भावपूर्ण श्रद्धांजली!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐श्रीमती.इंदुबाई दत्तात्रय कदम💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे ३-००वाजता निधन झाले.अत्यविधी जत येथे सकाळी ७-३० वाजता आहे.. मृतात्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना...!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.श्रीमती कदम मावशी ह्या निवासी मूक बधिर विद्यालय जत येथून स्वयंपाकीण म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.. मूकबधिर विद्यालय सुरू झाल्यापासून श्रीमती कदम मावशी प्रथम विनामूल्य सेवा करून मूकबधिर विद्यार्थी, विद्यार्थिनींना अन्नदान करत होत्या. प्रेमळ स्वभाव आणि कामांमध्ये आनंदीपणा त्यामुळे मूकबधिर विद्यालय जत येथे स्वयंपाकीण म्हणून कर्यरत होत्या. त्या नेहमी मूकबधिर विद्यालय मधील विद्यार्थ्यांची काळजी आई प्रमाणे घेत असत! श्रीमती कदम मावशी या आदर्श माता होत्या ! संपूर्ण सेवा करताना आईच्या भावनेने त्यांनी पूर्ण सेवा केली आहे .आज श्रीमती इंदुताई कदम आमच्या मध्ये नाहीत. याचं दुःख होतेय...मी मूकबधिर विद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून होतो. त्यावेळी आम्हा शिक्षकांना सुद्धा प्रेमळ वागणूक असे..! सर्वांना मदत करत असे! श्रीमती इंदूताई दत्तात्रय कदम मावशींना माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
शोकाकुल:
श्री.सुभाष शिंदे, जत.
Comments
Post a Comment