शैक्षणिक वर्ष-२०२४-२०२५ ची सुरुवात: जत हायस्कूल अँड जुनि.काॅलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत मध्ये विविध उपक्रमांनी करण्यात आली.

शाळा .....प्रवेशोत्सव
💐💐💐💐💐जत हायस्कूल अँड जुनि. कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स ,जत ता. जत. जि. सांगली.
                                                प्रशालेत शाळा 
 प्रवेशोत्सव  २०२४-३०२५ मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. 
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील विर्द्यार्थिनी कु.  सई प्रवीण गिरीबुवा हीच्या हस्ते करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.पंडित कांबळे यांचा सत्कार तांत्रिक विभाग प्रमुख श्री.सुतार बी.ए.यांच्या हस्ते तर पर्यवेक्षक श्री.चौगुले एस.डी.यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री.पंडित कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ग्रंथपाल श्री.राजेंद्र दुगाणी उपस्थित होते.
सर्व नूतन विद्यार्थी ,विद्यार्थिनींचे  बँड पथकाच्या  तालावर वाजत ,गाजत  मिरवणूक काढण्यात आली. व त्यानंतर  गुलाब  पुष्प देऊन  शाळेचे मुख्याध्यापक श्री . पंडित कांबळे, पर्यवेक्षक श्री.एस. डी.चौगुले व सर्व शिक्षक वृंद  यांनी सत्कार करण्यात आला.
पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवी च्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना शालेय पाठ्यपुस्तके देणेत आली.
 सूत्रसंचालन श्री अमोल जोशी यांनी केले या समारंभास क्रीडाशिक्षक श्री स्वामी सर व श्री सुभाष शिंदे कलाशिक्षक व इतर सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. प्रवेशोत्सव शाळेतील  विद्यार्थी विद्यार्थिना खाऊ वाटप करण्यात आला.
शाळेतील कलाशिक्षक श्री.सुभाष शिंदे यांनी प्रवेशोत्सव दिनानिमित्त वैशिष्ट्ये पूर्ण सजावट केली होती.या पालक बंधू-भगिनीं  उपस्थित होते.




Comments