इस्त्रो च्या( भारतीय अवकाश संशोधन संस्था ) आजपर्यंत केलेल्या उत्तुंग कार्याची माहिती देणारी बसचे जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये उत्स्फूर्त स्वागत....!

इस्रोच्या स्पेस ऑन व्हील व्हॅन चे जत हायस्कूल जत मध्ये जंगी स्वागत.
जत, रविवार, दिनांक.२९ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी ठीक ८. ०० वाजता  स्पेस ऑन व्हील या इस्रोच्या व्हॅनचे, जत हायस्कूल जतच्या प्रांगणात जंगी स्वागत करण्यात आले. शाळेतील अध्यापिका व विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य रांगोळी काढली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दि.फ्रेंड्स असोसिएशन, जत  संस्थेचे व्हा. चेअरमन, डॉ. मदन बोर्गीकर साहेब यांच्या हस्ते व संस्थेचे सचिव,डॉ . एस.वाय तंगडी,खजिनदार, श्री . डी. व्ही. पोतदार  तसेच सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करताना डॉ. मदन बोर्गीकर यांनी इस्रोच्या कामगिरीबद्दल आणि या क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ. डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव केला.  त्यांच्या मार्गदर्शनानंतर  विज्ञान विभागाचे सहाशिक्षक श्री. गफूर  नाईक  यांनी,स्पेस ऑन व्हील या इस्रोच्या व्हॅन बद्दल माहिती दिली. तसेच चंद्रयान मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इस्रोची ही स्पेस ऑन व्हील आणि त्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील विविध शाळा जत हायस्कूल जत या ठिकाणी दाखल झाल्या. होत्या. पालक, विज्ञानप्रेमी, प्रगतशील शेतकरी यांनीही उत्तम हजेरी लावली होती. सर्व विद्यार्थी तसेच पालकांनी हे प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त केले. या व्हॅन मधील प्रत्येक उपग्रहाची माहिती देण्याचं काम जत हायस्कूल जत च्या माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन विज्ञान विषयाचे तज्ञ अध्यापक श्री. एल.सी तंगडी व त्यांचे सहकारी विज्ञान विषय शिक्षक यांनी केले. सकाळी ८. ०० वाजल्यापासून सायंकाळी 
६. ०० वाजेपर्यंत  या स्पेस ऑन व्हील इस्रोच्या कामगिरीबद्दल माहिती देणाऱ्या व्हॅनचा सर्वांनी आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी दि.फ्रेंड्स असोसिएशन जत,या संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्यालयाचे मुख्याध्यापक,श्री. पंडित कांबळे सर, पर्यवेक्षक,श्री एस.डी चौगुले सर, सर्व अध्यापक,अध्यापिका, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण कलाअध्यापक  श्री. सुभाष शिंदे सर यांनी केले तर,  निवेदन श्री. अमोल जोशी यांनी केले. इस्रोची ही स्पेस ऑन व्हील माहिती देणारी व्हॅन 
जत तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

Comments