पायाभूत सप्ताह: जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत, कला विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता, साक्षरता विकासाचा पाया या विषयावर मुख्याध्यापक श्री.पंडित कांबळे यांचं व्याख्यान......!

🎇✨️शिक्षण सप्ताह ✨️🎇
 आज मंगळवार दिनांक.२३ जुलै २०२४ रोजी जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत येथील उच्च माध्यमिक कला विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत पायाभूत साक्षरता, साक्षरता विकासाचा पाया या विषयावर विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. पी. एम. कांबळे सर,  प्रा. श्री. एन. आर. गुरव, प्रा. श्री.एम.बी.जाधव, प्रा. श्री. एस. एस.बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून वाचन कट्टा  हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी विद्यालयाकडून मा. मुख्याध्यापक श्री. पी. एम.कांबळे सर यांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. व्ही. पी. कुलकर्णी यांनी केले.

Comments