सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात श्री.होवाळे सर ,श्री.कोरे सर, श्री.उजनीकर सरांचा सत्कार....!
श्री.होवाळे सर,श्री.कोरे सर, श्री.उजनीकर : सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा मध्ये सत्कार....! जत: ( एस.आर्टस् न्यूज, प्रतिनिधी ) जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए. बी.होवाळे ,पर्यवेक्षक श्री. एस. जी. कोरे व सहशिक्षक श्री .पी .बी .उजनीकर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा: २०२४ समारंभ संपन्न झाला. जत : येथे जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स च्या भव्य पटांगणात सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. .व्यासपीठावर जत असोसिएशन संस्थेचे सेक्रेटरी :डॉ. एस. वाय. तंगडी, साहेब, खजिनदार :श्री. डी .वाय पोतदार, साहेब विश्वस्त :डॉ. एस. एम. कन्नुरे, साहेब विश्वस्त :श्री .एस. व्ही.माळी ,साहेब विश्वस्त: श्री .जी. एस. बिज्जरगी, साहेब, विश्वस्त: श्री. सी. एल . तंगडी ,साहेब शाळेचे मुख्याध्यापक ,श्री. पंडित कांबळे ,सर, न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी च्या मुख्याध्यापिका सौ. सुर्यवंशी मॅडम , माजी मुख्याध्यापक मा.श्री. इनामदार,सर, व मा. श्री.मैत्री सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार डॉ. तंगडी साहेब यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंडित कांबळे सरांनी केले. शाळेच्या च्या वतीने. सत्कारमूर्ती श्री. होवाळे सर,श्री. कोरे सर,श्री. उजनीकर सर यांना पूर्ण पोशाख,भेटवस्तू , चांदीचे नाणे श्रीफळ, पुष्पगुच्छ से सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मा.श्री.होवाळे ए.बी.यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी- डॉ.एस.वाय. तंगडी साहेब, श्री.कोरे एस. जी.सरांचा
सत्कार संस्थेची खजिनदार श्री .डी .वाय .सोनार साहेब,श्री.पी.बी.उजनीकर यांचा सत्कार संस्थेचे विश्वस्त डॉ. एस. एम. कन्नुरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात सत्कारमुर्ती च्या पाहुणे मंडळी व मित्रमंडळी यांनी सत्कारमूर्तीचा सत्कार केला.
या कार्यक्रमांमध्ये संस्थेची सेक्रेटरी डॉ. तंगडी साहेबांनी श्री .होवाळे सरांच्या कार्यांचा आढावा घेतला. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. श्री .कोरे सर आणि उजनीकर सर यांनी संस्थेमध्ये केलेल्या कार्याचा गौरव केला . त्यांच्या भावी जीवन सुखमय, आरोग्यदायी जावो!बद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंडित कांबळे यांनी श्री. होवाळे सर यांनी केलेल्या भरीव कार्याचा गौरव केला. त्यांच्या भावी जीवनाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती मा. श्री .होवाळे ए .बी. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोगत:
संस्थेमध्ये केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. केलेल्या कोविड काळामध्ये शाळा सुरू करून जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला. तसेच संस्था व शाळा अमृत महोत्सव समारंभ व इमारतीची डागडुजी , रंगकाम करून शाळा एक सुंदर!आदर्श ! निर्माती करून संपूर्ण शाळा ऑनलाईन केली. कार्य करत असताना संस्था शिक्षक व पालक बंधू भगिनी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले . पुढील कार्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री .पंडित कांबळे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ! सत्काराबद्दल आभार मानले. शेवटी सौ सौ. सुर्यवंशी मॅडम यांनी आभार मानले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल जोशी सरांनी केले. या कार्यक्रमाला दि फ्रेंडस्अअसोसिएशन, जत च्या विविध शाखेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते .पालक बंधू-भगिनी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सत्कारमूर्ती यांचे पाहुणे मंडळी ,मित्रमंडळी उपस्थित राहून सत्काराला शोभा आणली.
अशा रीतीने सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment