संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकांचे आहे ! - जिल्हा शिक्षणाधिकारी मा.श्री.लोंढे साहेब...

संस्कारक्षम विद्यार्थी घडविणेचे काम शिक्षकांचे आहे.!
    - जिल्हा शिक्षणाधिकारी लोंढे
S.Arts News............................................ 
साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज व राष्ट्र सेवा दल आयोजित श्यामची आई पुस्तकाचे प्रकाशन समारंभ न्यु इंग्लिश स्कूल मिरज येथे करण्यात आले.
सदाशिव मगदूम यांनी पुस्तकाचे प्रकाशक म्हणून प्रस्तावना करतांना म्हणाले की आई-वडील व शिक्षकांच्या वर अद्याप मुलांचा विश्वास आहे.यांनी ठरवले तर भावी पिढी वर्तमान काळातील विसंगतीला सामोरे जावू शकतील व या करिता श्यामची आई हे साने गुरुजी लिखित हृदय स्पर्शी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
साने गुरुजींच्या खरा तो एकचि धर्म या प्रार्थना गीतांनी व सानेगुरुजींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
      श्यामची आई पुस्तकाचे प्रकाशन झाले असे जाहीर करुन  मा.राजेसाहेब लोंढे म्हणाले की कोरोना काळात नाविलाजास्तव मुलांच्या हाती मोबाईल द्यावे लागले आज ते काढून घेतले नाही तर 8/9 वी विद्यार्थी चाकूने वार करू लागलेत,मुली चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करु लागलेत, शाळेत गावात,घरात मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे.आशा काळात श्यामची आई या पुस्तकातील विचार प्रत्येक मुलांच्या मनात बिंबवने हे शिक्षक म्हणून व जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून मी माझी जबाबदारी आहे असे माणतो.यासाठी शिक्षकांच्या सोबत शिबिरे आयोजित करून त्यांना ही या कार्यात सहभागी करून घेणेचा मी प्रयत्न करेन सेवा दलाचे लोक हे कार्य निरंतर पणे करितच आहेत मात्र हे काम शिक्षकांचे ही  आहे असे मी माणतो असे म्हणत आपण सर्वांनी मिळून परिवर्तनाचे कार्यात सहभागी होऊ असे आवाहन ही उपस्थितीतांना केले.न्यु इंग्लिश स्कूल मिरज चे
  मुख्या.अरुण माने यांनी आपल्या शाळेत श्यामची आई पुस्तक प्रकाशन होत आहे याचा मला आनंद झाला आहे आपण सगळे या निमित्ताने आमच्या शाळेला भेट दिली या बद्दल मि आपल्याला धन्यवाद देतो.या प्रसंगी डॉ.विकास गोसावी यांनी आपल्या आई-वडिलांनी आमच्यावर चांगले संस्कार केले त्याच शिदोरीवर आम्ही डॉ.शिरिष चव्हाण सारख्या मंडळीनी कोरोना काळात थोडीफार मदत गरीबांना करु शकलो व लोकांचे कांही देणे लागतो याची जाणीव ठेवून कार्यरत आहोत.शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष मुख्या.सुधाकर माने,माजी महापौर,नितीन सावगावे,आदिनी आपले विचार व्यक्त केले. अक्षर शोधनाचे उत्कृष्ट पुणे करून देण्याचे काम करणाऱ्या सुनिता बिरनाळे मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सौ.शोभा मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले.दिनकर आदाटे यांनी मा.लोंढे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
    सुनिती बिरनाळे यांनी मनोगत व्यक्त करित सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास डॉ.शिरीष चव्हाण,काॅ.पी.डी.कुंडले,मोहनराव देशमुख,शिवाजी दुरगाडे,डॉ.लताताई देशपांडे,सौ.कमलताई शिर्के,.ह.भ.प.शिवश्री जमादार, रमेश हेगाणे,शिक्षक भारतीचे पदाधिकारी,रोहित शिंदे,सलीम सय्यद,अंकुश कोळेकर,आप्पासाहेब कुंभार,दिनकर शिंदे,कोमल मगदूम ,साहिल मगदूम,चेतन हेगाणे,हेरंब माळी,प्रविण आदाटे,आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हार्दिक शुभेच्छा!
एस.आर्टस् न्यूज.........(प्रतिनिधी)
श्री.सुभाष शिंदे,अध्यक्ष 
साने गुरूजी कथामाला कला केंद्र, जत. 
🟪🟦🟥🟧🟪🟦🟥🟧🟦🟥
🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊

Comments