कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मा.श्री.होवाळे अजितकुमार बजरंग यांच्या सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. होवाळे अजितकुमार बजरंग सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
शुक्रवार,दिनांक,३१ मे २०२४ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आ .ढावा ‌.....
💐     श्री.सुभाष  शिंदे,संपादक, एस.आर्टस् न्यूज 
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बालपण:-  श्री.होवाळे  सरांचा जन्म आजोळी  मिरज येथे झाला. सरांचे मूळ गाव भोसे तालुका - मिरज जिल्हा- सांगली आहे . वडिलांच्या नोकरी   निमित्त मुंबई  असल्याने   सरांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे झाले. वडिलांच्या सेवा संपल्यानंतर पुन्हा भोसे आले. त्यामुळे  सरांचे माध्यमिक शिक्षण मूळगावी  भोसे येथे झाले. इयत्ता नववी ते दहावी शिक्षण सांगली येथे झाले .  ज्युनिअर कॉलेज  शिक्षण इयत्ता -अकरावी व इयत्ता -बारावी शिक्षण शांतिनिकेतन, सांगली येथे झाले .काही कारणा निमित्त सीनियर कॉलेज बंद पडल्यानंतर त्यांनी बी .ए .पर्यंत शिक्षण सांगली येथे  घेतले. .एम ए चे शिक्षण  विलिंडन कॉलेज सांगली येथे झाले . शिक्षण घेत असताना गावातून सांगलीमध्ये येत असताना  एसटी जात असतं , पास संपल्यानंतर सरांना काही  वेळा सायकल ने प्रवास    करावा लागे.  आर्थिक  परिस्थितीचे  भान  मनात असायचं.  पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर येथे सन -१९९१ साली   बीएड पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूर येथे  दि.८ जून १९९१ शांती प्रकाश स्कूल मध्ये साडेतीन  वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.  '                             त्यानंतर सन -१९९४ज्ञसाली  श्री . होवाळे सरांच्या  जीवनामध्ये अनेक  सुवर्ण संधी आल्या  हिंदुस्तान पेट्रोलियम  भोपाळ येथे राष्ट्रभाषा संभाषण हा पोस्ट साठी संधी त्यांना आली .   पण  त्या संधीचा फायदा घेता आला नाही.  एकाच  ठिकाणी काम करावं लागणार होतं.बदली होणार  नव्हती.  सर ,एकटे असल्यामुळे आई-वडिलांची सेवा किंवा  बरं वाईट झालं तर लक्ष कोण देणार?  हे त्यांच्या मामानी सांगितले की आपल्याला येथेच कोणती तरी नोकरी कर !सरांनी साऱ्या गोष्टींचा विचार करून.  त्यांनी ही संधी सोडून दिली.
तत्कालीन  कोल्हापूर चे शिक्षणाधिकारी मा.श्री. सदामते साहेब यांचे श्री.होवाळे सरांना  लाभले.. त्यांच्या मार्गदर्शनाचा सरांना खूप फायदा झाला. त्यामुळे सर  नेहमी आभार मानतात. 
सन -  १९९४ साली स्पर्धा परीक्षा दिली.त्या सुयशानंतर  त्यांना  शिक्षणाधिकारी पदाची संधी प्राप्त  झाली होती. पण त्यासाठी काही गोष्टींची  अडचण आल्यामुळे  त्यांनी ती  आलेली संधी सोडली. पुन्हा रिझर्व्ह बँकेत  राष्ट्रभाषा  ट्रान्सलेशन म्हणून संधी मिळाली होती.काही करण्यामुळे ती हुकली.                                दि.१७ डिसेंबर  रोजी त्यांना एम्प्लॉयमेंट ऑफिस सांगली द्वारे जत  येथे नोकरी साठी कॉल आला.आणि मा.शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने  जतला मुलाखत देण्यासाठी 
जत येथे  जत हायस्कूल,जत मध्ये  पोहचले.त्यावेळी  मुलाखत देण्यासाठी तीनशे पेक्षा जास्त शिक्षक ,शिक्षिका  उपस्थित होते. प्रथम लेखी पेपर देण्यात आला .त्यानंतर मुलाखती झाल्या. सरांची मुलाखत घेणारे संस्थाचालक व मुख्याध्यापक होते. .त्यावेळी न्यु. इंग्लिश स्कूल मुचंडी चे मुख्याध्यापक हे  पण माझ्या  विषयाचे होते.  त्यांनी अभ्यासक्रमावरील प्रश्न विचारले  व सरांना अचूक उत्तर दिले , मुलाखत  पण झाली .  सांगितल्याप्रमाणे  पेपर व मुलाखत देऊन  सर, गावी जाण्यासाठी एसटी स्टॉप वर जाऊन थांबले. . तेवढ्यात  शाळेचे सेवक खिलारे, मोना आले. त्यांनी त्यांनी  सांगितलं  की डॉ . श्रीपाद जोशी सरांनी तुम्हांला अर्जंट बोलवलं आहे . तुम्ही   लवकरात ,लवकर शाळेकडे चला!  शाळेत आल्यानंतर मला सांगण्यात आलं होतं . तुम्हांला नोकरी मिळाली आहे .   पुढील सर्व  कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून हजर व्हा!. श्री. होवाळे सरांच्या  जत तालुक्यात नोकरीची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल ,कुंभारी ता.जत येथे झाली.नंतर न्यु इंग्लिश स्कूल,मुचंडी येथे सहा वर्षे व न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ  येथे  एक  वर्ष पर्यवेक्षक म्हणून कामकाज पाहिले.
त्यानंतर जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत. येथे मुख्याध्यापक पदी साडेतीन वर्षे विराजमान झाले.
श्री. होवाळे सरांनी प्रत्येक शाखेत  सेवेच्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटलेला  आहे. त्यांनी प्रत्येक सेवा करताना पालक बंधू-भगिनींचे सहकार्य घेऊन  उल्लेखिनीय  कार्य केले आहे.  करोना काळात  त्यांनी केलेल्या कार्याची नोंद शासकीय पातळीवर  घेण्यात आली. सांगली जिल्हा परिषद चे सीओ साहेबांनी फोन द्वारे अभिनंदन केले आहे. करोना काळात राज्यात संपूर्ण शाळा बंद होत्या. सरांनी जत हायस्कूल , जत शाळा भरवली . सर्व आरोग्याचं नियमांचे पालन करून , पालक बंधू-भगिनींचे सहकार्य घेऊन,
 राज्यात आमची शाळा !जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत  हे मानाने सांगावं लागेल!
आमची शाळा कोरोना कालखंडामध्ये सुरू असताना जत तालुक्यातील विविध शाळा बंद होत्या. विविध शाळेचे शिक्षक आम्हांला विरोध करत होते आणि पालकांना सांगायचे तुमच्या मुलांना काही झाल्यास जबाबदार कोण ? त्यावेळी पालक श्री .होवाळे सर यांच्याकडे यायचे आमच्या मुलाला कमी जास्त झाल्यास जबाबदार  कोण ?श्री. होवाळे सर पटकन सांगायचे मी जबाबदार आहे. सुदैवाने कोरोना कालखंडामध्ये आम्ही शाळा भरवली पण विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग  यांना कोणालाही काही झालं नाही .सांगली जिल्हा परिषद, सांगली  अधिकारी  येऊन  त्यांनी पाहिलं येथे सर्व व्यवस्थित, नियमानुसार आहे .शाळा सुरू ठेवा असं त्यांनी सांगितले . 
संस्थेचे चेअरमन ऐनापुरे साहेबांची  एक इच्छा होती. संस्थेचा ,शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात यावा. यासाठी ते नेहमी श्री. होवाळे सर यांच्याकडे विचाराचे ....   होवाळे सरांनी  त्यांना सांगितले. काका ! संस्थेचा व शाळेचा सुवर्ण महोत्सव  समारंभ मोठ्या दिमाखात होणार आणि मी करणार आहे .त्याप्रमाणे मा. मुख्याध्यापक श्री. होवाळे सर यांनी करून दाखवलं ! दुःखाची गोष्ट एक   गोष्ट  की हा कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या संस्थेचे चेअरमन ऐनापुरे साहेब आमच्या   मध्ये नव्हते . त्यांचा आशीर्वाद आमच्या जवळ होता.                                                   संस्था व शाळा चा सुवर्ण महोत्सवी तयारी करताना :   पालक बंधू-भगिनी यांना विनंती पालू सभा घेऊन केली.  संस्था व शाळा याचा अमृत महोत्सव समारंभ करायचा आहे. एक रुपया पासून 500 /- रुपया पर्यंत आपण  कितीही मदत करू शकता. पालकसभेमध्ये सर्वांना विनंती  सरांनी  केली.त्याप्रमाणे पालक बंधू भगिनी यांनी सहकार्य केले. सहकार्य केल्यानंतर  एकूण 22 लाख रुपये संस्थेच्या खात्यात जमा झाले .मग संस्थेला जाणीव झाली की मुख्याध्यापक व शिक्षक हा समारंभ शंभर टक्के करतील .  त्यांच्यामुळे  आशा निर्माण झाल्यामुळे संस्थेने सांगितलं तुम्ही कामाला लागा .आपण    संस्था व  शाळेचा  सुवर्ण महोत्सव  समारंभ मोठ्या दिमागत करू  या!                                                          मा. मुख्याध्यापकांनी जुनी इमारत दुरुस्त करून दुरुस्त करून रंगरंगोटी करून त्या कामाची सुरुवात केली .शाळेमध्ये विविध खाती निर्माण करून वेगवेगळी कामे  शिक्षक करू लागले. कामाला गती येत होती.  प्रत्येक जण प्रत्येक जण हा समारंभ आपलाच आहे .असं म्हणुन कामकाज करीत होता शाळेचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी , माजी  शिक्षक ,शिक्षिका मुख्याध्यापक यांना ऑनलाइन द्वारे त्यांना निवेदन पाठवली गेली . त्याप्रमाणे माझी माजी विद्यार्थी राज्यातून ,देशातून व परदेशातून आपल्या शाळेकडे येण्यासाठी तयार झाले .शाळेचा अमृत महोत्सव अंक तयार करण्यासाठी विविध लेख , कविता जत मधला रजिस्टर मधला पहिला विद्यार्थी माळी याने तर  लेख बरोबर सहकुटुंब समारंभाला येणार आहे . असं त्यांनी सांगितलं !शाळेच्या आठवणी ,संस्थेच्या आठवणी ह्या  भव्य  फ्रेंडस् मेळावा ! जत  हायस्कूल,जत च्या पटांगणवर संपन्न झाला.
 काही माजी  विद्यार्थी ,विद्यार्थिनीं शुद्ध पाणी मिळावे म्हणून   सुजल शुद्ध पाणीचे यंत्र भेट देऊन विद्यार्थी ,विद्यार्थिनींना शद्ध पाण्याची सोय  केली.
हा समारंभ दोन दिवस संपन्न झाला. यामध्ये  सर्व संस्थाचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  खासदार संजय काका पाटील,मा. ना. श्री.सुरेश भाऊ खाडे, जतचे आमदार मा. श्री. विक्रमसिंह दादा सावंत यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत  समारंभ संपन्न झाला.
दुसऱ्या दिवशी संस्थेचे माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षिका,मान्यवर व जत  हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स,जत  मधील सर्व शिक्षक. शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुरेख आवाजात गीते भावगीते सादर केली.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री हिवाळ सर
 यांनी केले. 
शाळेची सुसज्ज इमारत ,वर्गखोली ,शिक्षक खोली, शिक्षिका खोली ,ह्या आत्या आधुनिकीकरण करून जत मध्ये शिक्षणासाठी नवे पर्व सुरू झाले.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी सर्व सोयींनी युक्त असे भव्य स्वच्छतागृह उभारले. सर्वांची सोय केली. 
श्री होवाळे सर यांच्या कार्यादीमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका यांना गणवेश परिधान करायचा नियम झाला.
शाळा , कार्यालय नोंद,सर्व  प्रकाराचे निकाल नोंदी,  रजिस्टर ,दाखले  याचे ऑनलाईन  करण्यात आले.
 श्री. होवाळे सरांनी शाळा अत्याधुनिक करून शाळेला एका नव्या वळणावर आणून ...!
 सर, सेवानिवृत्त होत आहेत .त्यांनी थोड्या कालावधीमध्ये उल्लेखनीय   कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा  दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत  व सरांनी   केलेल्या  कार्याचा  ठसा विविध शाखांमध्ये आपणास पहावयास मिळेल.मा.श्री.अजितकुमार बजरंग होवाळे यांच्या दि फ्रेंडस्  असोसिएशन, जत मध्ये
२९  वर्ष ९ महिने सेवा झाली आहे. या सेवेला सलाम  !
   माननीय श्री .होवाळे सर  यांच्या सेवानिवृत्ती नंतर चे आनंददायी, सुखदायी, आरोग्यदायी जावो!                                              ‌.              सौ . होवाळे वहिनी , कन्या सोनु   यांची साथ महत्वाची आहे. मा. श्री. होवाळे सर सेवानिवृत्ती नंतरच्या जिवनात आनंदमय होवो. ही ईश्वरचरणी !

Comments