जत तालुकातंर्गत गायन स्पर्धा आणि मी परीक्षक श्री.सुभाष शिंदे आणि मनातील भावना...!

तालुकातंर्गत  स्पर्धेच्या माझ्या मनातील आठवणी!     जत तालुका खाजगी प्राथमिक शाळा यांच्यावतीने तालुकातंर्गत  स्पर्धा आदर्श विद्यालय तिकोंडी ,जत ता. जत जि.सांगली येथे घेण्यात आला.
 या स्पर्धेसाठी माझी परीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. हा क्षण एक वेगळा ,आगळाआणि बालविश्व मनातील भावना,बाल मनातील गायन कलेचा आस्वाद घेतला.परीक्षण करण्यासाठी मी सकाळी जत हून  आदर्श विद्यालय तिकोंडी, ता.जत जिल्हा -सांगली या   शाळेमध्ये  निघालो. काही वेळानंतर त्या शाळेमध्ये पोहोचलो .नावाप्रमाणेच आदर्शाची  जाणीव मला  दिसली.  विद्यालयात प्रवेश केला तेव्हा स्वच्छता, टापटीत आणि सर्व विद्यार्थ्यांची पादत्राणे बाहेर होती .अगदी शिक्षकांची सुद्धा  पादत्राणे बाहेर... ज्ञान मंदिर मध्ये पायामध्ये पादत्राणे नव्हती हे विशेष मला जाणवले. मी सुद्धा त्या  माझी पादत्राणे  बाहेर ठेवली .त्या शाळेमध्ये नमस्कार करून निघालो, जाता,जाता  मला अनेक गोष्टी जाणवल्या .स्वच्छता ,टापटिप प्रत्येक जण आपल्या कामामध्ये मग्न होता .आज आपल्या शाळेमध्ये तालुकातंर्गत   गायन स्पर्धा होणार आहेत .शिक्षक ,शिक्षिका मुख्याध्यापिका त्या कामामध्ये मग्न दिसल्या . कोण सजावटीसाठी, फल लेखन करतय ,कोण सरस्वतीचा फोटो ठेवते, आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षकांना जी मदत लागेल ती देत होती. मी  गेल्यावर  शिक्षक धावत माझ्याकडे आले .सर! नमस्कार मी त्यांना म्हणलं मला ओळखलं सर हो !  तुम्ही  श्री. शिंदे सर  तुम्हांला कोण ओळखत नाही बरं !    ऑफिसमध्ये मी जाऊन बसलो .माझ्याबरोबर संगीतकार शिक्षक श्री.केंगार सर, श्री.शिवशरण सर सुध्दा होते . आम्ही  तिघे तिथे जाऊन बसलो. तेवढ्यात शिक्षकांनी  आम्हांला  पाण्याचा ग्लास दिला. किती ही नम्रता ,आदर्श शाळेमध्ये जाणविलीछ.   प्राथमिक शाळा ही इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत होती. मला शाळा खूप आवडली. शांतपणे  प्रत्येक जण ठरलेल्या नियमाप्रमाणे काम करत होता. आपल्या जत तालुक्यामध्ये एवढी छान प्राथमिक शाळा आहे .त्याचा मला अभिमान वाटला! प्रत्येक जण ऑफिसमध्ये बसताना सुद्धा मा.मुख्याध्यापक  टेबलावर एक स्मृतीचिन्ह  ठेवलं होतं. त्यांच्या शाळेला कृतीशील शाळा बहुमान मिळाला होता. शाळा सुरेख आहे . विद्यार्थ्यांचा गणवेश सुरेख होता .कोणत्याही मुलाच्या तोंडामध्ये अपशब्द आढळला नाही. मला शाळा  छान वाटली. स्पर्धा सुरू झाली कार्यक्रम सुरू झाला विद्यार्थी , विद्यार्थिनी बसले तालुक्यातून आलेल्या गायण्यासाठी विद्यार्थी आपआपल्या पद्धतीने गायन करत होती. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी पण त्यात होते. पण ते विद्यार्थी सर्वांना प्रेरणा देत होते .एक गट झाला. तेवढा मधली सुट्टी झाली .त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली .सर्व मुलं व्यवस्थित बसलेली दिसली. शालेय पोषण आहार व्यवस्थित घेत होती. कुठे खरखडेपणा नव्हता ,स्वच्छता होती .त्यांनी आम्हांला पण जेवणासाठी आमंत्रण दिलं ,आम्ही गेलो सर्वांना व्यवस्थित विचारपूस करून असे तिथे विद्यार्थीच करत होते. आम्हांला ते विद्यार्थी खूप आवडले .स्पर्धा दुसऱे सत्र सुरू झाले. या गायन स्पर्धेमध्ये एकूण गट तीन होते‌ पहिला गट- इयत्ता पहिली -दुसरी, गट दुसरा- इयत्ता तिसरी, पाचवी, गट क्रमांक तीन -सहावी ते आठवी या गटात गायन स्पर्धा सुरू असताना. प्रत्येक विद्यार्थी बडबड गीत, भावगीत ,अभंग, देशभक्ती गीत, मराठी व हिंदी गीत  मध्लये ही लहान बालके आपल्या मनातील गायन कलेच्या क्षमतेनुसार गात होती .काही विद्यार्थी गायन शास्त्रशुद्ध वाटलं, उच्चार चांगले होते. काही विद्यार्थ्यांना ताल, लय गायन कलेचा अभ्यास होता असेही काही विद्यार्थी बघण्यास मिळाले, काही विद्यार्थी उत्स्फूर्त गायन करत होते, काही विद्यार्थी वाद्याच्या तालावर सूर लय ताल यावरती गायन करत होती .संगीतकार श्री केंगार सर व श्री शिवशरण सर हे त्या बालकांना संगीतसाथीच्या  तालावर वाद्याची साथ सुरेख देत  होते .त्यामुळे गायन स्पर्धेला एक वेगळी रंगत आली.. ग्रामीण भागातील काही विद्यार्थी सुद्धा सुंदर गात होती. गट एक ,दोन, तीन स्पर्धा झाल्यानंतर संगीतकार श्री. केंगार सर व  श्री. शिवशरण सर यांनी वाद्यांच्या तालावर  एक संगीत नाद सादरीकरण करून संपूर्ण शाळा मंत्रमुग्ध केली .त्यांच्या कलेला सलाम! स्पर्धा झाल्यानंतर गुणांकन करून क्रमांक काढले.आणि बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थित झाला. पण आपली शाळा कशी असावी! हा आदर्श नावामध्ये आदर्श असल्या शाळेने खरं दाखवला! अशा शाळेचे कौतुक सर्वांनी करायला पाहिजेल.
 असं की या गावांमध्ये अशी सुंदर शाळा मला पहावयास मिळाली .त्या शाळेचे ,शाळेच्या मुख्याध्यापकांचे , शिक्षक ,शिक्षिकांचे, विद्यार्थी, विद्यार्थिनींचे, मला खूप खूप अभिनंदन! करायला आवडेल पुन्हा एकदा तुमच्या आदर्श शाळेत नक्कीच येईल!
      -श्री.सुभाष शिंदे, संपादक 
       एस.आर्टस् न्यूज 

Comments