कै. शशिकांत शिंदे पाटील, स्वाभिमानी उद्योगजक (मासिक) मुख्य संपादक व माझा चुलत भाऊ कै.शशिकांत ला चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

शिंदे शाही भव्य मेळावा :वाळेखिडी,ता.जत जि.सागली दि.११जानेवारी २०२० या समारंभ मध्ये श्री.शशिकात शिंदे पाटील, मुख्य संपादक स्वाभिमानी उद्योजक,श्री.सुभाष शिंदे, संपादक,
एस.आर्टस् न्यूज यांची उपस्थिती होती.
कै.शशिकात राजाराम शिंदे पाटील, मुख्य संपादक 
स्वाभिमानी उद्योगजक (मासिक)
(१९७७ ते २०२०)
        -श्री सुभाष शिंदे संपादक एस आर न्यूज 
आज चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कै.शशिकांत शिंदे  पाटील,माझ्या भावास विनम्र अभिवादन !
बालपण: श्री.राजाराम शिंदे व छबुताई शिंदे यांच्या पोटी तीन आपत्ती होती. पहिला - श्रीकांत ,दुसरी कन्या -शुभांगी व शेवटचे अपत्य शशिकांत घरामध्ये   सर्वजण आनंदीत होते .माझे काका हे शिक्षण सेवक सोसायटीमध्ये लेखनिक होते. त्यामुळे घरातील वातावरण सुशिक्षित होतं. आज मी शेवटचा आपत्य शशिकांत याविषयी माझ्या मनातील भावना व्यक्त करणार आहे. शशिकांत चा जन्म दि .१६ मार्च १९७७  साली झाला. लहानपणापासूनच धडपड, विशिष्ट गोष्टीचा छंद होता.  आणि संशोधक वृत्ती होती .आपल्याला काय वेगळं करायचं आहे , ही भावना त्यांच्या लहानपणापासून होती .प्राथमिक शिक्षण- जि..प. प्रा.शाळा बुधगाव मध्ये झालं .माध्यमिक शिक्षण बुधगाव हायस्कूल, बुधगाव मध्ये झालं.  उच्च शिक्षण पदवीधर शिक्षण पूर्ण केलं. आपल्याला काही वेगळे करायचे ही जिद्द लहानपणापासून त्याच्या मनात होती. प्रत्येक वेळी आमच्या भावंडांमध्ये त्याचं वेगळं  असायचं! त्याला आपल्या समाज ( शिंदे पाटील) समाजातील लोक यासाठी करण्याची इच्छा होती. तो विविध सामाजिक समस्या मध्ये समस्या जाणून घेऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असे. त्याला   मा. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी, शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थान यांच्या विशेषी  खूप निष्ठा व प्रेम होते. विविध कार्यक्रमासाठी सक्रिय सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज , विविध किल्ले यांच्या विशेषी अभ्यास करीत असे!
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विविध उपक्रमांना सक्रिय सहभागी  असायचा !         ‌‌.           वेगळेपणातूनच त्यांच्या  मनात एक संकल्पना मनात आली. ती म्हणजे स्वाभिमानी उद्योजक  मासिक काढण्याची संकल्पना ! मनात इच्छा होती त्याप्रमाणे त्याने स्वाभिमानी उद्योजक मुख्य संपादक म्हणून त्याने विविध अंक  प्रकाशित केले. आणि ते  जिल्हा ,राज्य आणि काही मराठी राजकीय नेते ,वकील, उद्योजक यांच्याकडे कसे पोहोचतील यावेळी लक्ष दिले . हे करत असताना शशिकांत जत मध्ये माझ्या कडे आला .भाऊ ,मी  मासिक तयार केलेय ! बघ ,तू  चित्रकार आहेस यामध्ये आणखी काय करावं ! तू सांग मला माझ्या भावाचा अभिमान वाटायचा ! या  प्रकाशन साठी लागणारा पैसा त्याच्याकडे कमी प्रमाणात होता. पण जिद्द ही आकाश एवढी होती . निधी गोळा करणे ,लेख गोळा करणे ,छपाईला  पाठविणे ,आणि अंक तयार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कसा पोहोचेल .ह्यासाठी तो दक्षता  स्वतःच घेत असे. या अंकामध्ये तो प्रत्येक वेळी मराठी माणसाची, उद्योगधंद्याविषयी हे खास लेख तयार करत असे .हा लेख अभ्यासपूर्ण असायचा ज्या उद्योजकाला आपला लेख ,आपली माहिती स्वाभिमानी उद्योजक या मासिकात  आली की  त्याला खूप आनंद वाटायचं ! स्वाभिमानी उद्योजक मासिक सुरू केल्यापासून त्याला आर्थिक टंचाई बसू लागली. तेव्हा मी त्याला आयडिया दिली .शशिकांत ,तू असं कर या अंकाचे मासिक ,वार्षिक असे सभासद निर्माण कर ,त्या कडून  वर्गणी घे.   या अंकाला कायमस्वरूपी निधी मिळेल .ही आयडिया त्याला आवडली! आणि त्यानं  त्याप्रमाणे  शंभरच्या वरती स्वाभिमानी उद्योजक मासिकाचे सदस्य निर्माण केले .हा अंक प्रसिद्ध  दिल्यानंतर महाराष्ट्रातील माननीय श्री . शरद पवार , साहेब,  ज्येष्ठ वकील उज्वल निकम साहेब, साहित्यिक यांच्याकडे तो अंक भेट म्हणून देत असे! त्याची धडपड खूप मोठी होती. एखादा अंक काढायचा झालं तर त्यासाठी पैसा आणि मनुष्यबळाची गरज लागत होती .तो स्वतः विविध वह्या, पुस्तके,  स्टेशनरी साहित्य  मुख्य एजंट म्हणून काम करत होता. ज्यावेळी साहित्य विक्रीसाठी जात असे त्यावेळी  तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तो ह्या अंकाची प्रसिद्धी करीत असे. त्याच्या जिद्दीला माझा सलाम !
प्रत्येक वेळी आपण ज्या समाजात जन्म घेतलाय! त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे , ह्यासाठी त्याची नेहमी धडपड असे !शिंदे पाटील हे नाव लावायला पाहिजेल ! असा तो मला म्हणायचा कारण मी नेहमी मी श्री. सुभाष शिंदे असं लावतो .तो म्हणायचा भाऊ तसं नाही तू श्री सुभाष शिंदे पाटील असं नाव लाव .शिंदे समाज यासाठी जिल्हा, राज्य ,राष्ट्र पातळीवर त्यानं भरीव कार्य केलं आहे . त्यासाठी शिंदेशाही ! नाव  देशभर होत होते .सांगली जिल्ह्यामध्ये तालुका :जत मध्ये वाळेखिंडी या गावांमध्ये शिंदेशाही भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या गावांमध्ये शिंदे समाज जास्त प्रमाणात  गावांमध्ये  घरे आहेत .शिंदे शाही मेळावा आहे. तू  सहभागी प्रतिनिधी  म्हणून दि. ११ जानेवारी २०२० रोजी हा मेळावा होता. त्यांच्या आधी मी बुधगाव येथे आल्यानंतर त्याने मला सांगितलं भाऊ ही पत्रिका! घे आणि  शिंदेशाही या मेळाव्यसाठी नक्कीच ये!शिंदे समाजातील सर्व मोठी प्रतिष्ठीत व्यक्ती येणार आहेत. तू उपस्थित राहायलाच पाहिजेल .मला आनंद वाटला एवढा मोठा मेळावा आयोजित केला आहे . मी  नक्कीच  उपस्थित राहणार! त्या भव्य मेळाव्यास उपस्थित होतो . जत तालुक्यातील वाळेखिंडी या गावांमध्ये भव्य सभामंडप  हा समारंभ चालू होता. त्या गावांमध्ये शिंदेशाही  वैभव बघायला मिळालं ! मी  मागे बसलो होतो .मी पुढे बघत होतो .शशिकांत कुठे आहे ? आणि  तो बघत होता .भाऊ कुठे बसलाय? पण आमच्या दोघांची भेट झाली नव्हती. एवढ्यात  शशिकांत चा फोन आला. तू मेळाव्यास आला का नाहीस ? मी म्हणालो ,अरे मी मागे  बसलोय कुठे सांग मंडपाच्या अगदी शेवटी बसलोय . तो मागे  आला आणि मला घेऊन सभा मंडपाच्या पुढील खुर्चीवर मला बसवलं .आणि तेथील लोकांना सांगितलं हा माझा भाऊ आहे .शिक्षक आहे ,चित्रकार आहे. सामाजिक कार्यकर्ता आहे. एखाद्या माणसाला मोठेपणा द्यायचं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजेल .प्रत्येक वेळी विविध संकल्पना मला सांगत होता. भाऊ असं करूया ,भाऊ तसं करूया ! मनात जिद्द होती .पण आर्थिक बाजू कमी होती!
शिंदेशाही मेळाव्यात शशिकांत यांने मला पहिल्या रांगेत बसविले आणि आपल्या भावना सन्मान दिला.
  माझ्या भाऊ आज जगात नाही. त्यांच्या मनात जिद्द, समाज बांधवांना काम करण्याची इच्छा!
माझ्या पुतण्या आदित्य! याविषयी माझं लक्ष्य असेल! 
पून्हा एकदा चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
          तुझा भाऊ 
         सुभाष 

Comments