सेवेची सुरूवात जत मधून मूक बधिर विद्यालय,जत मध्ये..... कलाशिक्षक!
सेवेची सुरूवात जत मधून..
मूक बधिर विद्यालय जत मध्ये कलाशिक्षक म्हणून........!
-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
कलाविश्व महाविद्यालय , सांगली येथे इंटरमिजीएट डिप्लोमा ( सन-१९८८) या वर्गात प्रवेश घेतला होता. कलाशिक्षक ए्.टी.डी. पदविका माझ्या कडे होती. शिक्षण सुरू होते.त्यासाठी खर्च खुप होता.
काॅलेज करून रात्री चे दैनिक केसरी कला विभागात काम करीत होतो.
शांतिनिकेतन येथील सौ.पाटील मॅडम यांनी बोलविले. जत ला एक नोकरी आहे. मूक बधिर मुलांची शाळा असून त्याला मान्यता आहे.पगार लवकरच सुरू होईल.तुम्हांला,
नाट्य, अभिनय, कलेची आवड आहे.असे पाटील मॅडम यांनी सांगितले.मी त्यांना सांगितले दोन ते तीन दिवसात सांगतो. म्हणून निघून गेलो.
मी आज अखेर माझं गाव , तालुका सोडून कोठेही गेलो नव्हतो. माझ्या आई, वडिलांना सांगितले.पण आईच्या डोळ्यात अश्रू आले.माझं पोरंकाच कसं होईल? आई चे अश्रू ने मलाही खूप वाईट वाटले.... पण वडिलांनी सांगितले तुझ्या मनात आहे. तसं कर पण... पैशाची नियोजन तुला करावे लागेल. घरात पाच ,सहा माणसं आहेत.
मी दोन विचार करीत होतो.माझ्या मित्रांचा सल्ला घेत होतो.
तेवढ्यात शासनाची एड्स दिनानिमित्त जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धा होती. बक्षीसे मोठी होती.मी स्पर्धेत सहभागी झालो. दुसऱ्या दिवशी दैनिक केसरी मध्ये पोस्टर स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक एक हजार रूपये, प्रमाणपत्र मिळणार जाहीर झाले. दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ झाल्यावर मी घरी आलो.आणि सांगितले मी जत जाणार आहे.
वडिलांनी तुला प्रवासाला जाण्यासाठी माझ्या कडे पैसे नाहीत.मला बक्षीस एक हजार मिळाले आहेत.त्यामधील पैसे मी तुम्हांला देणार आहे. हे ऐकल्यावर वडिलांच्या डोळ्यात पाणी आले.जीवनात काही क्षण येतात आणि योग्य संदेश देऊन जातात हेच खरे!
मी जाण्याची तयारी सुरू केली. एस.टी.चा मार्ग, पैसे माहिती घेतली.आणि प्रवासाला सुरुवात झाली.मनात अनेक प्रश्न आणि जत गेल्यावर आपले कोणीही ओळखीचे नाही.आज अखेर जत केंव्हा ही गेलो नव्हतो. कन्नड भाषा माहिती होती.ती बोलतात याची जाणीव एसटीत बसल्यावर झाली. चार तासांच्या प्रवासानंतर जत स्टॅण्ड वरती एस टी आली.तेव्हा सायंकाळी -६वाजले. शाळा केव्हाच बंद झाली होती. आता जत रात्र कुठे काढायची ? निवारा शोधू लागलो. एक हमाल आला साहेब येथे बामणे लाॅज आहे. कमीतकमी पैसाच सोय होते.
मी बामणे लाॅज वरती एक रात्रीच्या मुक्कामासाठी माहिती घेतली.त्याचे पैसे मला जरा जास्तच वाटले. मी परत एसटी स्टँडवर आलो.तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. श्री.दत्त मंदिर जवळ पिण्याच्या पाण्याची सोय होती.हात पाय धुऊन मंदिराजवळ जेवण केले. आणि तेथे बसलो.
माझ्या जीवनातील सेवेचा प्रारंभ सुरू होता ! क्षणाक्षणाला प्रश्न निर्माण होत होते. त्यावेळी मोबाईल नव्हते बुधगाव येताना सांगुन आलो होतो.वेळ झाला तर मुक्काम करून उद्या येतो. रात्र झाली होती.एसटी स्टॅण्ड गर्दी कमी झाली. मंदिराच्या आवारात लाईट होती.तेथे जेवण केले.श्री दत्त मंदिरात विश्रांती घेतली. कशी तरी झोप लागली. सकाळी उठल्यावर सर्व काही आवरले.
सकाळी श्री.दत्त मंदिरात मनात म्हणालो श्री दत्त महाराज आज रोजी मला जत मध्ये कोणीही ओळखीचे चेहरे,माणसे नाहीत.
जर मला नोकरी लागली तर जत नाहीतर जत तालुका माझा मित्र असेल.असे मी श्रीदत्त मंदिरात बोललो.आणि मुलाखत देण्यास मुक बधीर विद्यालय,जत कडे रवाना झालो.
Comments
Post a Comment