एका निवडणुक कर्मचाराची व्यथा....
मी जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,लोकसभा,विधानसभाअशा मी पंधरा ते वीस इलेक्शन ड्युटीचे कामकाज केलं आहे .पण यावेळी विधानसभेला मी सर्वांना विनंती करत होतो. की मला गुडघ्याचा आतील भागाची झिज झाल्यामुळे मला त्रास होत आहे. चार महिने झाले मला मांडी घालून बसतात येत नाही .
माझ्या वरती औषध उपचार सुरू आहेत. .चालताना त्रास होतो म्हणून बेल्ट लावून मला चालावे लागते . माझ्या शाळेपासून ,माझ्या तालुका पर्यत आणि मा. जिल्हाधिकारी साहेबांना सुध्दा मेल केला होता. त्यांच्या मेल आला . कार्यवाही साठी कार्यालय कडे पाठवित आहे. तरी सुद्धा माझ्या विनंती ची दखल घेतली नाही. यावर्षी माझे मेडिकल प्रकरण असल्यामुळे यातून मला मुक्त करा . सर्व कागदपत्राची पूर्तता केली होती. तरीही दखल कोणीही घेतली नाही . मला प्राथमिक गोष्टी सुद्धा व्यवस्थित करता येत नव्हता. ज्यावेळी कडेगाव ला प्रशिक्षणासाठी गेलो होतो त्यांनाही सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे दिली होती.
तेव्हा त्यांनी दखल घेतली नाही . त्यांनी फोन करून सांगितलं तुम्ही मतदानाच्या कामाला या....!
मी शेवटी ठरवलं आपण अशा परिस्थितीमध्ये मतदान अधिकारी म्हणून काम करायचं...
जेवण कमी घेऊन आणि मेडिकलच्या गोळ्या डबल खाऊन मी निवडणूक काम केलं .मला वेदना होत होत्या पण मी कोणास सांगणार ? कडेगाव आल्यानंतर झोन साहेबांना सांगितलं होतं , मी विनंती केली .माझी अडचण आहे. मला ह्या वेळेला राखीव ठेवा किंवा दुसरे कोणतेही काम सांगा .एका ठिकाणी जास्त वेळ मला बसता येत नव्हतं मेडिकल च्या गोळ्या खाऊन मी माझं सेवानिवृत्ती च्या वाटेवर असतानाच हे शेवटच इलेक्शन चं काम केलं! मला एक प्रश्न पडलाय ह्या निवडणूक कार्यक्रमांढथमध्ये जे आजारी असताना त्यांच्याकडे लक्ष का दिले जात नाही ? कडेगाव
मतदानाचे कामकाज करीत असतात खूप त्रास झाला.
तसेच मतदान केंद्र मिळालं ते पण एक हजारावर होतं.
मला कुणाशी काही म्हणायचं नाही .मी जर शिक्षक झालो नव्हतो तर मला ही इलेक्शन ड्युटी आली नसती असं मला माझ्या मनाला वाटलं.
गेली अनेक वर्ष मतदान जनजागृती ची कामे करीत असतो . पोस्टर करणे ,मुलांच्या रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेणे .प्रभात फेरी चे आयोजन करणे आणि पथनाट्यद्वारे मी माझ्या तालुक्यामध्ये मतदार जनजागृतीचे कामकाज करत असतो.
यावर्षी तर व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम विविध प्रसारमाध्यमावरती माझे पन्नास ते शंभर व्हिडिओ स्वतः निर्मिती करून प्रसारित केली आहेत.
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
Comments
Post a Comment