सेवापूर्ती सोहळा : सौ.मकानदार नजमा युनूस मकानदार यांचे कार्य आदर्श!
मा. सौ. एन.वाय.मकानदार मॅडम या आज नियत वयोमानानुसार आपल्या प्रदिर्घ अध्यापन कार्यातून निवृत्त होत आहेत. त्यांचा अलांसा परिचय देताना मला खूप आनंद होत आहे.
दि फ्रेंड्स असोसिएशन, जत, या संस्थेचे संस्थापक संचालक, दिवंगत मा. श्री. G.D. मुल्ला साहेब यांच्या लाडक्या कन्या. लहानपणा -पासून वाचन लेखनाची आवड असल्यामुळे सतत उद्यमशील वृत्ती -मुळे कुटुंबातील त्या पहिल्या उच्च विदयाविभूषित ठरल्या.
जत येशील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच योग्य वयात मा श्री G.D. मुल्ला साहेबांच्या निर्णयाने व कर्म-धर्म संयोगाने जत येथीलच मा. श्री. युनूस मकानदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नजमा कुमुल्ला या सौ. मकानदार म्हम पतीच्या नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास गेल्या तेथे त्या 10 वर्ष राहिल्या
'पुणे' येथे असताना संसार करत-करत, घरची जबाबदारी सक्षमतेने पे पेलवत छोरी आशिया आणि नदीम यांना सांभाळत पुष्यातील S.N.D.T. महिला विव्यापीठात शिक्षण शास्त्र तथा B.Ed. पदवी संपादन केली. 'भारती विदयापीठ पुणे येथे तसेच केंद्रीय विद्यालय खडकी, माध्यमिक विदयालय बालभारती येथे एकूण 2 वर्ष अध्यापिका म्हणून अध्यापनाचे कार्य केले.
तृतीय 1996-1997 मध्ये महणजे वित्तीय पुत्र आयुक्च्या जन्मा नंतर संसारत्यो आर्थिक जाणीवेतून नोकरीची गरज ओळखून नोकरीच ठाम निर्णय होवून दि. फ्रेंडस असोसिएशन जत संख्येच्या न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी येथे एक वर्ष अध्यापनाचे कार्य करून संस्थेल सेवा में सुरु केली
1997-1998 मध्ये जत हायस्कूल, जत येथे सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या, सलग 16 वर्ष सहाशक्षिका म्हणून कार्यकरताना अनेक शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केली. बहुतेक वेळा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर कार्यभार सांभाळल्यास.
इयत्ता । ली इंग्रजी प्रशिक्षणापासून ते इयत्ता 10वी इंग्रजी प्रशिक्षणापर्यंतच्या सर्व प्रशिक्षणाचा उत्तम अनुभव घेवून 'शिक्षणातील नव्या शैक्षणिक प्रवाहांची अध्यापनातून विदया र्थ्यांना अनुभूती त्यांनी दिली.
संस्थेच्या आदेशानुसार 'न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी येथे बदलीने रुजू घेवून संस्थेच्या या ही शाखेत अध्यापनाचे 12 वर्ष सेवा पूर्ण केली विदयालयातील जेष्ठ अध्यापिका म्हणून कुंभारी करांचे मन जिंकले.
पदोन्नतीने शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 मध्ये संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल 8 ज्यू कॉ. ओ.आई. 8 सायन्स, माडग्याळ गणे पर्यवेक्षक पदावर रुजू झाल्या. पर्यवेक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावणाऱ्या मान्यवर आजच्या सत्कारमूती मा.सौ. एन. वाय. मकानदार मॅडम होत.
एकूण 32 वर्षांचा शैक्षणिक प्रवासात 4 नवोपक्रम पूर्ण केले असून, पहिला नवोपक्रम राज्यस्तहार्पयत पोहोचला या स्थूल्य कायर्यास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जत हायस्कूल जतचचे माजी मुख्याध्यापक मा.डॉ . श्रीपाद जोशी साहेब यांनी केला. कार्य केले.
भारत स्काऊट गाईड शिक्षण प्रशिक्षणात मा. सौ. एन.वाय.मकानदार मॅडम यांनी
प्रवेश व प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून त्यांनी प्रदिर्घकाळापर्यंत स्काऊट गाईड मास्टर' म्हणून सेवा केली. श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका,जिल्हा,राज्यस्तरीय स्काउट, गाईड मेळाव्यात स्काउट, गाईड विविध बक्षीसे प्राप्त केली आहेत.
नेहमी हसतमुख असणाऱ्या, सर्वांशी प्रेमाने, आदराने जवळीक साधणाया, इंग्रजी आणि हिंदी विषयांचा सखोल अभ्यासक म्हणून ख्याती मिळवणाया, मुलांमध्ये मुल होवून रमणाया, दिलेली जबाबदारी सक्षमतेने पेलणान्या, सर्व धर्म समभावतेचा तत्त्व प्रामाणिकपणे आचरणात आणणाया, सतत नवोपक्रमात राबवणाऱ्या, बाचन - लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी सतत प्रयान करणाऱ्या
कॅम्प उन्हाळ्यात सुट्टीत संस्कार शिबीर घेणे, स्काऊट गाईडची अ आयोजित करणे, राज्यस्तरीय परीक्षेस विदयाध्याना बसवणे व तेथपर्यंत विदयार्थी पोहोचवणे, विविध स्पर्धाचे आयोजन करणे, प्रेरणात्मक बक्षीस जाहिर करून वितरीत करणे, सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहान भाग घेणे यात त्यांना नेहमी उत्साह आणि आनंद वाटत असे.
दर शनिवारी प्राणायाम व योगांचा तास मुलांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थासाठी आयोजित करत असत या सर्व कृर्तिना उत्तमा अध्यात्माचाही जोड देत असे अशा कृतीशिल अध्यापिकेच्या कार्याचा गौख म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार देवून त्यांचा सन्मानही केला.
आज निवृत्तीच्या उंबरख्यावर असताना त्यांच्या प्रभावी शैक्षणिक कार्याबरोबरच उत्तम आनंदी कुटुंबही त्यांच्या समवेत आहे. एक कण्या, दोन सुपुत्रांची आई, जावई आणि सुनांच्या, आनंदी सहवासाबरोबर तीन नातवांची आजी ही त्या आहेत. सतत उद्योगशील, प्रामाणिक पतीदेवांची साथही त्यांना मिळाली सुखी, आनंदी व यशस्वी जीवनाचा आदर्श पाठ घालून देणाऱ्या मा-सौ. मकानदार मॅडम यांचा पारिवार आज येथे 'एक यशस्वी मुली नदीम समीना मकानदार अब्रार निलोफर मकानदार आशिया अमित आर्वी गडहिंग्लज सपुरा जहीर मुजावर मिरज नसीमा नादिरा मिरज श कृ दिन कौसर मुजावर पुणे आयुष अकबर आई शा शेख पुणे महामूद शौकत पुणे जन्नत लियाकत मंगळवेढा बिस्मिल्ला लालू ककनो डी अथणी मुल्ला मकानदार परिवार जतपासून पर्यवेक्षक पदापर्यंतचा यशोगाथा आपल्यातून सर्वांच्या साक्षीने सेवेचा शेवटचा पार करत आहेत.
शैक्षणिक सेवेतून निवृत्त होवून उद्यापासून नव्या सेवेत नव्या उत्साहाने रुजू हेवू पाहणाऱ्या मा. सौ. एन. वाय. मकानदार यांना हार्दिक शुभेछ। पुढील आयुष्य सुखात, समाधानात, व अरोग्यसंपन्न जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना !
धन्यवाद!
लेखन,संपादक
श्री.सुभाष शिंदे, स्काऊट मास्टर, जत हायस्कूल, जत.ता.जत जि.सांगली
कु.हल्याळ बी.बी. गाईड कॅप्टन, जत हायस्कूल, जत.ता.जत जि.सांगली
श्री.सुभाष सदाशिव शिंदे,यांचा सत्कार श्री.युनूस मकानदार यांच्या हस्ते करण्यात आला.
.
Comments
Post a Comment