स्काऊट -गाईड नोंद वही माहिती :

* बी. पी. यांचा जीवनपट *
१८५७ जन्म २२ फेब्रुवारी.
१८६९ शालेय शिक्षण.
१८७६ सैन्यात भरती.
१८७६ ते १८८४
भारतात सैनिक अधिकारी म्हणून नियुक्ति.
१८८३ कॅप्टन म्हणून नियुक्ति.
१८८५ इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व माल्टा इ. देशात सैनिकी सेवा.
झुलू जमातीशी युद्ध १८९५
अशांती जमातीशी युद्ध.१८९६
जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ स्टाफ १८९९
मेफकिंगचा वेढा.१८९९
बॉय कॅडेट कोअर स्थापना.१९०१
मेजर जनरल म्हणून नियुक्ति.१९०७
ब्राउनशी बेटावर पहिला कैंप.१९०८
स्काऊटिंग फॉर बॉईज पुस्तक निर्मिती.१९१०
सैनिकी जिवनातून सेवा निवृत्ती.१९१२
विवाहबद्ध.१९१९
स्किम ऑफ ट्रेनिंग या पुस्तकाची निर्मिती.१९२०
जगाचे मुख्य स्काऊट म्हणून पदवी१९४१
 ख्रिस्तवासी झाले. (८ जानेवारी १९४१)
स्काऊट - गाईड बिल्ला:
भारत स्काऊट गाईड ध्वज
जागतिक स्काऊट ध्वज
जागतिक गाईड ध्वज
राष्ट्रध्वज

स्काऊट चळवळ माहिती
 स्काऊट चळवळ - एक दृष्टिक्षेप
कोणताही देश सामर्थ्यशाली व वैभवशाली होण्यासाठी त्या देशातील प्रत्येक नागरिक सामर्थ्यशाली व प्रगतिशील झाला पाहिजे. त्यासाठी नागरिकांमध्ये काही गुणांचा विशेषत्वाने परिपोष होणे आवश्यक असते. नागरिकांमध्ये एकमेकांविषयी उत्कट जिव्हाळ्याची भावना, एकमेकांना सहकार्य करण्याची कळकळ, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, त्यासाठी आवश्यक असा धाडसी स्वभाव, स्वावलंबी वृत्ती, स्वतंत्रपणे व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता इत्यादी गुण उत्तम नागरिक घडवण्यासाठी प्राधान्याने आवश्यक असतात. हे गुण नागरिकांमध्ये रुजवल्यास समर्थ राष्ट्र घडू शकते.
मात्र, कोणत्याही गुणांची रुजवणूक शालेय वयातच उत्तम रीतीने होते. म्हणून कार्यक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याचे संस्कार करण्यासाठी शालेय पातळीवर 'स्काऊट आणि गाईड' या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
थोडक्यात, तरुणांना कार्यक्षम व जबाबदार नागरिकत्वाचे शिक्षण देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करणे आणि दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास 'सदैव तयार असणे' हे ध्येय बाळगून' स्काऊट आणि गाईड' ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.
उत्तम जीवनाचा संस्कार करणाऱ्या या विषयाची संकल्पना युद्धातील एका अत्यंत बिकट प्रसंगातून जन्म पावली आहे. लॉर्ड बेडन-पॉवेल यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्काऊट चळवळ सुरू केली. कुमारवयीन मुलांच्या अंगभूत गुणांच्या अफाट सामर्थ्याचा प्रत्यय पॉवेल यांना युद्ध जिंकताना आला. याच अफाट सामर्थ्याचा दैनंदिन समाजजीवनात उपयोग करून घेता यावा, म्हणून त्यांनी स्काऊट चळवळ सुरू केली.
लॉर्ड बेडन-पॉवेल (१८५७ ते १९४१) स्काऊट आणि गाईड या चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे बेडन-पॉवेल यांचे संपूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन स्मिथ बेडन-पॉवेल हे आहे. ते तीन वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांना सतत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना चाकोरीबद्ध जीवनापेक्षा मुक्त जीवनाची आवड होती. त्यामुळे रानावनांत सहलीला जाणे, पोहणे, नौकानयन करणे इत्यादी क्रीडाकृत्यांमध्ये त्यांना खूप रस होता. अभिनय, गायन, चित्रकला या कलाप्रकारांमध्येही त्यांना खूप रुची होती.
स्वभावतःच धाडसी असल्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी सैन्यात प्रवेश केला. त्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी त्यांची भारतात लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली. या कालावधीत त्यांनी सैनिकांशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांना हुशार, सतर्क, कल्पक व धाडसी अधिकारी आणि सैनिकांचा मित्र असा लौकिक मिळाला.

लॉर्ड बॅडेन-पॉवेल
१८९९ साली दक्षिण आफ्रिकेतील मॅफकिंग येथील बोअर युद्धात सेनाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला. मॅफकिंग गावाला शत्रुसैन्याचा २१७ दिवसांचा अजस्र वेढा पडला होता. या कठीण प्रसंगी बेडन-पॉवेल यांनी न डगमगता पथकातील सैनिक व गावातील मुले यांच्या साहाय्याने वेढा मोडून काढला व विजय मिळवला.
हा लढा देताना त्यांनी गावातील मुलांना हाताशी घेऊन त्यांचे रक्षक दल बनवले. संदेश पोहोचवणे, पहारा करणे, तसेच, शत्रुसंख्या, त्यांची साधने, त्यांच्या हालचाली यांची माहिती मिळवणे इत्यादी कामे त्यांच्याकडून करवून घेतली. ही मुले आपली कामे अत्यंत जबाबदारीने व सचोटीने पार पाडतात, याचा अनुभव बेडन-पॉवेल यांना आला.

 (ग) ध्वजांची माहिती
(१) राष्ट्रध्वज : आपला राष्ट्रध्वज केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या समान रुंदीच्या एकाखाली एक असलेल्या आडव्या पट्ट्यांचा आहे. त्याच्या मधल्या पट्ट्यावर २४ आरे असलेले निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. याच्या लांबीचे रुंदीशी प्रमाण ३ : २ आहे. यातील विविध भागांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
केशरी रंगाचा पट्टा : त्याग, तपस्या, धैर्य आणि बलिदान यांचे प्रतीक.
पांढऱ्या रंगाचा पट्टा : सत्य, पावित्र्य आणि शांतता यांचे प्रतीक.
हिरव्या रंगाचा पट्टा : सुबत्ता आणि समृद्धी यांचे प्रतीक.
अशोक चक्र : अशोकस्तंभावरील चार सिंहांच्या बैठकीवर कोरलेले हे चक्र आहे. या चक्राला २४ आरे आहेत. हे चक्र प्रगतिपथावर गतिमान राहण्याचा संदेश देते.
राष्ट्रध्वज
(२) भारत स्काऊट आणि गाईड ध्वज ७ नोव्हेंबर १९५० रोजी 'भारत स्काऊट आणि गाईड' संस्थेचा ध्वज तयार करून उभारण्यात आला. स्काऊट-गाईड मेळाव्याच्या वेळी व स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी हा ध्वज उभारला जातो.
वचनविधी झालेला कोणताही विद्यार्थी व भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचा सभासद असलेली कोणतीही व्यक्ती हा ध्वज उभारू शकते.
आकार : ध्वजाच्या लांबीरुंदीचे प्रमाण ३२ असे आहे. त्यावर संस्थेचे चिन्ह ध्वजाच्या लांबीरुंदीच्या प्रमाणात असते.
भारत स्काऊट आणि गाईड ध्वज
रचना : गडद निळ्या रंगाच्या कापडावर मध्यभागी पिवळ्या रंगामध्ये भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे चिन्ह असते. या चिन्हाला तीन पाकळ्या असतात. या तिन्ही पाकळ्या बांधून ठेवणारी आडवी प‌ट्टी या पाकळ्यांवर किंचित खाली असते. या चिन्हाच्या मध्यभागी अशोकचक्र असते.
महत्त्व : निळा रंग हा सेवेचा निदर्शक आहे. आकाश व पाण्याचा रंग निळाच असल्याने या रंगातून विश्वव्यापकता सूचित होते. पिवळ्या चिन्हाच्या तीन पाकळ्या गाईडच्या तीन प्रतिज्ञांचे सूचक आहेत. तीन पाकळ्यांवरील आडवा पट्टा एकता दर्शवतो.
(३) जागतिक गाईड ध्वज जागतिक गाईड ध्वज १९३० साली सहाव्या जागतिक परिषदेच्या मान्यतेनंतर अस्तित्वात आला. १९९० साली या ध्वजाच्या रचनेत बदल करण्यात आला.
आकार : ध्वजाच्या लांबीरुंदीचे प्रमाण ३ २ असते.
रचना : निळ्या रंगाच्या कापडावर पिवळ्या रंगाचे त्रिदल असते. त्रिदलाच्या मधल्या पाकळीवर सुईचे उभे चिन्ह आखलेले असते. उरलेल्या प्रत्येक पाकळीवर एकेक चांदणी रेखलेली असते. त्रिदलाच्या तळाला एक आडवी दोरीसारखी रेषा असते.
महत्त्व : त्रिदलाच्या तीन पाकळ्या हे तीन प्रतिज्ञांचे प्रतीक आहे. सुईचे चित्र योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. त्रिदलावरील दोन चांदण्या म्हणजे नियम व प्रतिज्ञा होत. त्रिदलाच्या तळाची रेषा

जागतिक (विश्व) गाईड ध्वज
सेवाभावना व मानवतेवरील निष्ठा सूचित करते. त्यातून विश्वप्रेम प्रकट होते. (४) जागतिक स्काऊट ध्वज स्काऊटचा ध्वज १८ व्या 'विश्व
स्काऊट संमेलना'त १९६१ साली ब्रिस्बेन येथे स्वीकारला गेला. हा झेंडा आंतरराष्ट्रीय शिबिरात, संमेलनात व जांबोरीमध्ये उभारला जातो. आपल्या शाळेच्या स्काऊट संघासाठी याचा उपयोग करता येतो.
आकार : ध्वजाच्या लांबीरुंदीचे प्रमाण ३२ असते. आकार १३५ × ९० सेमी असतो.
जागतिक स्काऊट ध्वज
स्काऊट गाईड नियम :
(१) स्काऊट गाईड विश्वसनीय असतो / असते.
(२) स्काऊट गाईड निष्ठावान असतो / असते.
(३) स्काऊट गाईड इतरांचा मित्र व दुसऱ्या स्काऊट गाईडचा/ची बंधू भगिनी असतो/ असते.
(४) स्काऊट गाईड विनयशील असतो / असते.
(५) स्काऊट गाईड प्राणिमात्रांचा मित्र असतो/ असते व तो/ती निसर्गावर प्रेम करतो/करते.
(६) स्काऊट गाईड शिस्तप्रिय असतो/असते.
(७) स्काऊट गाईड धैर्यवान असतो/असते.
(८) स्काऊट गाईड काटकसरी असतो/असते.
(९) स्काऊटचे/गाईडचे आचार, विचार व उच्चार पवित्र असतात.

 स्काऊट गाईड प्रतिज्ञा (वचन) :                      "मी माझ्या शीलास स्मरून अशी प्रतिज्ञा करतो/करते की, (१) ईश्वर व स्वदेश यांच्याविषयी माझे कर्तव्य करण्याचा, (२) दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा आणि (३) स्काऊट गाईडचे नियम
आचरणात आणण्याचा मी शिकस्तीने प्रयत्न करीन."                                                          १ स्काऊट गाईड ध्येयवाक्य : 'तय्यार !' आपण केलेली प्रतिज्ञा अमलात आणण्यासाठी सदैव तयार राहा असा संदेश हे ध्येयवाक्य देते.

 शेकोटी गीत
ज्वाला जशा उसळती वर जावयाते ध्येये तशीच आमुची असुदेत माते ही इंधने तळपती अति रक्तवर्णे सारे प्रयत्न अमुचे प्रति सूर्यबिंबे रक्षा जशीही दिव्याग्नि निपजे तेची गतीहो अमुच्या चुकाते दिव्याग्नि जैसा उजळी अम्हाला बंधुत्व भाव अन् तो उजळो जगाला
स्काऊट चा गणवेश....

स्काऊट चळवळीची ठळक वैशिष्ठ्ये
१९०८ स्काऊट चळवळीची भारतात सुरूवात.
१९०९ इंपिरियल हेडकॉर्टरमध्ये पहिल्या टूपची नोंदणी.
१९१० दुसऱ्या स्थानिक संस्थेस मान्यता.
१९११ पांचवे जॉर्ज यांची कलकत्त्याच्या कार्यालयात भेट.
१९१२ मद्रास येथे स्काऊट कार्यालय सुरू झाले.
१९१६ मद्रास येथे इंडियन बॉय असोसिएशनची स्थापना.
१९२१ बी. पी. ची भारतास पहिली भेट.
१९३७ दिल्लीतील पहिली भारतीय जंबोरी. नट P.S. ची दुसरी भेट.
१९३८ हिंदुस्थान स्काऊट असोसिएशनची स्थापना.
१९४७१५ ऑगस्ट भारत देश स्वतंत्र झाला.
१९५० :७ नोव्हेंबर भारत स्काऊट गाईड संस्था अस्थित्वात आली.
१९५१ :१५ ऑगस्ट रोजी भारत स्काऊट गाईड संस्थेस जागतिक गर्ल व गाईड असोसिएशनची मान्यता.
१९७० :मुंबईत राष्ट्रीय जंबोरीचे आयोजन. अखिल भारतीय 6 वा जंबोरी.
१९७२:स्काऊट-गाईड चळवळीचा अभ्यासक्रमात समावेश.
१९८९ :कब-बुलबुल चळवळीचा अभ्यासक्रमात समावेश.

Comments