आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जत हायस्कूल, जत मध्ये योग प्रात्यक्षिक घेऊन योग दिन साजरा करण्यात आला.

जत (एस आआर्टस्  न्यूजस् प्रतिनिधी ) जत हायस्कूल, जत मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके घेऊन साजरा करण्यात आला.                                                                                   जतमधील योग गुरू सौ.अनुराधा संकपाळ यांनी योगासनांचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी सौ.वैशाली हेसी यांनीही योगासने सादर केली.शाळेतील अध्यापक-अध्यापिका यांनी यावेळी उस्फूर्त सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर करून प्रतिसाद दिला.
     सहशिक्षक श्री.अमोल जोशी सर यांनी सौ.अनुराधा संकपाळ व उपस्थित सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.मुख्याध्यापक श्री पी.एम.कांबळे, पर्यवेक्षक श्री.एस.डी.चौगुले, कलाशिक्षक श्री.सुभाष  शिंदे, क्रीडा शिक्षक श्री एस.एस.स्वामी हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Comments