किल्ल्याचंअंबेवडे ब्रु गावाला एकवेळ भेट द्या...!
*किल्ल्यांच गाव अंबवडे बु ला नक्की भेट द्या दि. 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर तारखेला*
एका ठिकाणी लिंगाणा, हरिहर गड, रांगणा, पिसोळ, रोहिडा, पट्टा किल्ला, राजगड, सिंहगड, सुधागड,अवचितगड, पन्हाळा पावनखिंड विशाळगड, राजमाची चे मनरंजन व श्रीवर्धन गड, तोरणा, अजिंक्यतारा,वर्धनगड, पारगड, प्रतापगड , पद्मदुर्ग, शिवनेरी, वैराटगड, इ किल्ले पाहायचेत? मग तर चला सातारा तालुक्यातील सज्जनगड च्या शेजारी असलेले अंबवडे बुद्रुकमध्ये इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले पाहण्यास मिळतीलच, त्याबरोबर त्याचा इतिहास ही ऐकायला मिळेल, बालनाटीकेमधून पावनखिंड चा थरारक अनुभव पाहायला मिळेल त्याच बरोबर सिंहगडावरच्या लढाईचा सुद्धा अंगावर काटा आणणारी बालमावळ्यानी बसवलेली नाटिका सुद्धा बघायला मिळेल. तसेच तब्बल 40 किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याची किमया येथील बामावळ्यांनी साकारली आहे. त्याच बरोबर या वर्षी खास शिवभक्तांची शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन दि.4 ते 6 नोव्हेंबर पर्यंत पहावयास मिळेल. आणि भव्य रांगोळी पाहावयास मिळेल.
दिवाळी म्हटलं की रांगोळी कंदील, फटाके ,फराळ अशा सर्व गोष्टीबरोबर आणखी एक वैशिष्ट म्हणजे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोन युगात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे. नव्हे तर तिला व्यापक स्वरूप आले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील लोक गर्दी करीत असतात, त्यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप येत आहे..
गावात दरवर्षी साधारण 40 ते 50 किल्ले ते ही मोठ्या प्रतिकृतीचे म्हणजे किती तर १ गुंठा, पूर्ण शेतात एवढया मोठ्या आकारात किल्ले
उभारले जातात. किल्ला करताना किवा गडकोट किल्ला उभा करताना तो एखाद्या गड दुर्गासारखा हुबेहूब व्हावा असा अट्टाहास नसतो मात्र तो किल्ला उभा करण्यापाठीमागची भावना मात्र राजगडला टक्कर देईल माझा बनवलेला दुर्ग अशी असते. किल्ला बनवताना मुलं कमीत कमी खर्च करत असतात, म्हणजे तटबंदी बनवताना माती, शेण राख, भुसा चा वापर करून केलेले आहे. तर सैनिक, घर ,मंदिर पुष्टयाची बनवलेली आहेत डोंगरी किल्ल्यांबरोबरच सागरी किल्ले देखील हुबेहूब साकारले आहेत. तसेच किल्ल्यांच्या देखाव्या बरोबरच त्या किल्ल्याची माहिती व इतिहास किमान 10 मिनट बाल मावळे सांगतात प्रत्येक ठिकाणी सामाजिक संदेश ही प्रदर्शित केला आहे .
किल्ले प्रदर्शनला दि.4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर तारखेला सर्वांनी सायंकाळी 4 नंतर रात्री. 11 पर्यंत भेट द्यावी आणि आमच्या बाल मावळ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अंबवडे बु ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
संपर्क
राजेश जाधव 9921790929
सचिन देशमुख 9689020377
सुमित जाधव 9604394938
निलेश जाधव 7447282904
अक्षय जाधव9637803583
Comments
Post a Comment