणत होती.
शाळा सद्यस्थिती: शाळेत एकही टेबल नव्हता फळे ,खडू चार  खुर्च्या होत्या . श्री.कदम सरांनी मला सांगितलं सर आपण उद्या मोरे वखारीतून फळ्या   आणायच्या त्या फळ्यापासून  सर्व शिक्षकांनी मिळून  रद्दा  मारून टेबल तयार करायचा .मी ही अवस्था बघून मला वाईट वाटले. पण नोकरी करायची ते काम करायला तयार झालो ! आमच्यातील लोहार हे सुतार कामांमध्ये ट्रेन होते त्यांनी देशमुख सर आणि मी फळ्या सायकलवरून आणल्या आणि शाळेचा पहिला टेबल! काय करायचं तयारी सुरू झाली .आम्ही रद्दा मारू लागलो .सर्व फळ्या रद्दून झाल्यानंतर आम्ही टेबल तयार करायची प्रक्रिया सुरू झाली. एक एक करता त्यावेळी दोन टेबल तयार झाले. टेबल बघून आम्ही सर्व शिक्षक आनंदाने त्या टेबल जरी बघत होतो. कारण ते पण काम करताना फळ्या आणणे , रद्दा मारणे  आणि टेबल तयार करण्यासाठी सर्व शिक्षकाचे कष्ट त्यामध्ये होतं! अशा पद्धतीने पहिला टेबल ! आमच्या सर्व शिक्षकांच्या कष्टातून तयार झाला. 
वर्गाची रचना आठ मुलांमध्ये एक शिक्षक!  आठ मुलांचा एक वर्ग ते पण प्रत्येक मुलाला   हेडफोन असतो. शिक्षकांच्या   गळ्यात माईक   आणि विविध शिक्षण  पद्धतीने  शिकवणे ! माझं काही मूकबधिर ट्रेनिंग झालेले नव्हतं, मी त्यांना चित्रकला, क्राफ्ट, नाट्य ,अभिनय हे विषय घेत होतो .सुरुवातीला मला प्रत्येक मुलांचा अभ्यास करावा लागला. त्यांच्याशी मैत्री करावी लागली. त्यांचे संभाषण करायचे विविध पैलू मला जाणून घेऊ लागलो. मी त्यांच्याशी एकरूप होऊन ! त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना चित्रकलेमध्ये शिकवत होतो. त्यांची आणि माझी मैत्री खूप छान ! झाली .मूकबधिर विद्यालय शिकवताना मला बोलणं कमी मूक अभिनय , मूक अभिनय,हालचाली याद्वारे त्यांच्याशी  बोलावे  लागे. त्यामुळे मी जास्त बोलणारा शिक्षक अबोल झालो! हस्तकलीमध्ये विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड करणे भेटकार्ड तयार करणे विविध कागदापासून विविध वस्तू करायला शिकवल्या आणि त्या वस्तूचे प्रशन भरून त्यापासून विक्री पण तयार झाली मुले बाकीच्या मुला पैकी ही मुले एकानी गोष्ट करताना एकाग्रता चिकाटी त्यांच्यामध्ये असते त्यामुळे हस्तकलामध्ये त्यांना कौशल्य प्राप्त होते.
      संस्था चालक श्री.गोसावी साहेब यांनी आम्हांला सुट्टीत सर्व्हे करा. मूकबधिर विद्यार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवा. दि.१४ एप्रिल रोजी यादिवशी सर्वेक्षण करण्याचे नियोजन करून श्री.कदम सर, श्री.रणदिवे सर, मी (श्री.शिंदे सर) सर्वेक्षण सुरूवात आमच्या सायकल वरून  झाली. सकाळ पासून  प्रत्येक गावात जाऊन मूकबधिर मुलांची चौकशी सुरू झाली.
बरेच तासांनंतर आम्हांला तहान,भूक लागली. 
आमच्या कडे थोडे पैसे होते.पण हाँटेल नव्हते.सर्वजण आम्ही कोठे मिळते काय बघत होतो. मागे ,पुढे माळरान होते. आम्ही सायकलवरून प्रवास करत होतो. मनात नोकरी करताना हे कष्ट करण्याची तयारी दाखवली होती.
मला दूरवर मंडप दिसला, जवळ येताच स्पिकरचा आवाज ऐकू येऊ लागला. मला आनंद झाला.मी कदम सर, रणदिवे सरांना सांगितले आपण तेधे जायचे ! पाणी, खाण्यासाठी काही तरी सांगायचं!
भूक लागल्यामुळे सर्वजण तयार झालो.जवळ येताच आम्हांला  दिसले महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभ होता. आम्ही तीन सायकली बाहेर लावल्या! आमची ओळख तेथील कोणाशी नव्हती. मी मंडपात गेलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  गुलाब पुष्पे अर्पण केली. विनम्र अभिवादन केले!
हे कार्यकर्ते बघत होती. ते आमच्या जवळ आले .आमची चौकशी केली. आम्ही सारे जण  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.साहेब ,या शाळेत त्यांनी आम्हांला पाणी, खाऊ दिला. आम्ही ते पाणी आणि खाऊन झाल्यावर त्या सर्वांना धन्यवाद! 
आमच्या जीवनात सर्वेक्षण काम! आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं विनम्र अभिवादन! सदैव स्मरणात राहील!
(पुढील भाग पुढील आठवड्यात देईल....)

Comments