जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत मध्ये शैक्षणिक कार्य: कलेचा कलाप्रवास....!
-श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक
पूर्वी चित्रकला नंतर कला विषय झाला. चित्रकला विषय कला झालि.चित्र ,शिल्प, नृत्य, नाट्य,गायन,वादन या विषयाचा समावेश झाला. याविषयी कलाशिक्षक बंधू आणि भगिनींनी यांनी विविध मते मांडली .मला हा या विषयांमध्ये आनंद वाटला. वरील सर्व विषयांची आवड होती. मला आनंद वाटायचा ! माझ्या सारख्या कलावंताला ऱंगमच मिळाला असे वाटू लागले.
आमची शाळा सकाळी ११.३० वाजता सुरू होत असे .
मी तर १०वाजता शाळेत हजर होणार!
माझी पहिली दोन वर्षे कला ची आवड निर्माण व याचे महत्त्व सांगताना मी रेखाटन , रंगकाम चे प्रात्यक्षिक याकडे विशेष लक्ष दिले.
शाळेत गेल्यावर फलक लेखन करीत असे !
कलेविषयी आवड, चित्रकला विषयांचं महत्त्व, ज्ञान, रेखाटन चार सराव, रंगकाम प्रात्यक्षिक, यावरती सर्व वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनीचा सराव घेत होतो .
त्याप्रमाणे मला यश येत होते. आता मी पुढील पाऊल उचले , जत मध्ये त्यावेळी चित्रकला याविषयी साहित्य मिळत नसे .मी बुधगाव चा कलाशिक्षक मित्र संजय नलवडे सर आणि मी (श्री. सुभाष शिंदे) जत येथील स्टेशनरी दुकानात जाऊन त्यांना रंग,ब्रश, पेन्सिल, ऑईल पेस्टल विविध कागद त्यांना साहित्य दाखविणार हे साहित्य तुमच्या दुकानात ठेवा, दुकानदार म्हणाले हे साहित्य नाही घेतले तर आम्ही काय करायचं? मुलांना अजून साहित्याची ओळख नाही आम्ही दोघे कला शिक्षकांनी याची जबाबदारी घेतली. 50% साहित्य जाईल असे आश्वासन दिले. अशी विनंती केली आणि शाळेमध्ये आम्ही मुलांना चित्राचे साहित्य आणण्याची विनंती केली. अशा तऱ्हेने जत शहरामध्ये चित्रकलेचे विविध साहित्य उपलब्ध होऊ लागलं. त्यामुळे आम्ही त्यांना विविध माध्यमातून चित्र कसे रेखाटन, रंगकाम करायचे याची माहिती दिली .मुलांना चित्रकलेमध्ये अनेक विषय ,एवढे प्रकार असतात. हे त्यांना माहीती झालं . हळूहळू पालकांना सुद्धा याची माहिती होऊ लागली .पालक पण आता साहित्य खरेदी करण्यासाठी पुढे येऊ लागले. साहित्य मिळाल्यानंतर आम्ही विविध माध्यमातून कसं काम करायचं याचे प्रात्यक्षिक मी वर्गामध्ये दाखवलं ! आणि त्याप्रमाणे मुलेही काम करू लागली. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये सुद्धा आपणास काही तरी करता येतं! याची जाणीव विद्यार्थ्याबरोबर ,पालकांना झाली. पुढे विद्यार्थ्यांच्या कलाकृती सुंदर, मनोहर कला निर्मिती करू लागली. मी ठरवलं आता आपल्या विद्यार्थी ,विद्यार्थिनीना स्पर्धेसाठी पूर्वी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या जायच्या मुले स्पर्धेमध्ये भाग घ्यायची पण त्यांना बाह्य जिल्हा तालुका यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनीना कशी चित्रे काढतात. त्यांची माहिती नव्हती. मी जिल्ह्यामध्ये चित्रकला स्पर्धेला मुलं घेऊन जात होतं ! त्यामध्ये एक असा फायदा झाला की, मुलांना आपली चित्रकला , कलाकृती कशी आहे. याची कल्पना आली. मी मिरज येथे कृष्णा व्हॅली येथे चित्रकला स्पर्धेसाठी दहा विद्यार्थी, विद्यार्थ्यिनींना घेऊन गेलो . चित्रकला स्पर्धेमध्ये माझी मुलं सहभागी झाली .त्यांनी पण सुंदर चित्रे काढली. या स्पर्धेत आमच्या जत हायस्कूल, जत मधील कुमारी निटवे हीचा पहिला क्रमांक आला. आणि बाकीच्या नव विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली .म्हणजे मला आनंद झाला. माझी मुलं जिल्ह्यामध्ये सुद्धा चित्रकलेमध्ये बक्षिसे मिळू शकतात .मी त्यानंतर कोणतीही चित्रकला स्पर्धा असू दे ! या स्पर्धेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असायचा ! नुसता सहभाग नाही, तर क्रमांक प्राप्त करायचे! या स्पर्धेमुळे शाळेमध्ये विद्यार्थी ,विद्यार्थिनींमध्ये कलेची आवड मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आपल्याला बक्षिस मिळते . वृत्तपत्र नाव येतेय म्हणाल्यायावर पालक सुद्धा खुश झाले ! त्यानंतर कोणत्याही पालकाने ज्या संकल्पना मी मांडल्या त्याला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे जागतिक पातळीवरची ड्रॉइंग स्पर्धा आली होती. मी विद्यार्थ्यांना सहज म्हटलं परदेशी चित्रकला स्पर्धेत आपण सहभागी व्हायचं का ? मुलं म्हणाले सर ! प्रयत्न करूया कारण त्याला फी होती. पाठवण्याचा खर्च होता .बघा म्हटलं पालकांना विचाराण्यात आलं पाच चित्र गोळा केली. विशिष्ट प्रकारचे माउंटिंग , करून त्या पाठीमागे संपूर्ण इंग्रजीमध्ये माहिती लिहून घेतली .चित्रे पोस्टाने पाठविण्यात आली. मुले विचारायचे सर निकाल केंव्हा ? कारण शालेय, जिल्हा , तालुका या स्पर्धेत झाल्या की निकाल पाच ते सहा दिवसात लागायचा .पण ही परदेशी चित्रकला स्पर्धेला चित्रे पाठवल्यामुळे त्याचा दिनांक ,वार मला सांगता येत नव्हता .मुळात मलाच भीती होती .ही चित्र आपण पाठवली आहेत. पण क्रमांक येईल का यावर माझ्या मनात शंका येत होती .काही दिवस गेली मुले मला विचारले नाहीत. जवळजवळ आम्ही परदेशी चित्रकला स्पर्धा विशेषी विसरलो होतो. मी नेहमीप्रमाणे शनिवारी, रविवारी बुधगावला येत असे . त्या दिवशी शनिवारी रजा काढून मी बुधगावला आलो होतो .सोमवार नेहमीप्रमाणे मी जतला येत होतो . जत मध्ये एसटी आली. माझे शाळेतील मुलं थांबली होती .मी खिडकीतून बघत होतो . मी सरळ उतरलो . उतरल्यानंतर आमच्या शाळेची मुले माझ्याकडे आली .
सर तुम्ही पेपर वाचला का? मी म्नाहणालो हा घ्या पेपर आणि आपण परदेशी पाठवलेली चित्रांपैकी महेश चव्हाण या विद्यार्थ्यांची चित्रांची निवड जागतिक स्पर्धेसाठी झाली. पेपर वाचल्यावर ,खरंच माझ्या विद्यार्थ्यांचा फोटो व बातमी त्यामध्ये होती. त्याचा मला आनंद वाटला .आपण केलेली गोष्ट बरोबर होती . भाजी विकणारा चव्हाण मावशीचा मुलगा ड्रॉइंग स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर चित्रांची निवड झालेली आहे. हा क्षण खरंच मला आनंद देऊन गेला ! शासकीय रेखाकला परीक्षा पूर्वी कमी विद्यार्थी, विद्यार्थिनी बसायचे ,पण मी आल्यापासून शासकीय रेखाखला परीक्षांमध्ये ज्यादा बसविले . एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षा, इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा मध्ये २०० च्या वरती विद्यार्थी बसतात. आज अखेर शाळेचा निकाल नव्वद ते शंभर टक्के निकाल परंपरा आहे . शासकीय रेखाकला परीक्षा उप मुल्यमापन केंद्र सांगली येथे प्रथम परीक्षक, समालोचक , डी.सी.एम .अशा पदावर कामकाज केले आहे. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र जत मध्ये सुद्धा ग्रामीण भागातील शाळा न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स कुंभारी येथील विद्यार्थी , विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जत तालुक्यातील शासकीय रेखाकला परीक्षा साठी प्रबोधन करून जत केंद्रात जास्त विद्यार्थी,विद्यार्थिनी सहभागी होतील यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यासाठी विशेष जादा तास घेऊन मार्गदर्शन केले .
कला / चित्रकला या विषयातील विविध उपक्रम:
माझ्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये 80 ते 90 टक्के विद्यार्थी चित्रकला विषयांमध्ये उत्कृष्ट आहेत. विविध स्पर्धेमध्ये सहभागी होतात . पारितोषिके मिळवतात . त्याचा मला अभिमान आहे .गेले तीस ते पस्तीस वर्ष अध्यापन कार्य करत असताना, माझे सहा माजी विद्यार्थी , विद्यार्थ्यिनी सध्या कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत .जत तालुक्यामध्ये बिळुर श्री. गुरु बश्वेवर हायस्कूल चे कलाशिक्षक श्री . सुधीर हुबाळे माझा माजी विद्यार्थी आहे . कला मुलांना शिकवले . त्यांचा मला अभिमान आहे .कुमारी पवार ,कुमारी मोरे या विद्यार्थिनी सुद्धा सध्या कलाशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
प्रत्येक वर्षी शाळेमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी स्नेहसंमेलन दिवशी प्रत्येक वर्षी मी विद्यार्थी, विद्यार्थिनी , व्यक्तीगत, किंवा वेगळंपण म्हणून पालक बंधू-भगिनी यांच्यापैकी एकाच
प्रदर्शन हे प्रत्येक वेळी भरविण्यात येते. यामध्ये , शैक्षणिक , सामाजिक विषयावर रांगोळी प्रदर्शन , मेहंदी प्रदर्शन , पोस्टर प्रदर्शन , चित्रकला प्रदर्शन अशा विविध विषयांवर प्रदर्शन भरविण्यात आली आहेत.
दैनिक तरुण भारत ,दैनिक केसरी ,दैनिक पुढारी या विविध चित्रकला /कला विभागात दैनिकातून माझ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत .शिवाय बालकुमार चित्रकला स्पर्धेमध्ये माझ्या शाळेतील दोनशे ते चारशे विद्यार्थी ,विद्यार्थिनींनी सहभागी होतात. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुयश प्राप्त करतात .
सैनिकांना रक्षाबंधन दिवशी राख्या तयार करून पाठवण्याचा उपक्रम , शुभेच्छा संदेश देण्यासाठी अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनीचा सहभाग लाख मोलाचा वाटतो.
पालक बंधू-भगिनी साठी विविध स्पर्धा गायन, चित्र, पाक कला ,मेंदी कला अशा विविध स्पर्धा घेऊन पालकांना सुद्धा आपल्या मुलांच्या शाळेमध्ये आपले कला गुण दाखविण्याची संधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आमच्या कला विभागाने आणि मा. मुख्याध्यापक च्या प्रेरणेने साध्य झाला आहे याचा मला अभिमान आहे.
चित्रकला स्पर्धा: सुरूवातीला विद्यार्थी, विद्यार्थ्यिनी सहभागी बाबत खूप त्रास व्हायचा. आता मात्र गोष्ट वेगळी आहे.बस ...बस असं म्हणावे लागते. आता चित्र बदललेलं आहे. नुसतं चित्रकला स्पर्धा म्हणले की सर्वच वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनीचा सहभाग स्पर्धेत असतो. एकदा एक प्रयोग मुख्याध्यापकांनी केला. प्रार्थना झाली उद्या चित्रकला स्पर्धा आहेत .पाचवी ते सातवी किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांनी हात वर करा ! असं म्हणताना..... तोच सर्वच विद्यार्थ्यांनी हात वर केला. म्हणजेच चित्रकला हा विषय जत हायस्कूल , जत मध्ये किती रुजला आहे . याचि मला अभिमान आहे! मला वाटतं दीड वर्षांमध्ये मी सेवानिवृत्त होणार आहे .त्यावेळेला जत हायस्कूल,जत मध्ये चित्रकला हा विषय यशाच्या शिखरावर असेल याचा मला अभिमान आहे ! आम्ही प्रत्येक वर्षी एक हस्तलिखित तयार करतो .त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनीचे लेख ,कविता ,विनोद आणि सुंदर चित्र तयार करून घेतो . मला आठवतंय वृक्षमित्र मोहिते साहेबांनी सामाजिक वनीकरण यांच्यातर्फे जिल्हास्तरीय हस्तलिखित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला पाहिजेल त्या वेळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीपाद जोशी साहेबांनी सांगितलं शिक्षक ,विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि मी या स्पर्धेत सहभागी व्हा. निसर्ग हस्तलिखित अंक तयार करण्यात आला. यामध्ये प्रत्येक पानावर रेखाटन, चित्रे व सुंदर मुखपृष्ठ मी (श्री . सुभाष शिंदे,कलाशिक्षक)तयार केले. त्यावेळी चा आदर्श विद्यार्थी अमोल जोशी याने लेखन, शिर्षक लेखन यासाठी काम पाहिले .रात्री आठ वाजेपर्यंत काम केले. हस्तलिखित तयार करायला प्रयत्न करत होतो . निसर्ग हस्तलिखित तयार झाले . सामाजिक वनीकरण सांगली कार्यालयामध्ये मी स्वतः निसर्ग हस्तलिखित देण्यासाठी गेलो. त्यावेळी वृक्षमित्र मोहिते साहेब तेथे हजर होते. त्यांनी मला पाहिले मी त्यांना नमस्कार केला. सर , कुठून आला या... मी जत हून जत हायस्कूल,जत शाळेतुन आलो आहे. म्हटल्यानंतर त्याला आनंद वाटला .कारण पहिले हस्तलिखित जत म्हटल्यावर त्यांना आनंद झाला . ते म्हणाले हस्तलिखित दाखवा मी त्यांना निसर्ग हस्तलिखित दिलं ! मुखपृष्ठ बघताच मा.श्री.मोहिते साहेब यांना आनंद झाला. वा....वा.... सुंदरच ! त्यांनी एक एक करत त्या हस्तलिखिताचे १५० पाने बघितलेली .सर ! तुमचा अभिनंदन गोड बातमी आम्ही तुम्हालाही लवकरच कळविण्यात येईल असं सांगितलं मला खूप आनंद झाला. आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. मा.मुख्याध्यापकांना सांगितलं सर जमा केलं आहे. पुढील आठवड्यामध्येच समाजकारण पत्र मा. मुख्याध्यापक आलं आणि त्या पत्रामध्ये पहिल्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस जत हायस्कूल ,जत ला या निसर्ग हस्तलिख मिळालं आहे .असे जाहीर केलं. मुखपृष्ठ चित्रे रेखाटन यासाठी श्री . सुभाष शिंदे , कलाशिक्षक यांना पुरस्कार झाला आहे .आणि लेखन , शिर्षक लेखन यासाठी विद्यार्थी श्री .अमोल जोशी यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. हे पत्र आलेले बघून मुख्याध्यापकांनी स्टेजवर आमचा सत्कार केला. मला खूप बरं वाटलं दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रा मध्ये बातमी आली अशा तऱ्हेने कलेचा विकास कलेचा विकास होत होता विविध स्पर्धेमध्ये यश मिळत होतं यासाठी मी सदैव प्रयत्न करीत होतो.मला आता माहीत झालं होतं तर प्रत्येक वर्गामध्ये कलेमध्ये अतिसुंदर किती विद्यार्थी आहेत . माहिती होतं कोणतीही स्पर्धा असेल तर प्रत्येक वर्गातील दोन दोन विद्यार्थी घेऊन जायचं यश मिळणार याची मला शंभर टक्के आत्मविश्वास होता. यातून माझ्या शाळेला भरघोस बक्षिसे मिळाली. विद्यार्थी, विद्यर्थ्यिनी घ्या मनात कलेची ज्योत प्रज्वलित करण्यात मी यशस्वी झालो.
कला प्रवासात मी सेवा सुरू मुख्याध्यापक डॉ.श्रीपाद जोशी ,श्री.पी.जी..कुलकर्णी,श्री.हल्याळ बी.जी.श्री.डी.पी.ईनामदार, श्री.बी.ए. महाजन श्री.मेत्री ए.ए.,श्री.यु.जी.अंगडी, श्री.ए.बी.होवाळे
असा माननीय मुख्याध्यापक साहेबांची साथ लाख मोलाची होती.
(लेखमालिका सुरू आहे.भेटु पुन्हा.... पुढील भागात....... प्रतिक्रिया लिहिण्यासाठी विसरू नका ..... !)
Comments
Post a Comment