धावपळीच्या जीवनात एक मोकळा श्वास! भक्तीची ओढ ... लागली हो मना!

धावपळीच्या जीवनातील एक मोकळा श्वास अंधेरी ते विरार 6 .20 लोकल
 मोबाईल मध्ये एक पोस्ट इंस्टाग्राम वर पाहिली , मनाला धरतीच्या जीवनामध्ये एक भक्तीची आस कशी पूर्ण केली जाते. याचे उदाहरण पाहायला मिळालं अंधेरी ते विरार ६.२०  लोकल या पोस्ट मध्ये अनेक जण प्रवास करीत असतात. पण आषाढी एकादशी निमित्त एक वेगळेच चित्र पाहायला मिळालं. त्या लोकलमध्ये   प्रवासी असणारे सर्व भक्तजन त्यांनी घरातून येतानाच वारकऱ्यांच्या गणवेशात ,टाळ मृदुंग ,विठ्ठलाचा फोटो ,भगवे ध्वज, दिंडी साठी लागणारे जे जे  साहित्य लागत असेल, जे मिळेल, ते घेऊन आपल्या नोकरीसाठी जाण्यासाठी अंधेरी ते विरार प्लॅटफॉर्म वरती आले . सर्वजण एकत्र झाल्यानंतर  दिंडीचा सोहळा सुरू झाला. कोणाकडे काहीही साहित्य नसेल तर हा त्यांनी हाताचा  ठेका  धरत होते .कोण विठ्ठलाचा फोटो घेवून सहभागी होते. प्लॅटफॉर्म वरतीच दिंडी सोहळा सुरू झाला .या धावपळीच्या जीवनामध्ये मानवी जीवनाला भक्तीची आसं ! कशी असते. ती पूर्ण कशी करायची ती त्या  दिंडीतील बांधवांनी समाजाला दाखवली .प्लॅटफॉर्म वरती दिंडी सोहळा सुरू आहे. मृदंग टाळ ठेका वरती   वारकरी धरत होते . ईतर प्रवासी सुध्दा सहभागी होतात,  ठेका धरतात विठ्ठल  नामाचा जयघोष करीत आनंद मेळावा सुरू आहे. हे दृश्य पाहून प्लॅटफॉर्म पाहिल्यानंतर विठ्ठल भक्तीचा हा मेळा !
कोणत्याही ठिकाणी आपल्यांना साजरा करता येतो.धावपळीच्या जीवनामध्ये कसा जपला जातो. ह्या  पोस्ट ने दाखवून दिलं!   दिंडीचे पोस्ट इंस्टाग्राम वरती पाहिल्यानंतर कोणत्याही             परिस्थितीमध्ये आपल्याला भक्तीचा आनंद  घेता येतो .
भक्ती करताना आपल्याला जी साधने मिळतात. त्याद्वारे आपण भक्ती करता येते .मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म वरती अफाट गर्दी असते. त्या गर्दी मध्ये सुद्धा अंधेरी ते विरार ६२० लोकल ही पोस्ट आवडली ! त्या भक्तांजणांनी दिंडी सोहळा सहभागी झाले. हा अद्भुत होता ! प्रत्येक वेळी आपण आपल्याला आनंद घेत नाही .भक्ती ही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्या, विविध भावना , प्रेम , सहकार्य, जपण्यासाठी असते. त्या प्लॅटफॉर्म वरती त्यांची दिंडी सुरु झाली. त्यांच्याबरोबर प्लॅटफॉर्म वरती असणारे ज्यांच्या हृदयात प्रेम ,भक्ती आहे. अशा लोकांनी सुद्धा त्यांना साथ दिली. अरे विठ्ठला ! बघ ह्या भक्ती प्रेमाचा महापूर सर्वत्र पसरलेला आहे. आपल्या देशात नव्हे तर परदेशात सुद्धा दिंडी सोहळा ,विठ्ठल नामाचा नाद ! ऐकायला मिळाला. खरंच लोकल अंधेरी ते विरार ६.२० लोकल ही पोस्ट मनाला भक्तीची !  धावपळीच्या जीवनामध्ये एक वेगळा आस ! एक वेगळा श्वास घेता येतो. ही सांगून गेली सर्व भक्तांचे ,सहभागी झालेल्या फक्त भाविकांना माझा नमस्कार! जय माऊली !जय माऊली! जय माऊली ! राम कृष्ण हरी!

Comments